Hellula undalis
किडा
सुरवंट कोवळ्या रोपांचा नाश करतात. छोटे सुरवंट पानात खणतात व खोडाला, पानांना आणि शिरांना पोखरतात. ते पानांना बाहेरुन खातात. अळ्या कोबीत पोखरुन झाडाच्या मध्यापर्यंत पोचुन मुख्य फुटव्यांचाच नाश करतात ज्यामुळे कोबी लागत नाही. कोबीच्या जुन्या झाडात, नविन फुटवे येतात आणि हल्ला केलेल्या झाडांना अनेक लहान कोबी लागतात ज्यांना काहीच बाजारमूल्य नसते. सुरवंटाच्या कोबी खाण्यामुळे वाढ खुंटते. ते खाताना रेशमी नळ्या बनवितात. झाडांची मर होते व प्रभावित झाडाच्या भागातुन विष्ठा बाहेर येते. मुख्य फुटव्याला नुकसान झाल्यामुळे संक्रमित झाडांना बहुधा पानांचे अनेक लहान गुच्छ लागतात आणि बाजुने फांद्या विकसित होतात.
परजीवी वॅस्पस जसे कि ब्रॅकोनिड, इक्न्युमोनिड आणि चालसिडॉइड वॅस्पस वापरा. बॅसिलस थुरिंगिएनसिसची शिफारस केली जाते आणि अळ्या त्यांच्या संरक्षक रेशमी कोशात जाण्यापूर्वी आणि त्या कोबीच्या मध्यापर्यंत पोचण्यापूर्वीच वापर करावा. नीमचा वापर दर अठवड्याला केला असताही प्रभावी ठरतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आपल्या झाडांना कीटकांपासून बचाव करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करणे कठीण आहे कारण त्यांचे संरक्षण जाळ्यांनी होते किंवा ते पिकांच्या आत शिरलेले असतात. अॅसेफेट आणि परमेथ्रिनचा वापर ८-१० दिवसांच्या अंतराने करावा. कार्बामेटस आणि ऑर्गनो-फॉस्फेटसचा पतंग दिसताक्षणीच झाडांवर वापर केल्याने पतंगांचे नियंत्रण झाले आहे.
हेलुला अंडालिस च्या सुरवंटांनी ब्रासिका कुटुंबातील (कोबी, फुलकोबी) पिकांना खाल्ल्यामुळे लक्षणे उद्भवतात, जे उष्णकटिबंधीय आणि उपउष्णकटिबंधीयातील अग्रणी आहेत. अंडी अंडाकृति असतात आणि एकेकटी किंवा पुंजक्याने तसेच काही वेळा साखळीनेही घातली जातात. सुमारे तीन दिवसांनी अंडी ऊबतात आणि पाच विकसन टप्प्यांतुन जाऊन अळ्या मोठ्या होताना राखाडीसर पिवळ्या असतात आणि त्यांवर गुलाबीसर लांब पट्टे असतात. सुरवंट फिकट पांढरे असुन फिकट गुलाबीसर तपकिरी पट्टे शरीरावर असतात आणि डोका काळा असतो. प्रौढ सुरवंटांवर फिकट पट्टे असतात. अखेरच्या टप्प्यावर सुरवंट १२-१५ मि.मी. लांबीचे असुन रेशमी कोषाच्या आतुन खातात. पुढचे पंख बहुधा राखाडीसर तपकिरी असुन त्यावर नागमोडी रेषा आणि काळे डाग असतात. प्रौढ पतंग राखाडीसर तपकिरी असुन छोटे आणि खर तर नाजुक असतात. त्यांच्या पंखांचा विस्तार १८ मि.मी. पर्यंत असु शकतो. ऊबुन बाहेर येऊन संभोगानंतर, माद्या सुमारे १५० किंवा जास्त अंडी पुढच्या ३-१० दिवसात घालतात. प्रौढ पतंग लांब अंतरापर्यंत उडू शकतात.