लाल भोपळा

भोपळ्यावरील तांबडा भुंगेरा

Aulacophora foveicollis

किडा

थोडक्यात

  • पानांवर उपद्रवाचे मोठी छिद्र दिसतात.
  • मुळांवर आणि जमिनीखालच्या भागांवर खोल छिद्र दिसतात.
  • मूळ आणि खोड कुजते आणि मर होते.
  • लाल अंडाकृत भुंगेरे आढळतात.

मध्ये देखील मिळू शकते

9 पिके

लाल भोपळा

लक्षणे

प्रौढ किडे आधाशीपणे पाने, फुले आणि फळे खातात. तांबडा भुंगेरा झाडाच्या भागात (शिरांच्या मध्ये) मोठी छिद्र करतात, ज्यामुळे वाढ खुंटते आणि अखेरील झाड मरते. कोवळ्या रोपांना झालेल्या नुकसानाने पीक पक्वता लांबते. जर फुलांना नुकसान झाले तर फळधारणा कमी होते. ह्या भुंगेर्‍याच्या अळ्या जमिनीत रहातात आणि मूळ तसेच झाडांचे जमिनीखालील भाग खातात ज्यामुळे खोडकूज होते व फांद्या तसेच मुळे वाळतात. प्रौढ भुंगे रोपांना खातात ज्यामुळे वाढ बाधित होते आणि मर देखील होऊ शकते ज्यामुळे शेतात मोकळे भाग दिसतात. फुलांच्या भागांनाही काही नुकसान होऊ शकते ज्यामुळे फळधारणा कमी होते. कोवळ्या फळाच्या बुडाशी प्रौढांनी खाल्लेले व्रण दिसतात ज्यामुळे कूजीचे सूक्ष्म जंतु आत शिरतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ताचिनिड कुटुंब आणि रेडुव्हिड र्हिानोकोरिस फ्युसाइप्स सारखे सदस्य तांबडा भुंगेराचे नैसर्गिक शत्रु असुन त्यांवर हल्ला करतात. अर्धा कप लाकडाची राख आणि अर्धा कप चुनकळीला ४ ली. पाण्यात मिसळा आणि काही तासांसाठी तसेच सोडा. नंतर पूर्ण शेतात वापरण्यापूर्वी या मिश्रणाला गाळुन काही संक्रमित झाडांवर याची चाचणी करा. या मिश्रणाला फवारणीतून वापर करा. वैकल्पिकरीत्या आपण झाडापसुन बनविलेले उत्पाद जसे कि नीम (एनएसकेइ ५%), डेरिस किंवा पायरेथ्रम (यात साबण देखील टाका) हे दर ७ दिवसांच्या अंतराने वापरा. ट्रिसिडर्मा ट्रायकोडर्माला बियाणे आणि रोपवाटिकेतील उपचारांसाठी वापरा आणि स्युडोमोनाज फ्ल्युरोसेन्सला बियाणे आणि रोपवाटिकेतील उपचार तसेच जमिनीवरील उपचारांसाठी वापरा. सापळा पिके ज्यांवर तीव्र कीटकनाशके फवारली आहेत ती वापरल्यास, ती भुंग्यांना आकर्षित करुन नाश करतील.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जेव्हा रोपवाटिकेत १ प्रौढ प्रति १० रोपे आढळतो तेव्हा डेल्टामेथ्रिनचा वापर २५० मि.ली. प्रति एकरी केला जाऊ शकतो. कृत्रिम पायरेथ्रॉइडस प्रभावी ठरु शकतात पण ह्यांचा वापर नैसर्गिक शत्रुंसाठी देखील हानीकारक असतो. सापळा पिकांचा वापर ज्यावर तीव्र कीटकनाशकांची फवारणी केली आहे ते प्रौढ भुंग्यांना आकर्षित करुन मारतात. फेनिट्रोथियॉनची फवारणी उपद्रव दिसताक्षणीच करा आणि १५ दिवसांनी परत करा.

कशामुळे झाले

औलाकोफोरा फोवेइकॉलिसच्या अळ्या तसेच प्रौढांमुळे नुकसान उद्भवते, जे पान, फळ आणि फुल खातात. पूर्ण वाढलेल्या अळ्या बहुधा फिकट पांढर्‍या रंगाच्या असुन मानवी नखांएवढ्या मोठ्या असतात. अंडी बहुधा लंबगोलाकार, पिवळी असुन एकेकटी किंवा १० च्या पुंजक्याने झाडाजवळच्या ओलसर मातीत मानवी बोटाएवढ्या खोलीवर घातली जातात. १-२ अठवड्याने अळ्या ऊबुन बाहेर निघतात आणि झाडावर तसेच मुळांवर हल्ला करतात आणि मग जमिनीतच कोषात जातात. जमिनीतील कोषावस्था सुमारे ७-१७ दिवसांची असते. कोषावस्थेसाठी इष्टतम परिस्थिती म्हणजे २७-२८ अंश तापमान असते.


प्रतिबंधक उपाय

  • झपाट्याने वाढणारी वाणे आणि सापळा पिके लावा.
  • जास्त संक्रमित रोपांच्या जागी लावण्यासाठी किंवा भरपाईसाठी जास्त बियाणे पेरा.
  • भुंगेऱ्याच्या नुकसानापासुन वाचविण्यासाठी रोपांवर प्लास्टिकच्या पिशव्या लावा.
  • पुरेशी पोषके, खते आणि सरीतुन सिंचन करुन झाडांच्या निरोगी वाढीसाठी चांगली परिस्थिती निर्माण करा.
  • दर अठवड्याला प्रदुर्भावाच्या लक्षणांसाठी पहाणी करा आणि पिवळे चिकट सापळे लावा.
  • शेतात पर्यायी यजमान तण राहू देऊ नका.
  • कचरा गोळा करुन गाडा किंवा जाळा.
  • सकाळी लवकर, जेव्हा ते फारच आळशी असतात तेव्हा भुंग्यांना हाताने वेचुन काढा.
  • उन्हाळ्यात खोल नांगरुन त्यांच्या सुप्तावस्थेला हलवुन उघडे पाडा.
  • त्यांचे नैसर्गिक भक्षक आणि परजीवी जोपासा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा