द्राक्षे

द्राक्षवेलींवरील फयालोक्सेरा नावाच्या उवा

Daktulosphaira vitifoliae

किडा

थोडक्यात

  • पानांच्या आणि लतातंतुच्या खालील बाजुस हिरव्या किंवा लाल गाठी येतात.
  • अनैसर्गिक पानगळ.
  • मूळांवर गाठी.
  • मूळप्रणाली कमी होते.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

डाक्टुलोस्फैरा व्हिटिफोलिएचे गाठी निर्मितीचे दोन टप्पे आहेत; एक पानांवर गाठी देण्याचा टप्पा आणि दुसरा मुळांवर गाठी देण्याचा टप्पा. पानाच्या खालच्या बाजुस लहान गाठी येतात. गाठींचा आकार सुमारे अर्ध्या वाटाण्याइतपत असतो. काहीवेळा पूर्ण पानच गाठींनी भरुन जाते. पानांवरील गाठींनी द्राक्ष उत्पादनात लक्षणीय नुकसान सहसा होत नाही. तरीही, गंभीर प्रादुर्भाव झाल्यास हंगामात उशीरा पानांची लक्षणीय विकृती आणि प्रभावित पानांची गळ दिसुन येते. फयलोक्सेराचे पानांवर गाठी देणारे रुप हे काही देशात क्वचितच दिसते. लक्षात घ्या कि पानांवर वस्ती करणारे रुप हे मूळांवर वस्ती करणार्‍या रुपाच्या अनुपस्थितीत होऊ शकत नाही. तर दुसरीकडे, मुळांवरील संक्रमण हे नियंत्रणास कठिण असते आणि ह्यामुळे मुळांना सूज येते तसेच वेलींत घट दिसते. मूळ प्रणालीच्या अवनतीमुळे दुय्यम बुरशीचे संक्रमणही होते. गंभीर मूळ संक्रमण झाल्यास पानगळ होऊन कोंबाची वाढ कमी होते. संवेदनशील वेली ३-१० वर्षात मरतात. बहुधा १० वर्ष जुन्या जोमदार वेलींवर लक्षणे कमी महत्वाची असतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

द्राक्षावरील फयलोक्सेराच्या जैव नियंत्रणाबाबत खूपच थोडी माहिती उपलब्ध आहे; पर्यावरणीय आणि मूळ अवस्था हे नैसर्गिक भक्षकांपेक्षा जास्त महत्वाचे आहे.

रासायनिक नियंत्रण

फायलोक्सेराने प्रभावित मुळांचे उपचार करणे नेहमीच शक्य नसते. फारच संवेदनशील वाणात, खास करुन कोवळ्या झाडात, वसंत ऋतुत पहिली गाठ दिसताच उपचार करणे फार आवश्यक असते. गाठ येताक्षणीच त्यांना दररोज चाकूने कापून अंडी ऊबण्यास केव्हा सुरवात होते आहे हे पहाणे गरजेचे असते. छोट्या अळ्या दिसताक्षणीच रसायनिक नियंत्रण वापरावे. विभिन्न जीवनशैलीच्या अधिक पिढ्यांपर्यंत हा प्रकार पोचु नये म्हणुन निरीक्षण अणि उपचार वापर अत्यावश्यक आहेत. ह्या बाबतीत कीटनाशकांचा वापर खूप कमी प्रभावी असतो. आपल्या भागातील नियंत्रित उत्पादने नेहमीच वापरा.

कशामुळे झाले

डाक्टुलोस्फैरा व्हिटिफोलिएचे जीवनचक्र गुंतागुंतीचे आहे. ह्या किडीस भारी जमिनी आणि कोरडे हवामान मानवते. वसंत ऋतुत, द्राक्षवेलींच्या लाकडात घातलेले फलित अंडे ऊबुन मादी बाहेर येते आणि पानांवर स्थलांतरीत होऊन गाठी तयार करते. १५ दिवसांत मादी वयात येते आणि गाठीत अंडी घातल्यानंतर काही काळातच मरते. ह्या अंड्यातुन ऊबुन बाहेर येणारी पिल्ले गाठीतुन बाहेर पडतात आणि नविन पानांवर जातात. तिथे नविन गाठी तयार करुन अंडी घालतात. उन्हाळ्यात ह्यांच्या ६-७ पिढ्या होतात. तर शरद ऋतुत पिल्ले मुळांवर स्थलांतरीत होऊन तिथे पूर्ण हिवाळाभर विश्रांती घेतात. नंतरच्या वसंत ऋतुत ती परत सक्रिय होतात आणि मुळांवर गाठी तयार करतात. पंखहीन माद्यांचे मुळांवर गाठी देण्याचे चक्र हे वर्षानुवर्ष कायम चालत रहाते. उन्हाळ्यात उशीरा आणि शरद ऋतुत, काही मुळांवर वस्ती करणार्‍या फिलोक्सेरांनी घातलेल्या अंड्यातुन पंख असलेल्या माद्या बाहेर येतात. पंख असलेल्या माद्या मुळांवरुन प्रणालीत स्थलांतरीत होतात जिथे त्या दोन आकारांची अंडी घालतात. त्यातील लहान आकाराच्या अंड्यांतुन नर जन्म घेतात तर मोठ्या आकाराच्या अंड्यातुन माद्या जन्म घेतात. संभोग होतो आणि मादी नंतर फक्त एकच फलित अंडे द्राक्षवेलीच्या फांदीवर घालते जिथे ते निष्क्रिय अवस्थेत रहाते. ह्याच अंड्यातुन पानांवर वस्ती करणार्‍या किडींच्या पिढ्या तयार होतात. भौगोलिक घटकांनुसार, एकाच वेळी विभिन्न जीवनशैली असणार्‍या पिढ्याही विकसित होऊ शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • अनेक दशकांपासुन प्रतिकारक खुंट वृक्षचा (अमेरीकन रुटस्टॉक) वापर हा नियंत्रणाचा सर्वात यशस्वी उपाय सिद्ध झालेला आहे.
  • सर्व व्हिटिस व्हिनिफेरा वाणे आणि फ्रेंच संकर वाणेही मूळांवर गाठी देणार्‍या किडींस संवेदनशील असतात आणि सामान्यपणे ज्या मूळ कंदांवर व्हिनिफेराची वस्ती नसते त्यांची प्रतिकारकता चांगली असते.
  • पूर्वी द्राक्षवेलींच्या मळ्यात अनेक अठवड्यांपर्यंत पाणी भरणे हा सर्वोत्तम उपाय म्हणुन वापरला जात असे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा