डाळिंब

डाळिंबाची फळे पोखरणारा अळी

Deudorix Isocrates

किडा

थोडक्यात

  • सुरवातीच्या काळात फळे निरोगी दिसतात.
  • नंतर फळे कुजून गळतात.
  • निळसर तपकिरी फुलपाखरे.
  • पूर्ण वाढलेल्या अळ्या गडद तपकिरी रंगाच्या असुन बारीक केस आणि पांढरे चट्टे असतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके

डाळिंब

लक्षणे

संक्रमणाच्या पुढच्या टप्प्यावरच लक्षणे बहुधा दिसतात. कळ्या आणि फळे मुख्यत: प्रभावित होतात. फळे पहिल्यांदा निरोगी दिसतात कारण आत शिरण्याची छिद्रे फळांच्या रसाने भरतात. जेव्हा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा अळ्यांच्या टप्प्यांची छिद्रे ओळखता येतात कारण ती अळीच्या शेवटच्या भागाद्वारे झाकली जातात. पूर्ण वाढ झालेली अळी फळाच्या जाड सालीला पोखरुन बाहेर पडते आणि जाळे विणते जे फळ किंवा देठ मुख्य फांदीला बांधते. प्रभावित फळांवर अखेरीस बुरशी आणि जीवाणूंचा हल्ला होतो ज्यामुळे कूज होते आणि शेवटी फळगळ होते. फळातल्या सुरवंटांच्या विष्ठेमुळे घाण वास येतो. आत जाण्याच्या छिद्रातुन विष्ठा बाहेर येऊन वाळते ज्यामुळे फळ मानवी वापरासाठी निरुपयोगी ठरते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ट्रायकोग्रामा प्रजातीचे परिजीवी या उपद्रवाच्या नियंत्रणात प्रभावी ठरले आहेत. त्यांना १.० लाख प्रति एकर याप्रमाणे १० दिवसांच्या अंतराने चार वेळा सोडा. त्यांना शेताच्या मध्यावर आणि कडेने सोडले जाऊ शकते. डी. आयसोक्रेटसचे लेसविंग, लेडीबर्ड बीटल, कोळी, लाल मुंग्या, नाकतोडे, रॉबर फ्लाय, रेडुविड बग आणि प्रेईंग मँटिस हे भक्षक आहेत. आणखीन वॅस्पसच्या प्रजाती, बिग आईड बग (जियोकॉरिस प्रजाती), इयरविग, ग्राऊंड बीटल, पेन्टातोमिड बग (इयोकँथेकोना फ्युरसेलाटा) हे ही फळ पोखरणार्या् अळीविरुद्ध प्रभावी म्हणुन अहवाल आहेत. पक्षांच्या जाती देखील सुरवंटांना खातात. फुलांखालचा हिरवा पुष्पकोष जर परागीकरणानंतर लगेच काढला जावा कारण फळे पोखरणारे किडे यातच अंडी घालतात आणि यानंतर नीम तेल (३%) फुलधारणेच्या काळात वापरले जावे. फुलाच्या बुडाशी स्वच्छ मातीचा (ऊन्हात तापवलेली) थर दिल्याने किड्यांपासुन संरक्षण होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. फुलधारणेच्या काळात अॅझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम ला ३ मि.ली. प्रति ली. पाणी याप्रमाणे फुलधारणेच्या सुरवातीपासुन ते काढणीपर्यंत दर १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. खालीलपैकीही एक रसायन फवारा: डायमेथोएट २ मि.ली, इंडोक्साकार्ब १ ग्राम, सायपरमेथ्रिन १.५ मि.ली किंवा प्रोफेनोफॉस २ मि.ली. प्रति ली. पाण्यात मिसळुन फुलधारणेपासुन ते फळ विकसनापर्यंत दर १५ दिवसांनी फवारणी करावी. डाळिंबाला पोखरणार्‍या अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी लँब्डा सायहॅलोथ्रिनच्या रसायनिक उपचारांची शिफारस केली जाते. इमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ला ०.२५ ग्राम किंवा स्पनोसॅड ४५ एससी ला ०.२० मि.ली. प्रति ली. पाणी याप्रमाणे वापर केल्यास फळ नुकसान फारच कमी होणे नोंदविले गेले आहे.

कशामुळे झाले

ड्युडॉरिक्स आयसोक्रेटस च्या अळ्यांमुळे डाळिंबाचे नुकसान उद्भवते ज्यांना सामान्यपणे अनार फुलपाखरु किंवा डाळिंबाच्या फळांना पोखरणारी अळी म्हणुन ओळखले जाते. हा डाळिंबाच्या फळांवरील सर्वात जास्त नुकसान करणारा उपद्रव आहे. फुलपाखरे दिवसा सक्रिय असतात आणि फळांवर, कोवळ्या पानांवर, कळ्यांवर आणि फुलांच्या फांद्यावर एकेकटी अंडी घालतात. नियंत्रित परिस्थितीत एक मादी २०.५ अंडी म्हणजेच सरासरीने ६.३५ अंडी देते. डी. आयसोक्रेटसचे अंड्यांपासुन ते प्रौढ बाहेर येईपर्यंतचे जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी ३३-३९ दिवस लागतात. ऊबल्यानंतर अळ्या स्वत: वाढती फळे पोखरुन आत शिरतात आणि गर, वाढणारे दाणे आणि भाग खातात. खाण्याचे नुकसान सुमारे ३०-५० दिवसांच्या काळात होते. डाळिंबावरील फुलपाखरांच्या घटना जुलै महिन्यात सर्वात गंभीर असतात आणि सापेक्ष आर्द्रतेशी यांचा घनिष्ठ संबंध असतो. मार्चमध्ये या घटना कमी असतात आणि हळुहळु वाढत सप्टेंबरमध्ये उच्ची गाठतात.


प्रतिबंधक उपाय

  • वाळलेल्या फांद्यांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • प्रकाश सापळे एकरी एक याप्रमाणे लावुन प्रौढ फुलपाखरांचे निरीक्षण करा.
  • प्रभावित फळे गोळा करुन शेतापासुन दूर नेऊन नष्ट करा.
  • परागीकरणानंतर लगेच फुलांच्या खालील हिरवे कोश काढल्याने फळांवरील अंड्यांचा भार आणि नुकसान कमी होते.
  • पर्यायी यजमान असणारे तण आणि झाड काढा.
  • फळांना सुरुवातीच्या काळातच (जेव्हा ती सीए.
  • ५ सें.मी.
  • मोठी असतात) तेव्हाच त्यांना बटर पेपर, जाड कापडा किंवा ३०० गेजच्या मलमलीच्या कापडात गुंडाळा जेणेकरून फळ पोखरणार्‍या अळीला अडथळा निर्माण होईल.
  • काढणीनंतर लगेच डाळिंबाच्या झाडाच्या बुडाशी मशागत करुन कोषांना शिकारी पक्षांसाठी आणि इतर नैसर्गिक शत्रु आणि उन्हात उघड्यावर आणा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा