ऊस

पोखरणारा प्लासी किडा

Chilo tumidicostalis

किडा

थोडक्यात

  • वरील पेऱ्यात पोखरतो.
  • ऊसाचे कांडे पोकळ असतात.
  • खोड आणि शेंड्यातील पाने वाळतात.
  • पांढर्‍या अळ्यांच्या पृष्ठभागावर गडद पट्टे असतात व डोके गडद असते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

ऊस

लक्षणे

ऊसाचे वाळलेले शेंडे पाहुन पोखरल्याच्या घटना सहज लक्षात येतात. प्राथमिक संक्रमण, नविनच उबलेल्या अळ्यांद्वारे, सरासरी तीन ते पाच शेंड्याजवळील पेरे, ५० ते १८० अळ्या एकाच ऊसास लागण्याने सुरवात होते. वरच्या पेर्‍यांवर अनेक पोखरल्याची छिद्रे दिसतात. प्रभावित ऊस लाल विष्ठेने भरतो. कांडे पोकळ असुन केंद्रातील भाग आणि शेंड्यावरील पाने वाळतात व सहजपणे मोडतात. प्रभावित पेऱ्याच्या शेजारच्या पेऱ्यांवर मुळे विकसित होतात जी ऊसाला पूर्णपणे आच्छादुन टाकतात; पेऱ्यांवर कोंब येतात. काहीवेळा दुय्यम संक्रमणही होते, पूर्ण वाढ झालेल्या अळ्या ऊसाच्या खालच्या निरोगी भागात पसरतात, आणि बाजुच्या ऊसांवर प्राथमिक हल्ल्याची लक्षणे दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

कोटेशिया फ्लाविप्स आणि ट्रायकोग्रामा चिलोनिस वॅस्पस हे सी. ट्युमिडिकोस्टालिसचे प्रभावी नैसर्गिक शत्रू आहेत. सौम्य हवामान परिस्थितीत ट्रायको कार्डस किंवा सियाल्सना शेतात सोडा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आजतागायत, या उपद्रवाविरुद्ध कोणतेही रसायनिक नियंत्रण माहितीत नाहीत. बहुधा रसायनिक नियंत्रण उपाय हे प्रभावी नसतात. जर आपणांस याच्या घटना आणि लक्षणांची गंभीरता कमी करणारी कोणतीही यशस्वी पद्धत माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा.

कशामुळे झाले

चिलो ट्युमिडिकोस्टालिसच्या अळ्यांनी एकत्र मिळुन खाण्याने नुकसान होते. पतंग हलक्या तपकिरी रंगाचे असुन काळ्या ठिपक्यांनी अंग भरलेले असते जे टोकाकडे छोट्या रुपेरी पांढर्‍या ठिपक्यात बदलते. पाठचे पंख पांढरट असतात पण नर पतंगातील काहींच्या पुढच्या भागात फिकट तपकिरी खवले असतात. मादीच्या गुदद्वारापाशी दाट केस असतात. माद्या पानांच्या खालच्या बाजुला ४ ते ५ ओळीत ५०० ते ८०० च्या पुंजक्याने अंडी घालतात. अंडी मळकट पांढर्‍या रंगाची असुन फिकट हिरवट छटा असते पण नंतर ऊबायच्या वेळी ती लाल होते. अळ्या गटाने रहातात, सुस्त असतात. पेऱ्यातच कोषात जातात. आर्द्र हवामान किडींच्या लोकसंख्येस चालना देते. गंभीर घटनाना भारी जमीन आणि साचलेले पाणी किंवा शेतात पाणी भरलेले भावते.


प्रतिबंधक उपाय

  • लक्षणे पहाण्यासाठी शेताचे नियमितपणे निरीक्षण करत चला.
  • पाणी साचू देऊ नका.
  • प्रौढ पतंगांना पकडण्यासाठी प्रकाश सापळे लावा.
  • अंड्यांचे पुंजके आणि प्राथमिक संक्रमण दर्शविणारे ऊसाचे शेंडे काढुन, गोळ करुन नष्ट करा.
  • किड्यांसह मृत गाभा असणारी झाडे काढुन दोन्ही नष्ट करा.
  • नैसर्गिक शत्रुंचे संगोपन करा कारण हे किडींच्या लोकसंख्येस आळा घालण्यात मदत करतात.

प्लँटिक्स डाऊनलोड करा