द्राक्षे

गुलाबावरील शेफर (बीटल)

Macrodactylus subspinosus

किडा

थोडक्यात

  • फुलांवर आणि पानांवर खाल्ल्याची छिद्रे दिसतात.
  • पानांचे फक्त सांगाडे उरतात.
  • फळांनाही नुकसान होते.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके

द्राक्षे

लक्षणे

कोणते पीक प्रभावित झाले आहे ह्याप्रमाणे लक्षणेही वेगवेगळी असतात. गुलाबात फुले फुलण्यावर प्रभाव पडतो, ज्यामुळे फुलांच्या पाकळ्यांमध्ये मोठी अनियमित आकाराची छिद्रे येतात. फळांच्या झाडांवर खासकरुन द्राक्षाच्या पानांना जर खाल्ले गेले तर फक्त पानांचे सांगाडेच उरतात. तसेच फळांनाही नुकसान होते, त्यांची साल अर्धवट फाडली जाते आणि अनियमित उथळ खणुन खाल्ले जाते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

अळ्यांना मारण्यासाठी परजीवी जंतांनी जमिन भिजवा. जर संक्रमणाची पातळी फारच गंभीर असेल तर पायरेथ्रिनची शिफारस केली जाते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मॅलेथियॉन ५०%इसी ला ४०० मि.ली. प्रति ६००-८०० पाणी/एकरी मळ्याला द्या. अॅसेफेट, क्लोरपायरिफॉस, बायफेनथ्रिन, सायफ्ल्युथ्रिन किंवा इमिडाक्लोरप्रिड असणार्‍या कीटनाशकांची अन्यथा शिफारस केली जाते. फुलांवर फवारणी टाळा म्हणजे मधमाशांना नुकसान होणार नाही किंवा त्या मारल्या जाणार नाहीत.

कशामुळे झाले

मॅक्रोडाक्टिलस सबपायोनोसस च्या प्रौढ शेफर मुळे नुकसान उद्भवते. ते निस्तेज आणि सडपातळ हिरव्या रंगाचे बीटल्स असुन ट्यांचे डोके गडद असते तर त्यांचे पाय लांब म्हणजे सुमारे १२ मि.मी. इतके असतात. माद्या किडे जमिनीत मातीच्या थराखालील वाळुदार, पाण्याचा चांगला निचरा झालेल्या गवती जमिनीत अंडी घालतात. अंडी घालण्यासाठी भिजकी जमिन फार पसंत केली जाते. अळ्या गुबगुबीत सुस्त अळ्यांच्या रुपाने जमिनीत विश्रांती घेतात आणि गवताच्या मुळांना खातात. गुलाब, टणक बियाणे असणार्‍या फळांना उदा. द्राक्ष, सफरचंद, चेरी, पीच, पेयर आणि प्लम प्रभावित करतात तसेच त्यांना वाळुदार माती आवडते.


प्रतिबंधक उपाय

  • बीटल्स आणि खाण्याच्या नुकसानासाठी अठवड्यातुन दोनदा पिकाचे निरीक्षण करा.
  • जर गुलाबावरील शेफरची संख्या तशी जास्त नसली तर त्यांना हाताने वेचुन साबणाचे पाणी भरलेल्या बादलीत टाका.
  • बागांच्या कडेकडेने चीजक्लॉथचे अडथळे उभारा किंवा ओळींवर फ्लोटिंग कव्हर घाला ज्यामुळे आपल्या पिकाचे प्रौढ बीटल्सपासुन संरक्षण होईल पण ह्यामुळे मातीत रहाणार्‍या जाडजूड अळ्यांपासुन संरक्षण मिळत नाही.
  • कामगंध सापळे बागेपासुन दूर लावा.
  • जमिन नांगरुन अळ्यांची विश्रांतीस्थाने नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा