लिंबूवर्गीय

जायंट स्वॅलोटेल सुरवंट

Papilio cresphontes

किडा

थोडक्यात

  • पानगळ.
  • पानांवर मोठ्या प्रमाणात सुरवंटांच्या उपद्रवाची लक्षणे आढळतात,.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

उपद्रवामुळे पानांवर धब्बे किंवा छिद्र दिसतात. सुरवंटांना कोवळी पाने खाद्य स्त्रोत म्हणुन भावतात. सुरवंट पक्षांच्या विष्ठेसारखे फिकट पांढरी चिन्हे असलेली दिसतात आणि त्यांचा अत्यंत घाणेरडा वास येतो. प्रौढ फुलातील मध पितात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

लेस्पेशिया रिलेयी (विलिस्टन), ब्राचेमेरिया रोबस्टा, टेरोमालस कॅसोटिस वॉकर आणि टेरोमालस व्हॅनेसा हॉवर्डसारख्या परोपजीवी किड्यांना शेतात सोडा. रोपवाटिकेतील रोप आणि वनराईतील कोवळ्या झाडांवर बॅसिलस थुरिंगिएनसिसचा वापर करुन संरक्षित करा. पानांवर साबणाचे पाणी फवारा. परिपक्व लिंबूवर्गीय झाडे काही पानांचे नुकसान सहज सहन करतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फळधारणा झालेली परिपक्व लिंबूवर्गीय झाडे पानांवरील उपद्रव सहन करु शकतात ज्यामुळे रसायनिक नियंत्रण उपायांची गरज अत्यंत थोडी असते किंवा नसते.

कशामुळे झाले

जायंट स्वॅलोटेल सुरवंटांच्या उपाद्रवामुळे नुकसान होते. प्रौढ माद्या त्यांची एकेकटी अंडी यजमान झाडाच्या पानांच्या वरच्या पृष्ठभागांवर घालतात. अंडी बहुधा बारीक, गोलाकार आणि फिकट पांढरी ते तपकिरी रंगाची असतात. सुरवंट पक्षांच्या विष्ठेसारखे दिसतात आणि त्यांच्या मध्य शरीरावर दुधाळ पांढरी चिन्हे असतात. प्रौढ फुलपाखरे फार मोठी असुन त्यांचे पंख गडद तपकिरी असतात आणि त्यावर पंखांवरील आडव्या पिवळ्या पट्ट्यांसह पिवळी चिन्हे असतात. ती बहुधा ४ ते ६ इंच आकाराची असतात.


प्रतिबंधक उपाय

  • जर लहान झाडांवर सुरवंट आणि अंडी असतील तर नष्ट करा.
  • फुल आणि फळ उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी पानांवरुन अळ्यांना हाताने वेचून काढा.
  • कोवळ्या पानांवर लक्ष ठेवा कारण जायंट स्वॅलोटेलच्या माद्यांना त्यावर अंडी घालण्यास प्राधान्य देतात.
  • परिपक्व लिंबूवर्गीय झाडे सहजपणे काही पाने गळतीस सहन करतात, म्हणून लवकर लागवड करण्याची शिफारस केली जाते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा