Melanagromyza obtusa
किडा
पूर्ण वाढलेल्या अळ्या जोपर्यंत शेंगांच्या पृष्ठभागात छिद्र करीत नाहीत तोपर्यंत लक्षणे दृष्य होत नाहीत. ह्याच छिद्रातुन नंतर शेंगातील कोषावस्था संपल्यानंतर माशा बाहेर पडतात. कोष स्वत:ला दाण्यात पोखरुन बसवून बोगदा तयार करतात ज्यामधून ते प्रौढ म्हणून बाहेर पडतात. प्रभावित दाणे आक्रसतात आणि आपली उगवण क्षमता गमावतात. अळ्यांच्या विष्ठेमुळे झाडाच्या संक्रमित भागात बुरशी घर करते. प्रभावित दाणे मानवी वापराच्या लायकीचे रहात नाहीत आणि लागवडीसाठीही वापरता येत नाहीत. वाळलेल्या शेंगांवर टाचणीच्या टोकाच्या आकारची छिद्रे दिसतात. बिया आक्रसलेल्या, पट्टे उमटलेल्या आणि अर्धवट खाल्लेल्या दिसतात.
एम. ऑब्ट्युसाचे नैसर्गिक शत्रु जोपासा. निंबोळी अर्क (५० ग्रॅम प्रति ली. पाणी) चार अठवडे वापरा किंवा द्रव स्वरूपातील निंबोळी अर्काची फवारणी दर १५ दिवसांनी करा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मोनोक्रोटोफॉस, अॅसेफेट किंवा लँब्डा सायहॅलोथ्रिनची फुलधारणेच्या काळात व परत १०-१५ दिवसांना फवारणी करा. विशिष्ट कीटकनाशकांचा प्रतिकार रोखण्यासाठी, एका हंगामात फवारणीचे औषध आलटुन पालटुन वापरण्याचा सल्ला दिला जातो.
मेलानाग्रोमिझा ओब्टुसाच्या अळ्यांनी नुकसान उद्भवते ज्या विकसित होणार्या दाण्यांच्या सालीला खातात. प्रौढ माशा (२-५ मि.मी. लांब) त्यांची अंडी तूर आणि इतर यजमान झाडांच्या अपक्व शेंगांच्या पृष्ठभागावर घालतात. ऊबुन बाहेर आलेल्या अळ्या फिकट पांढर्या व कोष नारिंगी तपकिरी असतात. अळ्या शेंगाच्या सालीच्या आतला भाग पोखरतात पण दाण्याचा पृष्ठभागाला अखंड ठेवतात व कालांतराने बोगदे करुन दलामध्ये स्वत: जातात. आळी आपल्या शेवटच्या अवस्थेत शेंगा आणि दाण्यामध्ये कोषावस्थेत जाण्यापूर्वी छिद्र करतात.