सोयाबीन

जाड नाकाचे भुंगे

Myllocerus sp.

किडा

थोडक्यात

  • पानांच्या कडा खाचतात.
  • खुंटलेली झाडाची वाढ.
  • पंखांवर आणि पौढ भुंग्यांच्या डोक्यांवर फिकट ते गडद राखाडी नक्षी असते.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

पानांच्या कडा फाटणे हे कपाशीवरील राखाडी भुंग्यांच्या संक्रमणाचे पहिले लक्षण असते. प्रौढ भुंगे नविन रोपांच्या पानांच्या कडा खाणे पसंत करतात आणि मग आत शिरतात. गंभीर प्रादुर्भाव झालेली पाने पूर्णपणे गळून पडतात. निरोगी झाडे उपाद्रवाच्या नुकसानापासून बरे होतील परंतु फुलोर्या च्या सुमारास कोवळी झाडे वाळतात. गंभीर प्रादुर्भावाने झाडाची वाढ खुंटते. प्रभावित झाडे सहजपणे उपटली जातात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बॅसिलस थुरिंगिएनसिस प्रजाती टेनेब्रियॉनसिस (बीटीटी), २.५ मि. ग्रॅ. प्रति ली. याप्रमाणे अळवणी करा. या जीवाणूचा वापर रूट टिप पद्धतीनेही केला जाऊ शकतो. रोपांची मुळे बीटीटी द्रावणात बुडवून त्यांना हवेत वाळूवून पुनर्लागवड करा. अळ्याची मृत्यूदर आर्द्रता आणि तपमान राखण्यावर अवलंबून असते. शेवटच्या नांगरणीच्या वेळी निंबोळी पेंड ५०० किलो प्रति हेक्टर याप्रमाणे वापरा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कपाशीवरील राखाडी भुंग्यांच्या अंडी, अळ्या आणि कोषांचे व्यवस्थापन करण्यात रसायनिक उपचार सीमित यश देतात कारण हे सर्व जमिनीत असतात. प्रौढ भुंगेही हाताळण्यास कठिण असतात कारण ते उडु शकतात, लपतात आणि मेल्यासारखे पडु शकतात. प्रतिकाराच्या विकासामुळे समस्या निर्माण होतात. क्विनॅलफॉस किंवा क्लोरपायरिफॉस, डायमेथोएटची फवारणी पेरणीनंतर २० दिवसांनी केली जाऊ शकते किंवा फोरेट किंवा दाणेदार कार्बारिल वाळुबरोबर पसरले जाऊ शकतात.

कशामुळे झाले

मायलोसिरस प्रजातीच्या कपाशीवरील राखाडी भुंग्यांचे प्रौढ आणि अळ्या दोघांमुळे लक्षणे उद्भवतात. प्रौढ भुंगे छोटे आणि फिकट राखाडी रंगाचे असतात त्यांच्या पंखाच्या आवरणावर आणि डोक्यावर गडद रंगाची नक्षी असते. माद्या २४ दिवसात, जमिनीत सरासरी ३६० अंडी घालतात. उबल्यानंतर त्यातुन अळ्या बाहेर येऊन जमिनीत पोखरुन झाडांची मुळे खातात. अळ्या नंतर जमिनीतच कोषात जातात. प्रौढ भुंगे हिवाळ्यात कचर्‍याखाली लपुन जगतात. मायलोसेरस प्रजातींमध्ये शोभेची झाडे, भाजीपाला ते फळांच्या प्रजातीपर्यंत यजमान वनस्पतींची विस्तृत श्रृंखला आहे.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असलेले प्रतिकारक वाण लावा.
  • पिकांना नविन पान यायला लागल्यानंतर सावधगिरी म्हणुन शेतावर लक्ष ठेऊन लक्षणे ओळखा.
  • वारंवार कोळपणी केल्याने ते त्रस्त होऊन अळ्या मरतात.
  • सापळा पीक म्हणून तूर लागवड प्रभावी ठरेल असे काही स्त्रोतांनी कळविले आहे.
  • प्रौढ भुंग्यांना झाड / फांद्या हलवुन काढुन त्यांना साबणाच्या पाण्याच्या डब्यात टाकले जाऊ शकते.
  • प्रभावित झाड/फांद्या काढुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा