तंबाखू

तंबाखूवरील शिंगकिडा

Manduca sexta

किडा

थोडक्यात

  • पानावर बाहेरुन खाल्ल्याचे आणि छिद्र दिसतात.
  • पाने गहाळ असतात.
  • गडद विष्ठा दिसते.
  • सुरवंटांची उपस्थिती असते.

मध्ये देखील मिळू शकते


तंबाखू

लक्षणे

सुरवंट कोवळ्या पानांना, वाढणार्‍या कोंबांना खातात ज्यामुळे छिद्र स्पष्ट दिसतात आणि बाहेरील नुकसानही. पानांवरील गडद विष्ठेने त्यांची उपस्थिती जाणवते. जर आपण झाडाला निरखुन पाहिले तर आपणास हिरवे किंवा तपकिरी सुरवंटही दिसतील. सुरवंट, तंबाखूच्या झाडाची सर्व पाने खातात आणि फक्त शिरांचे सांगाडे मागे सोडतात. मोठ्या उद्रेकाच्या काळात, पूर्ण शेताची पानगळ होते. टोमॅटोमध्ये भारी पानगळीमुळे सुरवंट तर विकसित होणारी फळे खातात आणि फळांवर मोठे खुले व्रण सोडतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बॅसिलस थुरिंगिएनसिस (बीटी) उत्पादने, त्यावरील लेबल आणि स्थानिक मार्गदर्शनाप्रमाणे वापरा. बीटी हे एक जिवाणू आहे जे सुरवंटांनी खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटात जाऊन त्यांना मारतात आणि सेंद्रीय शेतीसाठीही सुरक्षित आहेत. ह्या व्यतिरिक्त, पक्षी, छोटे सस्तन प्राणी, लेडीबग्ज, लेसविंग्ज आणि परजीवी वॅस्पस सारखे नैसर्गिक भक्षकही शिंगकिड्यांची संख्या कमी करण्यात मदत करतात. जर आपणांस एकही शिंग किडा आपल्या झाडांवर आढळला तर हातमोजे घालुन त्यांना हाताने काढा आणि साबणाचे पाणी भरलेल्या भांड्यांत घालुन मारा.

रासायनिक नियंत्रण

तंबाखूवरील शिंगकिड्यांसाठी तसेच इतर सुरवंटांसाठीही अनेक रसायनिक कीटनाशके आहेत. मॅलेथियॉन, डायाझिनॉन, कार्बारिल आणि फेनिथ्रॉथियॉन ही कीटकनाशके किड्याच्या वाढीच्या पुष्कळशा टप्प्यांना लक्ष करतात, पण खास करुन सक्रियतेने खाणार्‍या सुरवंटांविरुद्ध प्रभावी आहेत. जेव्हा कीटनाशक वा कोणतेही रसायनिक उत्पादन वापरीत असाल तर संरक्षक कपडे वापरणे आणि लेबलावरील सूचना लक्षपूर्वक वाचणे महत्वाचे आहे. नियम देशा-देशात वेगळे असतात, म्हणुन आपल्या भागातील मार्गदर्शनाचे पालन करावे. ह्यामुळे सुरक्षेची खात्री राहून यशस्वी वापराचा संभव वाढतो.

कशामुळे झाले

किड्यांमुळे लक्षणे उद्भवतात. हे किडे फक्त सोलानासेयस झाडांनाच खातात, बहुधा तंबाखू आणि टोमॅटोला. सुरवंटाची वाढ प्रौढ मानवाच्या तर्जनीएवढी होते आणि किड्याच्या शरीराच्या दोन्ही टोकास "शिंग" असते. सुरवंट बहुधा हिरवे असतात पण तपकिरीही असु शकतात आणि शरीराच्या दोन्ही बाजुंना सात तिरपे पांढरे पट्टे असतात आणि शरीराच्या दोन्ही बाजुस निळे-काळे डोळ्यांसारखे ठिपके असतात. तंबाखूवरील शिंगअळीची मादी यजमान झाडाच्या पानांवर अंडी घालते. ज्या झाडांना सुरवंटांनी आधीच खाल्लेल आहे त्या झाडांवर बहुधा अंडी घातली जात नाहीत. अंडी ऊबुन सुरवंट बाहेर येतात आणि झाडाची पाने तसेच फांद्या खायला सुरवात करतात. सुरवंट कोषात जाण्यापूर्वी पुष्कळदा कात टाकतो, नंतर कोषातुन प्रौढ पतंग बनुन बाहेर पडतो. कोषाचा टप्पा हा बहुधा खाली जमिनीवर किंवा पाचोळ्यात पुरा होतो.


प्रतिबंधक उपाय

  • जर आपल्या भागात उपलब्ध असतील तर तंबाखूचे प्रतिकारक वाण घ्या.
  • खूप उशीरा लागवड करु नका; ह्यामुळे आपली कोवळी रोपे इतर शेतातील किड्यांना आयती तयार मिळतील.
  • नत्रयुक्त खतांची योग्य मात्राच द्या, अधिक देणे टाळा, ज्यामुळे उपद्रवास चालना न देता झाडांची निरोगी वाढ होईल.
  • आपल्या पिकांना, खास करुन कोवळी पाने आणि कोंबावर संक्रमणाच्या लक्षणांसाठी तपासत चला.
  • काढणीनंतर जमिनीतील किडींचे व्यवस्थापन करा म्हणजे पुढील दोन वर्षात समस्या टळतील: तंबाखूच्या झाडाच्या दुय्यम फांद्या छाटुन, त्यांना शेताबाहेर नेऊन टाका आणि नंतर नांगरट करा.
  • काढणीनंतर शेत स्वच्छ राखण्यासाठी पिकांचे अवशेष लगेच काढा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा