Chilo sacchariphagus indicus
किडा
सुरवंट पहिल्यांदा कोवळ्या न उलगडलेल्या पानांना खातात ज्यामुळे बंदुकीच्या गोळीसारखी छिद्रे पानांवर येतात. झाडाच्या वाढीच्या सुरवातीच्या टप्प्यावर ते फुटवे खातात ज्यामुळे मृत गाभा होतो. पेरे आक्रसलेले आणि बारीक पडतात आणि त्यावर पोखरल्याची छिद्र देखील असतात. जेव्हा ते छिद्र करुन आत खाण्यासाठी शिरतात तेव्हा ते आत शिरण्यासाठी केलेली छिद्रे विष्ठेने बुजवितात. अळ्या खोडाच्या आतुनच वर चढतात ज्यामुळे लालसरपणा येतो आणि पेरांना नुकसान होते. झाडांचे बुंधे अशक्त होतात आणि नुसत्या वार्यानेही तुटतात. अन्य लक्षणात खुंटीत वाढही येते.
या उपद्रवासाठी कोणताही जैविक उपचार माहितीत नाही पण परजीवी वापरुन पेरे पोखरणार्यास किडींना कमी केले जाऊ शकते. ट्रायकोग्रामा ऑस्ट्रेलियाकम ५०००० परजीवी प्रति हेक्टर प्रति अठवडा सोडा. अंडी खाणारे परजीवी ट्रायकोग्रामा चिलोनिस २.५ मि.ली. प्रति हेक्टर ४ थ्या महिन्यापासुन पंधरवड्याच्या अंतराने सहा वेळा सोडा. अळ्या खाणारे परजीवी स्टेनोब्रॅकॉन डिसा आणि अॅपान्टेलिस फ्लाविपे आहेत. कोषावस्थेसाठी परजीवी टेट्रास्टिचस अय्यारि आणि ट्रिकोस्पिलस डायट्रेय सोडले जाऊ शकतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मोनोक्रोटोफॉस या स्पर्शजन्य कीटनाशकाची फवारणी १५ दिवसातुन एकदा वाढीच्या काळात करावी. नुकसान गंभीर असल्यास दाणेदार कार्बोफ्युरान ३जी ३० किलो प्रति हेक्टर याप्रमाणे जमिनीत टाका.
चिलो सॅखारिफॅगस इंडिकसच्या अळ्यांमुळे नुकसान होते. प्रौढ पतंग छोटे, फिकट पिवळसर असुन पाठचे पंख पांढरे असतात आणि एक गडद रेषा पंखांच्या कडांवर असते. ते पूर्ण वर्षभर सक्रिय असतात आणि एका वर्षात त्यांच्या सुमारे ५-६ पिढ्या होतात. कोवळ्या रोपांपासुन ते काढणीपर्यंत केव्हाही संक्रमण होऊ शकते. अळ्या रोपांच्या सांध्यात पोखरतात, खोडात शिरतात आणि वरपर्यंत पोखरत जातात. ऊसाच्या आजुबाजुला पाणी साचत असल्यास पेरे पोखरणार्या किड्यांसाठी ते अनुकूल असते तसेच जास्त नत्र, कमी तापमान आणि जास्त आर्द्रताही अनुकूल असते. मका आणि ज्वारी हे अन्य यजमानात येतात.