Bagrada hilaris
किडा
पाने, फांद्या, फुलांवर खाल्ल्याने झालेले नुकसान दिसते. पतंगांनी पाने खाल्ल्याने पानांच्या दोन्ही बाजुंना पांढरे व्रण दिसतात. पातळ पानांवर पातळ, पांढरट धब्बे येतात. प्रादुर्भावित झाड मरगळते, पिवळे पडते आणि पाने वाळतात. झाडाचे शेंडे वाळतात आणि कोवळी झाडे हल्ल्यास बळी पडुन मरतात. काढणी केलेल्या पिकांवरही नुकसानाचा प्रभाव पडु शकतो. ह्या पिकांची गड्डे लहान, विक्रीयोग्य रहात नाहीत व काही वेळा गड्डेच धरत नाहीत (ज्यास "वांझ" झाड म्हणुन संबोधले जाते). प्रौढ किडे आणि अळ्या दोन्ही, झाडाच्या भागांतुन रस शोषण करतात. प्रौढ चिकट रस सोडतात ज्यामुळे पिके अधिकच खराब होतात.
बगराड हिलॅरिसच्या अंड्यांवर, ग्रायॉन, उएनसायर्टस, टेलेनोमस आणि ट्रिसोल्कस सारखे परजीवी हल्ला करतात. प्रौढ किड्यांना माशा आणि कोळी खातात. साबणाच्या द्रावणाचे फवारेही ह्या उपद्रवाविरुद्ध प्रभावी ठरले आहे. मिरची, साबण, लसुण आणि पॅराफिनचे द्रावण करुन पिकांवर फवारा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. इमिडाक्लोप्रिडने उपचारित बियाणे लावा. स्पर्शजन्य कीटकनाशके रोपांवर दुपारी आणि संध्याकाळी लवकर वापरा. पायरेथ्रॉइड, पायरेथ्रिन, नियोनिकोटिनॉइड आणि ऑर्गॅनोफॉस्फेट ह्या उपद्रवांविरुद्ध प्रभावी दिसले आहे.
बगराड हिलॅरिसच्या प्रौढ आणि अळ्यांमुळे नुकसान उद्भवते ज्यांना बगराड किंवा पेंटेड बग म्हणुनही ओळखले जाते. प्रौढ किडे काळे असुन अंगावर पांढरी आणि नारिंगी चिन्हे असतात जी ढालीच्या आकाराची असतात. किडा सुमारे ५-७ मि.मी. आकाराचा असतो. किडे त्यांच्या अंड्यांचे पुंजके पानांवर व झाडाजवळील मातीत घालतात. सुरवातीला अळ्यांना पंख नसुन रंगाने चकचकीत नारिंगी असतात. जशा त्या वाढतात, त्या लाल होतात आणि प्रौढ होईपर्यंत गडद चिन्हे विकसित होत रहातात. किडे प्रामुख्याने कोबी, फ्लॉवर आणि केलसारख्या कोबीवर्गीय (ब्रासिका) कुटुंबातील झाडांना प्रभावित करतात. ही झाडे बहुधा पाण्याचा अभाव आणि गर्मीने त्रासतात. किडे ह्या झाडांच्या पानातुन रस शोषण करुन मोठ्या संख्येने प्रादुर्भावित करतात.