Batocera rufomaculata
किडा
काटक्यांच्या साली चावल्या जातात आणि वाढणारे कोंब खाल्ले जातात. साल फाटुन लोंबते. गंभीर संक्रमणात लाकुड इतके अशक्त होते कि फांद्या तुटतात किंवा मुख्य फांदीच कोसळते. फांद्या किंवा पूर्ण झाडच मरगळलेले दिसते. खोडाच्या सालीतील फटीत किंवा झाडाच्या बुडाशी विष्ठा टाकलेली दिसते. खोडाच्या सालीत बाहर निघण्याची छिद्रे संक्रमणाचे संकेत देतात. झाडी आणि फळ उत्पादनही संक्रमणाने प्रभावित होते आणि उत्पन्नाचेही नुकसान होते. अळ्यांमुळेच बहुतेक नुकसान होते ज्या सुरवातीला झाडाच्या सालीत पोखरतात आणि नंतर झाडाच्या गाभ्यात खोलपर्यंत जातात. प्रौढ वाढणारे हिरवे कोंब आणि फांद्याच्या साली चावतात. जाडजूड अळ्या खोडाच्या किंवा फांद्यांच्या नव्या मऊ साली खातात. त्या मग ह्या मऊ सालींच्या भागात अनियमित पोखरुन बोगदे तयार करतात आणि आतील झाडाचे वाहक भाग खातात ज्यामुळे झाडाच्या इतर भागापर्यंत पोषण आणि पाणी पोचत नाही. कोंब सुरवातीच्याच टप्प्यांवर अकालीच मरतात. पुष्कळ ठिकाणांतुन विष्ठा बाहेर येते आणि काही वेळा छिद्रातुन झाडाचा रसही गळतो. फांद्या किंवा कोवळे रोप असेल तर पूर्ण रोपही मरगळते. किंवा एकाच झाडात जर मोठ्या संख्येने जाडजूड अळ्या असल्या तरी झाड मरगळते.
उपद्रव व्यवस्थापनासाठी मेटार्हिझियम अॅनिसोप्लिये किंवा बिव्हेरिया बॅसियानाचा वापर केला जाऊ शकतो.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ऑर्गॅनोफॉस्फेटसारख्या कीटनाशकांचा वापर मुख्य खोडावर, फांद्यांवर आणि बाहेर आलेल्या मूळांवर करायला हवा जिथे प्रौढ बीटल्स दिसुन आले आहेत. आत शिरण्याची छिद्रे साफ करुन त्यात डायक्लोरव्होस (०.०५%) किंवा कार्बो्युरान (३ ग्राम प्रति छिद्र) चे मिश्रणात भिजविलेला कापूस घालुन बंद करा आणि वरुन माती लिंपा. बोगद्यात लपलेल्या अळ्यांना त्याच स्थितीत मारण्यासाठी व्होलाटाइल (बाष्प होऊन जाणारा) द्रव किंवा धुरी देणारा पदार्थाचे इंजेक्शन दिले जाते. जमिनीपासुन एक मीटर उंचीपर्यंत खोडावर बोरडॉक्स खळ लावा ज्यामुळे अंडी घालण्यास प्रतिबंध होतो. मोनोक्रोटोफॉस (३६ डब्ल्यूएससी १० मि.ली. प्रति २.५ सें.मी. / झाड) मध्ये कापूस भिजवुन खोडाला गुंडाळा. जर संक्रमण फारच जास्त असेल तर कॉपर ऑक्झिक्लोराइडची खळ झाडाच्या खोडावर लावा.
बॅक्टोसेरा र्युफॉमॅक्युलाटाच्या प्रौढ आणि अळ्यांमुळे नुकसान उद्भवते. बीटल्स सुमारे २५-५५ मि.मी. लांबीचे असुन लांब मिशा असतात तसेच ते निशाचर असतात. माद्या बीटल्स नुकसानीत किंवा ताणयुक्त झाडाच्या सालींना कापतात आणि तिथे अंडी घालतात किंवा माती वाहून गेल्याने उघड्या पडलेल्या मूळांत घालतात. अळीच्या नंतरच्या जीवन टप्प्यावर ते लाकडात खोल पोखरुन आतच कोषात जातात. बाहेर निघण्याच्या छिद्रातुन नंतर प्रौढ बाहेर येतात आणि काटक्यांच्या साली तसेच वाढणारे कोंब खातात. प्रौढ सुमारे ३-५ सें.मी. लांबीचे, राखाडीसर तपकिरी असुन त्यांच्या छातीच्या दोन्ही बाजुला २ यकृताच्या आकाराचे नारिंगीसर पिवळे डाग असतात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या दुधाळ रंगाच्या असुन डोके गडद तपकिरी असते आणि सुमारे १० सें.मी.पर्यंत लांबीच्या असतात. अळ्यांची वाढ होण्यासाठी बहुधा एक वर्षापेक्षा जास्त काळ लागतो. अळ्या मऊ सालींना पोखरतात आणि त्यांच्या आकारामुळे निर्माण होणार्या मोठ्या बोगद्यांनी झाडीवर आणि फळ उत्पादनावर विपरित परिणाम होतो. फांद्यांच्या आतच त्या कोषात जातात आणि उन्हाळ्यात उशीरा प्रौढ बाहेर येतात. ते निशाचर असुन पुष्कळ महिने जगतात आणि लांब अंतरांपर्यंत उडु शकतात ज्यामुळे त्यांचा प्रसार चांगला होतो. ह्या उपद्रवाची फक्त एकच पिढी प्रत्येक वर्षी होते.