इतर

एरंडी बी व बोन्डे पोखरणारी अळी

Dichocrocis punctiferalis

किडा

थोडक्यात

  • सुरवंट कोंब व बोन्डे पोखरतात.
  • बोन्डाँना जाळीने विणतात.

मध्ये देखील मिळू शकते

8 पिके
कापूस
वांगी
आले
पेरु
अधिक

इतर

लक्षणे

अळ्या कोंबांना आणि बोन्डामध्ये पोखरून नुकसान करतात, अनेकदा बोन्डाना जाळीने एकत्र विणतात. ते विष्ठेने भरलेले रुपेरी बोगदे तयार करतात. काहीवेळा ते खोडावर पान जिथे येतात तिथे किंवा क्वचित जाड पानांच्या मध्यभागी आढळतात. प्रदूर्भावाच्या चिन्हांमध्ये कोंबांवर आणि जाळीदार बॉंडांवर विष्ठा आढळून येणे याचा समावेश आहे.

शिफारशी

जैविक नियंत्रण

या किडींना मुख्य पिकांपासून दूर ठेवण्यासाठी सापळा पिक लावा. नैसर्गिक शत्रूंचा वापर करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टिकोन ठेवा व उपलब्ध असल्यास जैविक उपचारांसह प्रतिबंधात्मक उपायांचा विचार करा. रासायनिक उपचारांनी अळ्यांवर नियंत्रण ठेवणे अवघड आहे कारण ते फळांमध्ये पोखरून आत जाऊ शकतात. फवारणी द्वारे नियंत्रण करण्याचा विचार करत असाल तर फुल धारणेच्या काळात व परत 20 दिवसांनी करणे अत्यंत प्रभावी राहील.

कशामुळे झाले

नुकसान हे अळीने देठ, कोंब, कळ्या, फळे आणि बियांना पोखरण्याने होते. हे नुकसान प्रदूर्भावात रूपांतर होऊ शकते. मादी लहान, अंडाकृत, फिकट पिवळी अंडी फळांवर किंवा बियांवर किंवा त्यांच्या आत घालतात. 6-7 दिवसांनी अंडी गडद तपकिरी होतात. प्रौढ मध्यम आकाराचा असून त्याला लहान काळे ठिपके असलेले फिकट पिवळे पंख असतात. अळ्या बिया, बोन्डे आणि कोवळ्या कोंबांवर खातात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या 24 मिमी लांब, गुलाबी छटा असलेले फिकट हिरव्या रंगाचे, बारीक लव, गडद डोके आणि कवच असतात. ते खोडात किंवा बॉंडात आपली सुप्तावस्था घालवतात.


प्रतिबंधक उपाय

  • संक्रमित कोंब आणि त्यांचे बोन्डे गोळा करून नष्ट करा.
  • स्वच्छताविषयक पद्धती सांभाळा.
  • लवकर लागवड करण्याचा प्रयत्न करा.
  • पर्यायी यजमानांना नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा