तूर

कुडझु किडा

Megacopta cribraria

किडा

थोडक्यात

  • बारीक, लंब गोलाकार, फिकट तपकिरी किडे.
  • पाने वाळतात.
  • शेंगांची वाढ अनैसर्गिक होते.

मध्ये देखील मिळू शकते


तूर

लक्षणे

आपल्याला बारीक, लंबगोलाकार, फिकट तपकिरी रंगाचे, गडद ठिपके असलेले किडे दिसतील. खोडांवर किती किडे एकत्र आहेत ते तपासा. खोडांवर किड्यांचे गोळा होणे आणि खाणे जास्त असते. शेंगांची अनियमित वाढ आणि पानांवर वाळल्याचे ठिपके दिसणारी झाडे तपासा. शेंगांची वाढ योग्य होत नाही आणि बियाणेही बरीक आणि हलके असुन प्रति शेंगही कमी भरते. किडे झाडातुन अन्नद्रव्य शोषत असल्याने: पाने आणि खोड वाळतात. झाडांवरील गडद, वाळल्याचे ठिपकेच दर्शवितात कि किड्यांनी कुठे छिद्र करुन झाडाचे अन्नद्रव्य शोषले आहे. प्रौढ हे खोडावर ताव मारतात तर पिल्ले पानांच्या शिरा खातात. जर ह्या किड्यांना डिवचले वा चिरडले तर ते घाणेरडा वास येतो. कुडझु किडे पानांवा आपल्या मागे गोड, चिकट रस सोडतात. ह्या रसावर एका जातीची बुरशी येते जी पानांवर काळे आवरण बनविते, ज्यामुळे पानांना ऊन मिळत नाही आणि प्रकाश सौंश्र्लेषणात बाधा येते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ब्युव्हेरिया बॅसियाना बुरशी कुडझु किड्यांना संक्रमित करते आणि ह्या उपद्रवाचे नियंत्रण करण्यात मदत करते. हे नैसर्गिकत: होत आहे का हे तपासा: संक्रमित कुडझु किड्यांवर पांढरा, फेसाळ बुरशीचा थर असतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. प्रौढांवर फवारणी करु नका कारण ती प्रभावी नसते: फक्त नविन पिढीवरच फवारणी करा. मोसमात थोड लवकर किंवा जर आपणांस प्रति झाड ५ प्रौढ आढळले तरच फवारणी करा. प्रौढांना वसु द्यात आणि अंड्यातुन नविन पिढी ऊबुन बाहेर आली कि त्यावर फवारणी करा. प्रभावी कीटनाशकात सामिल आहेत पायरेथ्रॉइडस (बीटा/२ सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन, सुमिसायडिन) आणि ऑर्गॅनोफॉस्फेटस. इमिडाक्लोप्रिडचा वापरही किडींच्या घटना कमी करण्यासाठी केला गेला आहे. शेंगा लागण्याच्या सुमारास फवारणीची शिफारस केली जाते ज्यामुळे किडींची संख्या व्यवस्थापन तर होतेच आणि त्याचबरोबर कमी वेळा वापर करावा लागतो. फवारणीपूर्वी नीट तपासणी करा कारण ब्युव्हेरिया बॅसियाना ही मित्र बुरशीही किडींची संख्या कमी करण्यासाठी कार्यरत असु शकते. ज्यामुळे आपले वेळ आणि पैसाही वाचेल!

कशामुळे झाले

हे किडे हिवाळ्यात गळलेल्या पाचोळ्यात किंवा झाडाच्या सालीखाली रहातात. पानांच्या खालच्या बाजुला माद्या त्यांची लंबुळकी अंडी घालतात. ह्याच अंड्यातुन नविन पिढी ऊबते आणि त्यांचे शरीर बहुतांशी प्रौढांसारखेच असते. ह्यांच्या संक्रमणाची सुरवात शेताच्या कडेने होते आणि आत पसरत जाते. कमी तापमान आणि छोट्या दिवसात किडे घरात लपुन हिवाळा काढतात आणि पुढच्या उन्हाळ्यात जेव्हा तापमान ऊबदार होते तेव्हा नविन जीवनचक्र सुरु करतात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • किडे पांढर्‍या पृष्ठभागाकडे आकर्षित होतात: पांढरे किंवा पिवळे चिकट सापळे लाऊन कुडझु किड्यांना आकर्षित करुन पकडा.
  • काढणीनंतर शेतातुन पिकांचे अवशेष नष्ट करा.
  • मोसमात लवकर सोयाबीनसारखी सापळा पिके शेताच्या कडेने लावा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा