आंबा

चहावरील फ्लश वर्म (तपकिरी किडा/पतंग)

Cricula trifenestrata

किडा

थोडक्यात

  • झाडांची पानगळ होते.
  • पानांना बाहेरुन खाल्ले जाते.
  • सुरवंटांची उपस्थिती असते.

मध्ये देखील मिळू शकते


आंबा

लक्षणे

सुरवंट झाडाची सर्व पाने खाऊ शकतो आणि फुलंची संख्याही कमी करु शकतो. झाडाच्या बाहेरच्या बाजुने खाण्यास सुरवात होते आणि नंतर मध्याकडे आणि शेंड्याकडे पसरत जाते. अति संक्रमित झाड कमकुवत होते आणि कदाचित फुले वा फळे अजिबात धरत नाहीत.

शिफारशी

जैविक नियंत्रण

सुरवंटांचे संक्रमण मानवीरीत्या व्यवस्थापित करण्यासाठी, जिथे सुरवंट गटाने असतात तिथे लांब दांड्याचा पलिता पेटवुन त्या भागास गरम केल्याने, सुरवंट खाली पडतात. पडलेल्या सुरवंटाना हातमोजे घालुन गोळा करुन गाडावेत. ज्या पानांवर छोट्या सुरवंटांचे गट आणि अंडी असतात ती पाने काढुन नष्ट करावीत. जैविक नियंत्रणासाठी टेलेनोमस प्रजाती सारखे परजीवी वापरावेत जे अंडी आणि कोष खातात आणि ब्युव्हेरिया बॅसियाना सारखे परजीवी जे प्रौढ पतंगांची शिकार करतात. उद्रेकांचे नियंत्रण करण्यातील मुख्य भुमिका नैसर्गिक भक्षक बजावतात. तसेच नीमवर आधारीत कीटनाशके जसे कि अॅझाडिरॅक्टिनसुद्धा ह्या उपद्रवाच्या व्यवस्थापनात प्रभावी ठरले आहे.

रासायनिक नियंत्रण

पतंगांचे नियंत्रण रसायनिक कीटनाशकांविना केले जाते, खास करुन जर संक्रमण लवकर ध्यानात आले तर. शेवटचा उपाय म्हणुन मिथिल पॅराथियॉन आणि एंडोसल्फान सारख्या चांगल्या प्रभावी म्हणुन अहवालित रसायनिक पद्धतींचा विचार केला जातो. जेव्हा कीटनाशक वा कोणतेही रसायनिक उत्पादन वापरीत असाल तर संरक्षक कपडे वापरणे आणि लेबलावरील सूचना लक्षपूर्वक वाचणे महत्वाचे आहे. नियम देशा-देशात वेगळे असतात, म्हणुन आपल्या भागातील मार्गदर्शनाचे पालन करावे. ह्यामुळे सुरक्षेची खात्री राहून यशस्वी वापराचा संभव वाढतो.

कशामुळे झाले

चहावरील फ्लश वर्म (तपकिरी किडा/पतंग) हा बांगलादेश, म्यानमार आणि भारतातील आंब्याच्या झाडांवरील महत्वाचा किडा आहे पण ह्यामुळे रेशिम उत्पादनाची संधीही मिळते. छोटे सुरवंट हे गटा-गटाने खातात आणि जसे मोठे होतात तसे वेगवेगळे पसरतात. जेव्हा अन्नाची कमतरता होते तेव्हा मोठ्या अळ्या झाडांवरुन खाली पडतात आणि अधिक अन्न शोधण्यासाठी रांगत नविन झाड शोधतात. ह्या किडीच्या जीवनचक्रात पुष्कळसे टप्पे आहेत. पूर्ण खाऊन झाल्यावर, सुरवंट पानांच्या झुबक्यात वा फांदीवर स्वत:भोवती कोष विणतात. प्रौढ पतंग निशाचर असुन विविध रंगाचे असतात, ह्यातील नरांच्या पुढच्या पंखांवर दोन गडद ठिपके असतात तर माद्यांच्या पंखांवर मोठे आणि अनियमित ठिपके असतात. प्रतिवर्षी ह्यांच्या चार पिढ्या होऊ शकतात. उपद्रव असला तरी हे पतंग चांगल्या प्रतिचे रेशिम बनवितात. इंडोनेशियात, ह्या उपद्रवास मोठ्या प्रमाणावर रेशमासाठी पाळण्यात येते ज्यामुळे ग्रामीण समुदायांना संभावित आय स्त्रोत मिळतो.


प्रतिबंधक उपाय

  • झाडाच्या सभोवताली तण काढा आणि शेतात प्रकाश सापळे लावुन प्रौढ पतंगांना आकर्षित करुन मारा.
  • त्याच सोबत नियमितपणे किडीच्या नुकसानीच्या लक्षणांसाठी तपासत चला म्हणजे दिसताक्षणीच प्रभावीपणे पावले उचलता येतील.

प्लँटिक्स डाऊनलोड करा