आंबा

आंब्यावरील मिजमाशी

Procontarinia

किडा

थोडक्यात

  • पाने, कळ्या, फुटवे आणि कोवळ्या फळांवर छोटे मश्श्यासारखे धब्बे पसरतात.
  • पानांखाली आणि फळ फांद्यांवर बाहेर निघाल्याची छिद्रे दिसतात.
  • पाने विकृत झाल्यासारखी दिसतात आणि अकाली गळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

आंबा

लक्षणे

लक्षणे प्रामुख्याने पानांवर दिसतात पण क्वचित कळ्यांवर, फुलांवर आणि कोवळ्या फळांवरही दिसतात. या मिजमाशीने संक्रमित केलेल्या भागांवर अनेक छोटे, उंचावलेल्या गाठी किंवा फोड दिसतात. प्रत्येक मश्श्यासारखा दिसणारा फोड किंवा गाठ सुमारे ३-४ मि.मी. आकाराची असुन त्यात पिवळी अळी असते जी झाडाच्या पेशींना खाते. सुरवातीच्या टप्प्यांवर अंडी घातलेली जागा छोट्या लाल ठिपक्यांसारखी दिसतात. जास्त प्रभावित झालेली पाने विकृत होतात आणि त्यांचे प्रकाशसंश्लेषण कमी होऊन अकाली गळतात. संक्रमित फुल उमलत नाहीत. पानांच्या खालच्या बाजुला बाहेर पडण्याची बारीक छिद्रेच फक्त अळ्यांच्या असण्याचा संकेत देतात. या छिद्रातुन बुरशीचे दुय्यम संक्रमण होते. कोवळ्या फळात देखील देठाच्या बडाशी अशी बाहेर पडल्याची छिद्रे दिसतात. गंभीरपणे संक्रमित झालेल्या आंब्याच्या फुटव्यांना बहुधा फुलधारणा होत नाही, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

द फॉल वेबवर्म, टेट्रास्टचस प्रजाती प्रोकॉन्टारिनिया प्रजातीच्या अळ्यांना खाते आणि म्हणुन उपद्रवाचे नियंत्रण केले जाऊ शकते. अन्य परजीवी प्लॅटिगास्टर प्रजाती, अप्रोस्टोसिटस प्रजाती आणि सयस्टासिस डासयन्युरे आहेत. निंबोळीच्या अर्काची फवारणी झाडीवर करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कीटकनाशकांच्या जास्त वापराने प्रतिकार निर्माण होईल आणि नैसर्गिक शत्रुही मरतील. फेनिट्रोथियॉन ०.०५%, डायमिथोएट ०.०४५% ची फवारणी कळ्या उमलुन फुलधारणेचा काळ सुरु होण्याच्या वेळी वापरले तर उपद्रवाचे नियंत्रण प्रभावी होते. बायफेनथ्रिन (७० मि.ली. प्रति १०० ली.) वापरल्यासही समाधानकारक परिणाम मिळतात. फुलोर्‍यापासुन ते फळे वाटाण्याच्या आकाराची होईपर्यंत दर ७-१० दिवसांनी फवारणी करावी. डायमेथोएटची फवारणी देखील प्रोकॉन्टारिनिया प्रजातीची लोकसंख्या कमी करण्यासाठी वापरण्यात आले आहेत.

कशामुळे झाले

मिजमाशीच्या विविध प्रजातींमुळे लक्षणे उद्भवतात, प्रोकॉन्टारिनिया प्रजातीचे प्रौढ १-२ मि.मी. आकाराचे असतात आणि कोषातुन बाहेर येऊन संभोगानंतर अंडी घातल्यापासुन २४ तासात मरतात. झाडाच्या बहुतेक सर्व भागांत अंडी घातली जातात पण प्रामुख्याने ती पानांवर आढळतात. जेव्हा ते उबतात, तेव्हा अळ्या ऊतींमध्ये प्रवेश करतात आणि ते ज्या भागावर परिणाम करतात त्यानुसार नुकसान होते. प्रभावित फुलांचे भाग वाळतात आणि जास्त उपद्रवामुळे गळतात. मोठ्या अळ्या जमिनीच्या वरच्या थरात जातात किंवा पडतात जिथे त्या कोषावस्थेत जातात. कोषातुन प्रौढ बहुधा दुपारच्या वेळी बाहेर येतात आणि २० अंशाचे थंड तापमान तसेच ६०-८२% सापेक्ष आर्द्रता अनुकूल असते. उत्तर गोलार्धात जानेवारी ते मार्चच्या दरम्यान उपद्रवाच्या ३-४ पिढ्या होऊ शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • सहनशील किंवा प्रतिकारक वाण लावा.
  • मिजमाशीच्या संक्रमण चिन्हांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • खास करुन जर लोकसंख्या जास्त नसेल तर किड्यांना हाताने वेचुन काढा.
  • शेतातुन कचरा आणि गळलेल्या फांद्या वगैरे काढुन टाका.
  • शेतातुन आणि आजुबाजुने नियमितपणे तण काढा.
  • हंगामात संक्रमित फांद्या छाटा.
  • आंब्याच्या बागेत आंतरपीक घेऊन लोकसंख्या पातळी कमी करा.
  • पिवळे चिकट सापळे लाऊन माशांना पकडा.
  • जमिनीवर प्लास्टिक अंथरुन अळ्यांना जमिनीवर पडुन कोषात जाण्यास किंवा कोषातुन बाहेर येणार्‍या किड्यांचा प्रतिबंध करा.
  • कोष आणि अळ्या ऊन्हाने मरण्यासाठी नियमित मशागत करुन त्यांना बाहेर काढा.
  • झाडाची संक्रमित सामग्री हंगामात गोळा करुन जाळा.
  • संक्रमित रोप किंवा फळे नव्या ठिकाणी किंवा बाजारात नेऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा