लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय झाडांवरील पांढरे खवले

Unaspis citri

किडा

थोडक्यात

  • पांढरे नर खवल्यांचे पुंजके फळांवर दिसतात.
  • पानांच्या खालच्या बाजुला पिवळे ठिपके येतात.
  • पाने अकाली गळतात.
  • डहाळे वाळतात.
  • फांद्या अखेरीस वाळतात.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

खोड आणि झाडाच्या मुख्य फांद्यांवर बहुधा प्रादुर्भाव होते. जर प्रादुर्भाव गंभीर झाले तर डहाळे, पाने आणि फळेही प्रभावित होतात. ह्यामुळे पानांच्या खालील बाजुला पिवळे ठिपके येतात व कालांतराने हे पान अकाली गळतात, डहाळे वाळतात. फांद्या अखेरीस वाळतात. खूप जास्त प्रादुर्भाव झालेली साल गडद आणि निस्तेज होते, घट्ट वाळल्यासारखी दिसते आणि अखेरीस फाटते, ज्यामुळे बुरशीला झाडावर संक्रमण करण्यास मोका मिळतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

जर बागेत लिंबूवर्गीय झाडांवरील पांढर्‍या खवल्यांची वस्ती आधीच वसली असेल तर त्यांचे नियंत्रण करण्यात परजीवी वॅस्प अॅफिटिस लिंग्नानेन्सिस मदत करतात. लाईम सल्फर (पॉलिसल्फाइड सल्फर) किंवा पाण्यात विरघळणारे गंधक वापरा, मग लाईम सल्फर आणि तेलाच्या फवारणीत किमान ३० दिवसांचे अंतर सोडा. तरीही लाईम सल्फरमुळे अॅफिटिस लिंग्नानेन्सिसवर विपरित परिणाम होऊ शकतो. एक यशस्वी एजंट म्हणुन चिलोकोरस सर्कुमडॅटस बीटलला दर्शविले गेले आहे. पांढरे तेल, साबण आणि बागायती तैल फवारणीने किड्यांनी श्र्वसनासाठी ठेवलेली छिद्रे बुजुन जातात आणि किडे गुदमरुन मरतात. पानांच्या खालील बाजुस फवारणी करा, तेल किड्यांच्या संपर्कात यायला हवे. साबण किंवा तेलाचा दुसर्‍यांदा केला जाणारा वापर हा फक्त ३-४ अठवड्यांनीच केला जावा. रसायनिक नियंत्रण एजंटांच्या वापराने जैविक एजंटांद्वारे केल्या जाणार्‍या नियंत्रणांचा प्रभाव कमी होऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मॅलेथियॉन ५०% हे लिंबूवर्गीय झाडांवरील पांढर्‍या खवल्यांविरुद्ध काम करते, ह्याची फवारणी पानांच्या खालच्या बाजुला करा. कृत्रिम पायरेथ्रॉईड कीटकनाशकेही सक्रिय अळ्यांविरुद्ध प्रभावी आहेत. मॅलेथियॉन आणि कृत्रिम पायरेथ्रॉईड कीटकनाशके बहुधा नैसर्गिक भक्षकांनाही मारतील म्हणुन शक्य झाल्यास ह्यांचा वापर टाळा.

कशामुळे झाले

लिंबूवर्गिय झाडांवरील पांढर्‍या खवल्यांच्या प्रौढांमुळे (यूनास्पिस सिट्री) मुळे लक्षणे उद्भवतात. अंडी अंडाकृत, चमकदार नारिंगी रंगाची आणि सुमारे ०.३ मि.मि.लांबीची असतात. प्रौढ मादी खवली १.५ ते २.३ मि.मी. लांबीची असते आणि त्यांचे छोटे, गडद खवल्यांना बहुधा फळांवर लागलेली माती समजले जाते. माद्या त्यांची सोंड झाडात खुपसतात आणि मग परत तिथुन हलत नाहीत, तर तिथेच खाणे, प्रजोत्पादनही करतात. त्यांचे चिलखत हे शिंपीच्या शिंपल्याच्या आकाराचे असते आणि राखाडी किनारीसह तपकिरीसर जांभळे ते काळे असते. नरांचे चिलखत खवलेही प्रौढत्व येईपर्यंत स्थिर असते. अप्रौढ नर खवल्यांचे चिलखत पांढरे असुन समांतर बाजुचे असते आणि त्याचे उभे तीन भाग असतात, एक केंद्रात तर दोन किरकोळ किनारी असतात. यू सिट्री मेणाचा स्त्राव सोडतात आणि अवस्था बदलताना टाकलेल्या कातीचे संरक्षित कवच बनवितात, जे त्यांचे चिलखत बनते. किडा मेल्यानंतरही खूप काळ हे चिलखत फळांवर रहाते ज्यामुळे फळे विकृत होतात.


प्रतिबंधक उपाय

  • नविन बागेत जाण्यापूर्वी शेतीची उपकरणे साफ करा.
  • बागेच्या दुसर्‍या भागात जाण्यापूर्वी आपले कपडे झटका.
  • अळ्यांचे वहन वारा, शेतकी उपकरणे आणि शेतात काम करणार्‍या लोकांद्वारे होते.
  • पांढर्‍या खवल्यांच्या अळ्या चलित असतात, त्यांचा प्रसार ह्याच टप्प्यावर रोखणे महत्वाचे असते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा