आंबा

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी

Orthaga euadrusalis

किडा

थोडक्यात

  • पानांच्या पृष्ठभागावर खरचटलेले दिसते.
  • कोवळे कोंब आणि पाने एकत्र विणले जातात.
  • पाने कोरडी आणि तपकिरी दिसतात.
  • काळे व पांढरे रुंद पट्टे असणारी हिरवट अळी असते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

आंबा

लक्षणे

पानांवर लक्षणे जास्त ठळक असतात. अळ्या कोवळी पानांचे पृष्ठभागांवरील शिरांमधील भाग खरबडुन खातात. मग त्या पानांना आधाशीपणे खातात आणि मध्यशीर तसेच इतर शिरांचे फक्त सांगाडेच उरतात. परिणामी कोरडे, जाळी झालेल्या आणि वाळलेल्या पानांचे गुच्छच दिसतात. गंभीर संक्रमणात, फांद्या वाळतात ज्यामुळे प्रकाशसंश्र्लेषणात बाधा येते. प्रभावित भाग रोगट दिसतात आणि त्यांच्या तपकिरी, कोरड्या तसेच गुच्छ झालेल्या पानांमुळे सहज ओळखता येतात. फुलांचे देठ तयार होणे प्रभावित होते व ज्यामुळे फुलांवर आणि फळधारणा प्रक्रियेवरही प्रभाव पडतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पाने गुंडाळणारी अळीवर परजीवीपणा करणारे नैसर्गिक शत्रु जसे कि ब्राचिमेरिया लॅसस, हॉर्मियस प्रजाती पेडियोबियस ब्रसिसिडा आणि काराबिड बीटल तसेच रेडुविद बगसारखे नैसर्गिक भक्षकांचा वापर करा. जास्त आर्द्रता असताना ब्युव्हेरिया बॅसियानाची फवारणी २-३ वेळा करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉसच्या (०.०५%)च्या ३ फवारण्याची शिफारस केली जाते. लँब्डा सायहॅलोथ्रिन ५ इसी (२ मि.ली) किंवा क्लोसोपायरिफॉस (२ मि.ली) , अॅसेफेट (१.५ ग्राम प्रति लिटर पाणी) याप्रमाणे फवारणी करावी.

कशामुळे झाले

ऑर्थागा युड्रुसॅलिस च्या अळ्यांमुळे नुकसान होते. पतंगांच्या माद्या पिवळसर हिरवी निस्तेज रंगाची अंडी आंब्याच्या पानांवर घालतात जी बहुधा एका अठवड्यात ऊबतात. हवामान परिस्थितीप्रमाणे अळी अवस्था १५ आणि ३० दिवसांची असते कारण अळीचे फक्त पाचच टप्पे असतात. शेवटच्या टप्प्यानंतर अळ्या विणलेल्या जाळ्यातच कोषात जातात पण धक्का लागल्यास जमिनीवर पडतात आणि तिथेच आपली कोषावस्था घालवतात. तापमानाप्रमाणे कोषावस्था सुमारे ५-१५ दिवस टिकते. दाट लागवड झालेल्या बागेत सामान्यपणे लागवड केलेल्या तसेच झाडी नियंत्रित केलेल्या बागांपेक्षा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो. किड्यांचे संक्रमण बहुधा एप्रिल महिन्यात सुरु होते आणि डिसेंबरपर्यंत चालूच रहाते. सापेक्ष आर्द्रता लक्षणीयपणे पाने गुंडाळणारी अळीच्या संख्येशी संलग्नित आहे.


प्रतिबंधक उपाय

  • बागेची महिन्यातुन एकदा निरीक्षण करा.
  • संक्रमित कोंब हाताने काढुन जाळा.
  • झाडांच्या बुडाशी मशागत करुन गुंडाळलेली, प्रभावित पाने काढुन टाका.
  • दाट झाडीची छाटणी अशाप्रकारे करावी जेणेकरून ऊन आणि हवा सर्व बाजुंनी आतपर्यंत पोचेल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा