वांगी

कळीवरील भुंगेरे

Scrobipalpa sp.

किडा

थोडक्यात

  • कळी आणि शेंडे आक्रसुन गळतात.
  • पाने वाकतात आणि मरगळतात.
  • मृत गाभ्याची लक्षणे दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके
वांगी
बीट
तंबाखू

वांगी

लक्षणे

कळ्या, फुल आणि झाडाच्या फांद्यावर लक्षणे दिसतात. झाडाचे शेंडे वाढीच्या सुरुवातीच्या काळात संक्रमित झाल्यास मरगळुन वाळतात. मोठ्या झाडांची वाढ खुंटते. कळ्यांच्या आक्रसण्याने आणि गळण्याने फळधारणा प्रक्रियेवर गंभीर प्रभाव पडतो. पाने मरगळलेली आणि वाळलेली दिसतात. फुटव्यांवर आणि फळांवर पोखरण्याची छिद्रे दिसतात जी विष्ठेने बंद होतात. कळ्यातील किडे खोड पोखरून शेंडेमर करतात ज्याला मृत गाभा असेही संबोधले जाते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

परजीवीत मायक्रोगॅस्टर प्रजाती, ब्रॅकॉन किचेनेरि, फिलेयांटा रुफिकँडा, चेलोनस हेलयोपा येतात व यांचा वापर कळ्यातील किड्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. अळ्यांवर परजीवीपणा करणार्‍या प्रिसोमेरस थेस्टाशियस आणि क्रेमास्टस फ्लाकुरबिटॅलिसना चालना द्या. ब्रोस्कस पंक्टॅटस, लियोग्रिलस बायमॅक्युलॅटस सारख्या नैसर्गिक शत्रुंना प्रोत्साहन दिले पाहिजे. निंबोळी अर्क ५% याप्रमाणे किंवा नीम तेल असणारे अॅझाडिरॅक्टन इसी ची फवारणी करा. बॅसिलस थुरिंगिएनसिस, ब्युव्हेरिया बॅसियाना (एन्टोमोपॅथोजेनिक बुरशी) वर आधारीत उत्पादांना उपद्रव दिसताक्षणीच वापरले जाऊ शकते आणि गरज भासल्यास परत वापरावे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जेव्हा ३-१०% कोवळी रोपे प्रभावित होतात तेव्हाच त्यांच्याविरुद्ध काम करा आणि अनावश्यक फवारणी तसेच विस्तृत श्रेणीची कीटकनाशके टाळा कारण त्यामुळे मित्र किडी देखील प्रभावित होतील. फळे पक्व होण्याच्या आणि काढणीच्या वेळी फवारणी करु नका. क्लोरपायरिफॉस, इमॅमेक्टिन बेन्झोनेट, फ्ल्युबेंडियामाइड, इंडोक्साकार्बवर आधारीत कीटकनाशकांचा वापर उपद्रवाच्या नियंत्रणासाठी केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

स्क्रोबिपाप्ला (ब्लाप्सिगोना प्रजाती) च्या अळ्यांमुळे मुख्य नुकसान उद्भवते. पतंग मध्यम आकाराचे असुन त्यांचे पंख पांढरट ते तांब्यासारख्या लाल झालरीचे असतात. पुढचे पंख पांढरट तपकिरी तर पाठचे पंख फिकट राखाडी असुन थोड्याफार पांढरट छटेचे असतात. सुरवातीला त्यांच्या अळ्या फिकट असुन गुलाबी छटा असते, डोक आणि छाती गडद तपकिरी असुन त्या तपकिरी सुरवंटात बदलतात. कोवळ्या रोपांच्या खोडात पोखरुन त्या आत शिरतात आणि आतील भाग खातात. ह्यामुळे खोडावर गाठी येतात, बाजुने फांद्या फुटतात, वाढ खुंटलेली किंवा विकृत असते आणि झाड मरगळलेली असतात. जेव्हा कळ्यातील किडा कळ्यांना पोखरतो तेव्हा फुलगळ होते आणि ज्यामुळे झाडाला जास्त फळे लागत नाहीत. हे सुरवंट संध्याकाळच्या वेळी उपद्रव करतात आणि तंबाखुवरील महत्वाची किड मानले जातात.


प्रतिबंधक उपाय

  • पिकाचे अठवड्यातुन दोनदा, खास करुन रोपाच्या वाढीच्या काळात अंडी आणि अळ्यांसाठी निरीक्षण करा.
  • सामान्यपणे सुरवंटानी झाड पोखरुन आत जाण्यापूर्वीच त्यांना शोधुन जास्त प्रादुर्भावाचा प्रतिबंध करणे सोपे असते.
  • अळ्या आणि अंड्यांना हाताने वेचुन नष्ट करा.
  • प्रौढ पतंगांना आकर्षित करुन त्यांचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांना मारण्यासाठी कामगंध १२ सापळे आणि एक प्रकाश सापळा प्रति हेक्टर याप्रमाणे लावा.
  • जंगली फुले आणि ज्वारी शेताच्या आजुबाजुने लावल्यास कळीतील किड्यांचे नैसर्गिक शत्रु आकर्षित होतील.
  • गादीवाफ्यातुन आणि शेतातुन झाडाचे प्रभावित भाग आणि तण ( खास करुन सोनेसियस तण) काढुन नष्ट करा.
  • काढणीनंतर झाडांचे अवशेष उपटुन जाळुन नष्ट करा.
  • जीवनचक्र तोडण्यासाठी जमिन पडिक ठेऊन ऊन्हाने तापू द्या.
  • पीक फेरपालटाची शिफारस केली जाते पण तंबाखुची (यजमान रोपे) लागवड करु नका.
  • तसेच बाजुच्या शेतातही तंबाखुची लागवड करणे टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा