Crocidolomia binotalis
किडा
पानांभोवती रेशमी जाळे दिसण्याच्या वैशिष्ट्यातुन प्राथमिक लक्षणे नजरेस पडतात. पानांचे फक्त सांगाडेच उरणे हे उपद्रवाचे लक्षण आहेत. कोबीची आतली पानेदेखील बहुधा प्रभावित होतात. ते फुलांच्या कळ्या देखील खातात आणि शेंगांमध्ये फक्त आत शिरल्याची छिद्रे शिल्लक रहातात. सुरवंटांची विष्ठा कोबीच्या पानांवर आणि गाभ्यातही दिसुन येते. पानांच्या खालच्या बाजुला अंडी सापडतात. पानांना झालेल्या नुकसानामुळे प्रभावित झाडाचे स्वास्थ्य कमी होते.
बॅसिलस थुरिंगिएनसिसचा वापर (फक्त संध्याकाळीच वापरा) नुकसान दिसताक्षणीच करा. झाडाच्या सर्व भागांवर काळजीपूर्वक फवारणी करा जेणेकरून सुरवंट ते खाऊन मरतील. अंडी बॅसिलस थुरिंगिएनसिस संवेदनशील नसतात पण छोट्या अळ्या, मोठ्या अळ्यांपेक्षा जास्त संवेदनशील असतात. निंबोळीची ताजी पाने, लेमनग्रास,आला किंवा अन्य जैविक कीटकनाशकांचा वापर १ ली. प्रति १५ ली. पाणी या प्रमाणे करावे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. विस्तृत श्रेणीची कीटकनाशके (जसे कि पायरेथ्रॉइडस आणि ऑर्गॅनोफॉस्फेटस) वापरणे टाळा कारण ते नैसर्गिक भक्षकांचाही नाश करतील. फोसालोन, फेनव्हॅलरेट, सायपरमेथ्रिन किंवा डेल्टामेथ्रिनसारख्या कीटकनाशकांची फवारणी करा. समान पद्धतीने काम करणारी कीटकनाशके परत वापरु नका.
क्रोसिदोलोमिया बिनोटालिस च्या अळ्यांमुळे नुकसान होते. अळ्या क्वचितच रोपांवर हल्ला करतात पण झाडाच्या सर्व टप्प्यावर ते उपद्रव करू शकतात. कोबीच्या बाहेरच्या पानांच्या खालच्या बाजुला ४०-१०० च्या पुंजक्याने अंडी घातली जातात. सुरवातीला ती फिकट हिरवी दिसतात आणि नंतर ऊबण्याच्या थोड आधी ठळक पिवळी आणि तपकिरी होतात. नविनच ऊबुन निघालेले सुरवंट सुमारे २ मि.मी. लांब असतात आणि २० मि.मी. पर्यंत वाढतात पूर्ण वाढीनंतर त्यांवर लांब केस असतात. नंतरच्या अवस्थेत ते पानांवर जाड जाळी विणतात आणि त्याखाली बसुन उपद्रव करतात. पतंग बहुधा रात्रीच्या वेळी सक्रिय असतात आणि पिकाच्या सुरवातीच्या काळापासुन ते काढणीच्या काळापर्यंतच्या कोणत्याही टप्प्यावरील पिकांचा फडशा पाडतात. हे मुळा, मोहरी, सलगम आणि अन्य कोबीवर्गीय पिकांवर प्रादुर्भाव करतात. त्यांच्या विष्ठेमुळे भाजी खाण्यायोग्य रहात नाही.