सफरचंद

सॅनजोज खवले कीड

Comstockaspis perniciosa

किडा

थोडक्यात

  • प्रदुर्भावाच्या ठिकाणी किंचित खोलगट आणि लाल ते जांभळे ठिपके दिसतात.
  • फळ लहान, विकृत आणि निस्तेज असतात.

मध्ये देखील मिळू शकते

4 पिके
सफरचंद
जर्दाळू
पीच
पेयर

सफरचंद

लक्षणे

खवले कीडे फांद्या, पान आणि फळांतुन रस शोषण करतात. या प्रदुर्भावाच्या सवयीमुळे फळांवर त्याजागी लाल ते जांभळ्या प्रभावळीचा किंचित खोलगट भाग तयार होतो. जरी एकटा खवले किडा जास्त नुकसान करु शकत नसला तरी एक मादी आणि तिची पिल्ले मिळुन एकाच हंगामात हजारो खवले किडे निर्माण करु शकतात. हे कीडे विशेषत: मोठ्या जुन्या वृक्षांमध्ये राहतात जेथे फवारणी फार आतपर्यंत पोचत नाही तरीपण लहान, फवारणी केलेली झाडे देखील असुरक्षित असतात. जरी हे किडे प्रामुख्याने झाडाच्या सालीत, खपल्यांखाली आणि खाचांमध्ये जगत असले तरी बागेतील त्यांच्या उपस्थितीची लक्षणे छोट्या लाल डागांच्या रुपात फळांवर आणि पानांवर दिसतात. फळांचे नुकसान बहुधा फळांच्या बुडाशीच जास्त केंद्रीत असते. जर संक्रमण हंगामात लवकर झाले तर फळे छोटी किंवा विकृत होतात. यामुळे झाडाचा जोम, वाढ आणि उत्पादनामध्ये एकूण घट होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

सॅनजोज खवले किडींना खाणारे नैसर्गिक शत्रु जसे कि ट्वाइस स्टॅब्ड लेडी बीटल किंवा सायबोसेफॅलस कॅलिफोर्निकस शेतात सोडा. ह्याशिवाय काही छोटे चालसिड्स आणि अॅफेलिनिड वॅस्पसही खवले किडींवर परजीवीपणा करतात. कळ्या फुलण्याच्या थोड आधी किंवा फुलतानाच पण फुलांतुन फळ लागण्यापूर्वीच २% हॉर्टिकल्चरल तेलाची फवारणी करा. अॅफिटिस प्रजाती, एनकार्शिया पेरनिसिओसी आणि कोसिनेल्ला इनफेरनालिस मुलसंट भक्षक यांना जैविक नियंत्रक एजंट म्हणुन ओळखले जाते. एनकार्शिया पेरनिसियस २००० या परजीवींना उद्रेकी भागातील संक्रमित झाडात सोडा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. उशीराच्या सुप्तावस्था कालावधीत कीटकनाशक व तेलाची फवारणी करून मोठ्या प्रदुर्भावावर नियंत्रण ठेवा. कामगंध सापळ्यात पहिला नर किडा सापडताच किंवा चिकट सापळ्यावर पहिला रांगणारे पिल्लु आढळताच पायरिप्रोक्झिफेन किंवा ब्युप्रोफेझिन, नियोनिकोटिनॉइडस, ऑर्गॅनोफॉस्फेटस किंवा स्पायरोटेट्रामॅट सारखे कीट वाढ नियंत्रक असणार्‍या कीटकनाशकांचा वापर करा. जर सक्रिय रांगणारे किडे आढळत राहिले तर १० दिवसांनी परत फवारणी करा.

कशामुळे झाले

फळझाडावरील खवले किड सॅन जोजमुळे नुकसान होते. माद्या पिवळ्या, पंखहीन, मऊ आणि गोलाकार असतात. ते सुमारे १.५ -२.२ मि.मी. लांबीच्या असुन त्यांच्या पाठीवर गडद लांबडा पट्टा असतो. रांगणारी पिल्ले , पांढरी टोपी आणि काळी टोपी अशा तीन टप्प्यातून जातात. त्यांचे जीवनचक्र सुमारे ३७ दिवसांचे असते ज्यात दर वर्षी किड्याच्या दोन पिढ्या जन्म घेतात. या किडींची वाढ वसंत ऋतुत जेव्हा तापमान ५१ फॅ. वर जाते तेव्हा सुरु होते. विश्रांती घेत असलेले पिल्ला मार्चच्या मध्यावर सक्रिय होतात आणि नर एप्रिलमध्ये बाहेर पडतात. माद्या ओव्होव्हिव्हिपॅरस (शरीरातच अंडी ऊबवणारी प्रजाती) असतात आणि मेच्या मध्यावर एका महिन्यात २००-४०० पिल्लांचे प्रजनन करतात. एक सामान्य जीवन चक्र ३५-४० दिवसात पूर्ण होते आणि किडींची वाढ फुलधारणेच्या काळात सुरु होते. मादी खवले कीड गोल, काळा फुगवट्यासह किंचित उथळ असते तर नर सडपातळ असतात.


प्रतिबंधक उपाय

  • फळबागेच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राथमिकता दिली पाहिजे.
  • तण, स्वयंभू झाडे, पर्यायी यजमान आणि पिकांचे अवशेष काढल्यानेही संक्रमणाची संभावना खूप कमी होते.
  • जास्त संक्रमित फांद्या छाटा आणि जाळुन नष्ट करा.
  • प्रादुर्भावाची पातळी निश्चित करण्यासाठी सुप्तवास्थेच्या काळात झाडे काळजीपूर्वक तपासा.
  • हिवाळ्यामध्ये पाने टिकवून ठेवणाऱ्या झाडांची तपासणी करा कारण किडींच्या उपस्थितीचे हे एक चांगले संकेत आहे.
  • कामगंध सापळे लाऊन नर किड्यांची उपस्थिती तपासा.
  • झाडाच्या उत्तरेकडे आणि पूर्वेकडे, सहा ते सात फूट उंचीवर सापळे लावा आणि दर अठवड्याला त्याची तपासणी करा.
  • संक्रमित फांद्यांची छाटणी करा जेणेकरून किडींची संख्या कमी होईल आणि फवारणी आतपर्यंत पोहचेल.
  • कळ्या हिरव्या असताना आणि गुलाबी होण्यापूर्वीच डिलेड डॉर्मेंट तेलाची फवारणी करा.
  • कीटकनाशकांच्या वापराने उन्हाळ्याच्या सुरवातीला नविन ऊबलेल्या रंगणाऱ्या किडींवर नियंत्रण मिळते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा