Riptortus pedestris
किडा
शेंगांवर किडे समूहाने असतात. ते रंगाने तपकिरी किंवा फिकट हिरवे असतात. छोटे किडे आणि प्रौढ मिळुन हिरव्या शेंगांच्या कच्च्या दाण्यातील रस शोषण करतात. संक्रमित शेंगा आक्रसतात आणि त्यावर पिवळे धब्बे तसेच खाल्ल्याच्या जागी तपकिरी व्रण दिसतात व दाणे बारीक असतात. जर संक्रमण गंभीर असेल तर झाडाचा कोवळा भाग आक्रसतो आणि अखेरीस वाळतो.
पाणी व तेल भरलेल्या भांड्यात हाताने किड्यांना वेचुन टाकले असता लोकसंख्या कमी होते. फुल आणि शेंग धारणेच्या काळात, किड्यांना गोळा करुन लहान क्षेत्रात जमिनीवर हाताने चिरडुन मारले जाऊ शकते. काळा साबण आणि रॉकेलचे मिश्रण वापरा: १७० ग्रॅ. काळा साबण पाण्यात मिसळा, हे मिश्रण १ ली. रॉकेलमध्ये विरघळवुन साबण/रॉकेलचे जाडसर तीव्रता असलेले मिश्रण तयार करा. ह्या मिश्रणातील ४०० मि.ली. मिश्रण ५ ली. पाण्यात मिसळा. शेंग विकसित झाल्यानंतर ह्याची फवारणी अठवड्याच्या अंतराने करा.
डायमिथोएट, मिथिल डेमेटन, इमिडाक्लोप्रिड किंवा थियामेथोक्झॅम ही संभावित प्रभावी कीटनाशके आहेत ज्यांची फवारणी केली जाऊ शकते.
शेंगावरील किड्यांना ऊन असलेले दिवस तसेच उच्च आर्द्रता पातळी भावते. अशा हवामानानंतर आपणांस संक्रमण दिसु शकते. तपकिरीसर काळे आणि लांबट अरुंद तुडतुड्यांचे पाय लांब असतात. छोटे किडे अत्यंत नाजुक असतात, फिकट पिवळसर असतात आणि नंतर ते हिरवट तपकिरी होतात. नंतर गडद तपकिरी मुंग्यांसारखे दिसु लागतात. प्रौढ तपकिरी, सडपातळ असतात व उडण्यात आणि उड्या मारण्यात जलद असतात.