कापूस

मिरिड बग्ज

Miridae

किडा

थोडक्यात

  • मिरिड किडे फुटव्यातुन, फुलांतुन आणि फळांतुन रस शोषतात.
  • फळांवर काळे ठिपके येतात आणि खोलगट होतात तसेच बियांवर आत डाग असतात.
  • संक्रमित रोपांचा जोम जातो आणि वाढ खुंटते पण फांद्या वाढतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

कापूस

लक्षणे

मिरिड किडे फुटव्यातुन, फुलांतुन आणि फळांतुन रस पिऊन नुकसान करतात. जर फळधारणेच्या आधी हल्ला झाला तर रोपांना फुटवे धरत नाहीत ज्यामुळे वाढ खुंटते आणि फांद्या वाढतात. कोवळ्या फुलांना खाल्ल्याने नुकसान झाल्यामुळे कोवळी फुले सुकतात आणि ३-४ दिवसात तडकतात. छोटी आणि मध्यम आकाराची फुले खासकरुन ह्याला संवेदनशील असतात आणि नुकसान न भरता येण्यासारखे असते. जर फुलांच्या पाकळ्या विकसित झाल्याच तर त्या सुरकुतलेल्या आणि विकृत असतात तसेच परागकण काळे असतात. बोंडांना खाल्ल्यामुळे झालेल्या नुकसानाने बाहेर काळे डाग दिसतातआणि आक्रसलेल्या तसेच डागाळलेल्या बिया आत दिसतात. संक्रमण गंभीर स्वरुपाचे असल्यास प्रत आणि उत्पन्नावर गंभीर परिणाम होतो.

शिफारशी

जैविक नियंत्रण

संक्रमित शेतात मिरिडची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी नैसर्गिक भक्षकांचा वापर केला जाऊ शकतो. डॅमसेल किडे, बिग आइड किडे, अॅसॅसिन किडे, मुंग्या आणि कोळ्यांच्या काही प्रजाती मिरिड किड्यांना खातात. आणखीन म्हणजे सौम्य केलेल्या नीम तेलाचे आणि ब्युव्हेरिया बॅसियाना बुरशीवर आधारीत जैव कीटनाशकांचे उपचार करुनही त्यांची लोकसंख्या नियंत्रित केली जाऊ शकते. उपद्रवाची उपस्थिती लक्षात येताच जैव उपचार लगेच सुरु करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. डायमिथोएट, इनडॉक्साकार्ब किंवा फिप्रोनिल असणारे कीटनाशक मिरिड किड्यांविरुद्ध चांगला प्रभाव देतातआणि गंभीर संक्रमणास आळा घालण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

कशामुळे झाले

पिकाच्या जातीप्रमाणे मिरिड किड्यांच्या पुष्कळ प्रजातींमुळे नुकसान होते. कपाशीवर कँपिलोमा लिव्हिडा ज्याला डिंपल बग (मध्य आणि उत्तर भारतात) म्हणुनही ओळखले जाते, त्यामुळे नुकसान होते आणि क्रियोन्टियाडेस जातीचे पुष्कळसे सदस्य खासकरुन सी. बायसेरेटेन्स (दक्षिण भारतात) ह्यांच्यामुळे नुकसान होते. प्रौढ अंड्याच्या आकाराचे, चपट्या शरीराचे, हिरवट पिवळा ते तपकिरी रंगाचे असतात. विशिष्ट त्रिकोणी बाह्यरेषा पाठीच्या मध्यावर असतात. अंडी एकेकटी पानांच्या देठात घातली जातात आणि ४-५ दिवसांनी ऊबतात. छोटी पिल्ले त्यांच्या आकारामुळा आणि मापामुळे सहजपणे मावा समजली जाऊ शकतात. तरीपण मिरिड किडे माव्यांपेक्षा झटपट हालचाली करतात. सी. लिव्हिडाला ३०-३२ अंशाचे तापमान भावते. जसे तापमान ह्या आवडत्या तापमानापासुन वेगळे होते तसे त्यांचे जीवनचक्र हळु चालते. खासकरुन जर तापमान ३५ अंशावर गेले आणि जोराचा पाऊस पडला तर किड्यांची संख्या खूपच कमी होते.


प्रतिबंधक उपाय

  • रोपणी करताना कपाशीची रोपे फार जवळ-जवळ लावु नका.
  • ल्युसर्नेसारखे पर्यायी यजमान रोपे शेतातच्या आजुबाजुने लावा ज्यामुळे किडे तिथे आपल्या पिकांपासुन दूर आकर्षित होतील.
  • संक्रमणाच्या लक्षणांसाठी आपल्या रोपांचे वारंवार निरीक्षण करा.
  • मित्र किड्यांवर प्रभाव पडु नये म्हणुन विस्तृत श्रेणीच्या कीटनाशकांचा वापर करु नका आणि कीटनाशकांचा वापर नियंत्रित ठेवा.
  • उपद्रवाचा प्रसार होऊ नये म्हणुन रोपांचा कचरा आणि संक्रमित रोपांना काढुन जाळुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा