काकडी

भोपळ्यावरील सुरवंट

Diaphania indica

किडा

थोडक्यात

  • रेशमी धाग्यांनी गुंडाळलेली पाने.
  • गंभीर प्रदुर्भावात विकसित होणार्‍या फळांमध्ये छिद्र दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


काकडी

लक्षणे

कोवळ्या अळ्या पानांतुन हरितद्रव्य सामग्री खरवडतात. नंतर पानांची गुंडाळी करुन पानांभोवती जाळे विणतात. सुरवंट फुलांवर आणि विकसित होणार्‍या फळांवर देखील हल्ला करतात. ते सालीला नुकसान करतात आणि त्यामुळे फळ कूजते. खरवडल्यामुळे पाने नंतर वाळतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

बॅसिलस थुरिंगिएनसिस आणि ब्युव्हेरिया बसानिया सारखी जैविक कीटकनाशके वापरा. नीम डेरिस, पायरेथ्रम आणि मिरची असे झाडांपासून बनविलेले उत्पाद वापरा. अॅपांटेलेस प्रजातीसारख्या परोपजीवींच्या कार्यास चालना द्या. पाणी आणि गोमुत्राचे सौम्य मिश्रण फवारुन किड्यांना पळवुन लावा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मॅलेथिऑन (५० ईसी @ ५०० मि.लि. / हेक्टर), डायमेथोएट (३० ईसी @ ५०० मिली / हेक्टर) किंवा मिथाइल डेमेटन (२५ ईसी @ ५०० मिली / हेक्टर) सारख्या कीटकनाशकांची फवारणी करा. दुसरा पर्याय म्हणजे सायांट्रानिलीप्रोल युक्त कीटकनाशके वापरणे होय.

कशामुळे झाले

सुरवंटांच्या कोवळ्या अळ्यांमुळे नुकसान होते. प्रौढ पतंगांचे पंख पांढरट पारदर्शक असुन त्यांच्या कडांवर मोठे गडद धब्बे असतात आणि माद्यांना गुदापाशी नारिंगी रंगाच्या केसांचे तुरे असतात. अंडी एकेकटी किंवा पुंजक्यांनी पानांच्या खालच्या बाजुला ३-४ दिवस घातली जातात. ऊबुन बाहेर येणारे सुरवंट बहुधा लांबुडके असुन त्यांच्या छातीच्या मध्याच्या दोन्ही कडेने उभे लांबुळके पट्टे असतात. सुरवंट १० दिवसात प्रौढ होतात.


प्रतिबंधक उपाय

  • फक्त शिरांचा सांगाडा असलेले पण शिरांमधील भाग खाल्ले गेलेल्या कोवळ्या पानांच्या उपस्थितीसाठी तपासा.
  • पानांच्या मध्ये विष्ठेसाठी तपासा.
  • कोवळ्या सुरवंटांना गोळा करुन नष्ट करा.
  • गुंडाळलेल्या पानांसाठी तपासा आणि त्यांना काढुन टाका किंवा चुरगाळुन त्यातील सुरवंटांना मारा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा