सोयाबीन

बीटवरील लष्करी अळी

Spodoptera exigua

किडा

थोडक्यात

  • अळ्या बहुधा निस्तेज हिरव्या असुन बारीक, नागमोडी, फिकट रंगाचे पट्टे पाठीवर खालपर्यंत असतात.
  • छातीच्या बाजुला दुसर्‍या खर्‍या पायाच्या वर गडद डाग असतात.
  • अळ्या झाडी आणि फळे दोन्ही खातात आणि झाडीच्या फक्त फांद्याच शिल्लक ठेवतात.

मध्ये देखील मिळू शकते

5 पिके
कोबी
फुलकोबी
हरभरा
कांदा
अधिक

सोयाबीन

लक्षणे

सुरवातीला छोट्या अळ्या गटाने खालच्या झाडीच्या जुन्या पानांच्या खालच्या बाजुला उपद्रव करतात. मोठ्या अळ्या जास्त स्वतंत्र असतात आणि पूर्ण शेतात पसरुन पानांवर अनियमित छिद्रे सोडतात. पक्व अळ्या लहान रोपांची सर्व पाने पूर्ण खातात किंवा पानांचे फक्त सांगाडेच ठेवतात. जर पाने कमी पडली तर सुरवंट शेंगांवरही हल्ला करतात पण फांद्या खात नाहीत. सामान्यपणे ते रात्री उपद्रव करतात आणि दिवसा जमिनीत किंवा झाडाच्या सावलीत आणि ओलसर भागात लपतात. कोवळी रोपे स्पोडोप्टेरा एक्झिगुआच्या खाण्यामुळे मारली जाऊ शकतात पण जर संक्रमण जास्त गंभीर नसेल तर प्रौढ झाडे सावरु शकतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

एस. एक्झिगुआची संख्या कमी करण्याचा महत्वाचा नियम म्हणजे नैसर्गिक शत्रुंना प्रोत्साहन देणे होय. फुलकिडे (अँतोकोरिडे), आग्या मुंग्या, परजीवी वॅस्पस (हायपोसोटेर डिडिमेटर), माशा आणि कोळी हे अंड्यांवर आणि अळ्यांवर हल्ला करतात. एन्टोमोपॅथोजेनिक बुरशी, बॅसिलस थुरिंगीएनसिस, एनपीव्ही आणि सुत्रकृमी अळ्या आणि प्रौढांना संक्रमित करतात. ताजा नीम, लेमनग्रास आणि आल्यावर आधारीत बागेतील कीटकनाशके देखील प्रभावी असतात. तसेच अंडी आणि छोट्या अळ्यांचे नियंत्रण ५% सरकीचे तेल पानांवर वापरुन करता येते. कामगंध सापळे वापरुन संभोगात बाधा आणि प्रजोत्पादनात अडथळा निर्माण करता येते (९७% कार्यक्षमता).

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मित्रकिडी आणि एस. एक्झिगुआच्या नैसर्गिक शत्रुचा नाश होईल म्हणुन कीटकनाशकांची शिफारस केली जात नाही ज्यामुळे खर तर या उपद्रवाचा उद्रेक होतो. शिवाय, या कीटकाने बऱ्याच रसायनांवर प्रतिरोधक क्षमता विकसित करण्याची उच्च क्षमता दर्शविली आहे.

कशामुळे झाले

स्पोडोप्टेरा एक्झिगुआ नावाच्या बीट लष्करी अळीच्या अळ्यांमुळे नुकसान होते. हे किडे आशिया, आफ्रिका, अमेरीका आणि युरोप तसेच थंड प्रदेशातील हरितगृहात सापडतात. कापुस, बीट आणि मक्यासह पुष्कळशा पिकांना ते संक्रमित करतात. प्रौढ पतंग राखाडी तपकिरीसर असतात. पुढच्या पंखांवर तपकिरी आणि राखाडी ठिपके अनियमितपणे विखुरलेले असतात आणि फिकट रंगाचे चवळीच्या आकाराचे डाग मध्यावर असतात. पाठचे पंख राखाडी किंवा पांढरे असतात आणि कडांजवळ गडद रेष असते. माद्या पानांच्या खालच्या बाजुला पुंजक्याने अंडी घालतात ज्यावर पांढर्‍या किंवा राखाडी केसांचे आवरण असते. छोट्या अळ्या हिरवट तपकिरी असतात आणि पाठीवर गडद लांब पट्टे असतात. पक्व अळ्या हिरव्या असतात आणि बगलेत पिवळे आणि पाठीवर पिवळसर हिरवे पट्टे असतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक आणि जाडसर पान असलेले वाण लावा.
  • उच्च लोकसंख्या टाळण्यासाठी पेरणीची वेळ समायोजित करा.
  • उपद्रवाच्या लक्षणांसाठी आपल्या झाडांची खासकरुन सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा नियमित तपासणी करा.
  • कामगंध सापळे वापरुन उपद्रवाचे निरीक्षण करा.
  • शेतातील आणि आजुबाजुचे तण आणि कचरा काढुन टाका कारण त्यात त्यांना निवारा मिळतो आणि प्रजोत्पादन करता येते.
  • आजुबाजुच्या शेतातुन स्थलांतरीत होऊन येणार्‍या सुरवंटांना बुडवुन मारण्यासाठी खोल खंदक खणुन पाण्याने भरा.
  • नैसर्गिक भक्षक मरु नयेत म्हणुन विस्तृत श्रेणीच्या कीटकनाशकांचा वापर विवेकाने करा.
  • शेत चांगले नांगरुन आणि कुळवणी करून अळ्या आणि कोषांना भक्षकांसाठी उघडे पाडा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा