Oecophylla smaragdina
किडा
पांढर्या कागदासारख्या पदार्थाने पाने एकत्र विणुन मुंग्यांची घरटी बनतात. ही मानवी मुठी इतकी किंवा हाताएवढी मोठी असतात. घरट्याच्या जवळ मावे किंवा खवले असु शकतात. ह्यांना त्यांच्या असामान्य घरटे रचनेसाठी ओळखले जाते. अगदी योग्य समायोजन करुन विणकर मुंग्या एका रांगेने हव्या त्या ठिकाणी घरट्यासाठी पाने खेचुन, वळवुन धरतात. मग मुंग्या त्यांच्याच अळ्यांकडुन रेशिम मिळवतात आणि घरटे बनविण्यासाठी पाने विणतात. एकाच झाडावर एकाच वेळी पुष्कळशी घरटी असु शकतात.
अगामा अगामा, जिओकोरिस ऑक्रोप्टेरस, निफोपायरॅलिस चियोनेसिस सारखे नैसर्गिक भक्षक आणि स्मिक्रोमोर्फा केरालेन्सिस सारखे परजीवींच्या मदतीने उपद्रवाची लोकसंख्या नियंत्रित करता येते. बॅसिलस थुरिंगिएनसिसचा वापर करुनही उपद्रवाच्या घटना कमी करण्यात यश मिळते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. डायमेथोएट १.५ मि.ली. प्रति ली. सारखे स्पर्शजन्य कीटनाशकांचा वापर घरटे हलविल्यानंतर करावा. विणकर मुंग्या जैव एजंट अशल्याने फक्त घरटी नष्ट करण्यासाठीच रसायनिक फवार्यांचा वापर करावा.
ओकोफिला स्माराग्डिना नावाच्या विणकर मुंग्यांमुळे लक्षणे उद्भवतात. त्यांच्या राणीच्या हिरव्या रंगामुळे त्यांचे हे नाव पडले आहे. ह्या मुंग्या इतर छोथ्या किड्यांना किंवा आर्थ्रोपॉड (विशिष्ट प्रकारचे किडे) खात असल्यामुळे त्यांना इतर उपद्रवांविरुद्ध जैव नियंत्रण म्हणुनही वापरले जाते. त्या मधाळ रस खाण्यासाठी मावे आणि खवल्यांसह परस्पर संबंध ठेवत असल्याने अप्रत्यक्ष नुकसानही करु शकतात. त्यांच्या वस्त्या मोठ्या म्हणजे सुमारे अर्धा मिलियन मुंग्या असणार्याही असु शकतात ज्यात कामकरी मुंग्या सुमारे ५-६ मि.मी. किंवा ८-१० मि.मी. इतक्या मोठ्या आणि नारिंगी रंगाच्या असतात. रेशिम देणार्या अळ्यांची मदत घेऊन घरटी रात्रीच्या वेळी विणली जातात. आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पश्र्चिमी पॅसिफिक सारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात विणकर मुंगा सामान्यपणे आढळतात. ओकोफिला स्माराग्डिनाने डंख केल्यास फार वेदनादायक असते. विणकर मुंग्या विशेषपणे सुमारे २०-२५मि.मी. लांबीच्या असतात. त्या बहुधा हिरवट तपकिरी असतात. त्या त्यांच्या हद्दीसाठी फार आक्रमक असतात आणि कृषी उपद्रवाच्या नियंत्रणासाठी त्यांना पुष्कळ वर्षांपअसुन वापरण्यात येत आहे. विणकर अळ्यांची पकड फार मजबुत असते आणि त्या फार ताकदीच्याही असतात.