Nezara viridula
किडा
किडी जास्तकरुन फळांना आणि वाढत्या कोंबांना खातात. वाढते कोंब कोरडे होऊन वाळतात. फळे खाल्ली गेल्यास सर्वात अधिक नुकसान होते. फळे पूर्ण आकाराची होत नाहीत, त्यांचा आकार बदलतो तसेच ती गळुही शकतात. अनेकवेळा फळे खाल्ल्यामुळे फळांच्या पृष्ठभागावर काळे टणक ठिपके येतात. फुलांच्या कळ्या खाल्ल्या गेल्यास फुलगळ होते. फळांच्या चवीतही फरक पडतो. खाल्ल्या जागी इतर जंतुंना शिरकाव करता येत असल्याने अधिक नुकसान होते. अंड्यांचे पुंजके पानांच्या खालच्या बाजुला सापडतात.
अंडी खाणारे परजीवी ट्रिसोल्कस बॅसालिस आणि ताचिनिड माशी ताचिनस पेनिपेस आणि ट्रायकोपोडा पिलिपेसचा वापर ह्या किडीच्या नियंत्रणासाठी सफलतेने केला गेला आहे.
कीटनाशक उपाय योजनेची बहुधा आवश्यकता/गरज नसते, तरीही जर दुर्गंधी किड्यांची संख्या खूप जास्त असली तर फवारणीची गरज भासू शकते. कार्बामेटस आणि ऑर्गॅनोफॉस्फेट संयुगांच्या वापराने किडींचे नियंत्रण रसायनिक रीतीने केले जाऊ शकते. तरीही, ह्यातील बहुतेक संयुगांचा परिणाम उपचारित झाडांवर फार काळ रहात नसल्याने, पिकांना जवळपासच्या भागातुन परत संसर्ग होण्याचा धोका असतोच. जेव्हा किडी सर्वात सक्रिय असुन पानांमध्ये लपलेल्या नसतात ती वेळ साधुन किटनाशकांद्वारे नियंत्रणाचा प्रभाव वाढविला जाऊ शकतो. अशावेळी कीटनाशके थेट किडींच्या संपर्कात येऊ शकतात. दुर्गंधी किडींना पहाटे तसेच संध्याकाळच्या वेळी खाताना पाहिले गेले आहे.
नेझारा व्हिरिडुला नावाच्या किडीमुळे नुकसान उद्भवते, जी जगभरात खासकरुन उष्णकटिबंधीय तसेच उप-उष्णकटिबंधीय प्रदेशात सापडते. त्यांना "दुर्गंधी किडे" म्हटल जात कारण जेव्हा त्यांना धोका जाणवतो तेव्हा ते दुर्गंध सोडतात. किडे सोंडेद्वारे पिकांत छिद्र करतात. खाण्यासाठी केलेले हे सोंडेचे छिद्र लवकर दिसत नाही. किडींचे प्रौढ तसेच पिल्लेही झाडे खातात. त्यांना झाडाचे नाजुक भाग (कोंब, फळे, फुले) खायला आवडते. जेव्हा ह्यांची अंडी उबतात तेव्हा पिल्ले अंड्याच्या जवळपासच रहातात. प्रौढ उडू शकतात त्यामुळे भरपूर भटकतात. ते बहुधा हिरवे असतात ज्यामुळे झाडांमध्ये लवकर लक्षात येत नाहीत. किड जशी वयाने वाढते तसा तिचा रंगही बदलुन अधिकाधिक हिरवा होत जातो. पहाटेच्या वेळी बहुधा ते झाडाच्या उंचावरील भागात जातात.