सफरचंद

सफरचंदवरील फळावरील पतंग (फ्रूट मॉथ)

Argyresthia conjugella

किडा

थोडक्यात

  • फळांची साल सुरकुतलेली असते.
  • रंगहीन, दबलेले धब्बे असतात.
  • बाहेर पडण्याची बारीक छिद्र दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

सफरचंद

लक्षणे

सफरचंदच्या फळांमध्ये बोगद्यांची साखळी असते. फळांची साल सुरकुतलेली असते व त्यावर बारीक रंगहीन, दबलेले धब्बे दिसतात. शेवटच्या काळात सालीवर अनेक छिद्र आणि तपकिरी ठिपके दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

किडींच्या लोकसंख्या नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनिनसिस गॅलेरियेची शिफारस करण्यात येते. सफरचंदवरील फळ पोखरणार्‍या किडींचे भक्षक भरपूर आहेत जे अळ्यांवर हल्ला करतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पतंगांचे स्थलांतर सुर होण्यापूर्वीच कडेकडेने फवारणी केल्यास आतील झाडांपर्यंत पतंग पोचणार नाहीत. गंभीर संक्रमण झाल्यास पूर्ण बागेतच फवारणी घ्यावी लागेल. किडींच्या लोकसंख्या नियंत्रणासाठी अॅझिनफॉस मिथाइल, डायफ्ल्युबेनझुरॉनची शिफारस करण्यात येते. पुढच्या हंगामात संक्रमण होऊ नये म्हणुन शिफारशीत डस्ट किंवा कार्बोफ्युरॉन ३ ग्रॅम (१.१.५ किलो प्रति हेक्टर) ने जमिनीवर उपचार करावेत. तसेच क्लोरपायरिफॉस (२०इसी)ची फवारणी दोन वेळा १५ दिवसांच्या अंतराने करावी.

कशामुळे झाले

आर्जिरेस्थिया कॉनज्युगेलाच्या अळ्यांमुळे नुकसान उद्भवते. सोरबस ऑक्युपारिया (रोवान) हे त्यांचे नैसर्गिक यजमान आहेत पण जेव्हा झाडांचे फळ उत्पादन कमी असते तेव्हा हे सफरचंदच्या झाडावर स्थलांतरीत होतात. छोटे तपकिरी आणि पांढरे प्रौढ पतंग उन्हाळ्यात येतात जेव्हा माद्या सफरचंदाच्या कच्च्या फळातअंडी घालतात. अळ्या विकसित होणाऱ्या फळाला थेट पोखरतात आणि खातात. जेव्हा अळ्यांची वाढ पूर्ण होते तेव्हा त्या जमिनीवर पडुन कोषात जाऊन जमिनीत आपली कोषावस्था घालवतात. खूप पाऊस, थंड हवामानात किडींच्या लोकसंख्येवर विपरीत परिणाम होतो. उशीरा पिकणारी सफरचंदांची वाणे जास्त प्रभावित होतात. फळ विक्रीयोग्य नसल्याने उत्पन्नात गंभीर घट होते.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या बागेचे नियमित निरीक्षण करत चला.
  • एकरी ४५ कामगंध सापळे (२-फिनाईल इथॅनॉल आणि अॅनेथॉल) ७५ फुटांच्या अंतराने लावा.
  • दर २-३ अठवड्यांच्या अंतराने आमिष बदला.
  • हवा चांगली खेळती रहाण्यासाठी झाडाच्या बुडाची छाटणी करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा