सफरचंद

सफरचंदवरील खोड किडा

Apriona cinerea

किडा

थोडक्यात

  • खोडाच्या सालीतुन राळ गळते.
  • संक्रमित झाडाच्या बुडाशी भरपूर विष्ठा सापडते.
  • पाने मरगळतात.
  • वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके

सफरचंद

लक्षणे

प्रौढ बीटल किडे कोंबांची साल खातात. संक्रमित फांदीवर, अंडी घातल्याचे चर स्पष्ट दिसतात. सहसा, मोठ्या झाडांच्या प्रत्येक फांदीवर अर्धचंद्राच्या आकाराचा एक डाग आढळतो. सालीखालच्या भागातुन जाणारे नागमोडी बोगदे अळ्यांच्या वस्तीची उपस्थिती दर्शवितात. कोवळ्या रोपात अंडी घातलेल्या भागातुन राळ गळते आणि अळीने केलेल्या सालीखालील बोगदे पाहिले जाऊ शकतात तसेच मुळतही बोगदे दिसु शकतात. जेव्हा अळ्या लहान असतात तेव्हा विष्ठेची छिद्रे लागोपाठ दिसतात पण जशा त्या आकाराने मोठ्या होऊन वयाने वाढतात तशी विष्ठेची छिद्रे थोडी लांब दिसतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

स्टिएनेर्नेमा प्रवासोस आणि हेटेरोहॅब्डिटिस प्रजातींसारखे परोपजीवी सुत्रकृमी आणि नियोप्लेक्टाना सुत्रकृमी, इलॅट्रिड किडे आणि ब्युव्हेरिया बॅसियाना सारखे नैसर्गिक शत्रु वापरा. ब्युव्हेरिया बॅसियानाला इंजेक्शनद्वारे अळ्यांच्या छिद्रात घाला. लाकडी पॅकेजिंग सामग्रीचे उपचार आयएसपीएम १५ प्रमाणे करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. १० मि.ली. मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यूएससी इंजेक्शनच्या मदतीने छिद्रात टाकून चिखलाने ते बुजवा जेणेकरुन अळ्या मरतील.

कशामुळे झाले

खोडकिड्याच्या अळ्या आणि प्रौढांमुळे नुकसान होते तरीपण, अळ्या जास्त नुकसानदायक असतात. अळ्या फिकट पिवळ्या असुन चपटे गडद तपकिरी डोके असते तर प्रौढ फिकट राखाडी असुन बुडावर अनेक काळ्या गाठी असतात. फांद्या किंवा खोडावर माद्यांनी आधीच चावुन तयार केलेल्या चरांमध्ये अंडी घातली जातात. ५-७ दिवसांनी, अंड्यातुन नव्या अळ्या बाहेर येऊन खालच्या दिशेने खोडाकडे जातात आणि पृष्ठभागावर बोगदे बनवतात, हे करताना नियमित अंतरावर छिद्र बनतात ज्यामधून विष्ठा (फ्रेस) बाहेर टाकतात. अळ्या दुधाळ पांढर्‍या, पाय नसलेल्या, लांबड्या आणि दंडाकृती आकाराच्या असतात. विष्ठेच्या छिद्रांमुळे ए. सिनेराच्या अळ्या इतर पोखरणार्‍या किड्यांच्या तुलनेत ओळखण्यात सोप्या असतात.


प्रतिबंधक उपाय

  • चांगल्या कृषी पद्धतींचा वापर करुन बागा स्वच्छ ठेवा.
  • अळ्यांनी झाडाच्या खोडात प्रवेश करण्यापूर्वीच, त्या असलेल्या फांद्यांचे निरीक्षण करुन छाटणी करा.
  • मलबेरी किंवा पेपर मलबेरी सारखे पर्यायी यजमान ज्यात ह्या किडी पक्व होतात आणि खातात, ती काढुन टाका.
  • प्रौढांना हाताने पकडुन मारा.
  • अळी असलेल्या छिद्रात लवचिक तार घालुन छिद्राच्या तोंडावर पेट्रोलमध्ये भिजवलेला कापूस घट्ट बसवा आणि मातीने लिंपा.
  • स्वच्छतेच्या सवयी म्हणजे खराब झालेली आणि संक्रमित झाडे नष्ट करणे किंवा छाटणी करणे ) यासारख्या अंतर मशागतीच्या पद्धतींचा वापर करा.
  • तसेच सापळा झाड लावा.
  • संक्रमित जागेजवळ नविन लागवड करणे टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा