Pempherulus affinis
किडा
कपाशीच्या खोडावरील टोक्यांच्या संक्रमणाचे विशेष लक्षण आहे खोडावर जमिनीच्या थोड वर गाठीसारखी सूज दिसणे. खोडात अळ्यांनी खाल्ल्यामुळे वहन भागाला झालेल्या नुकसानीमुळे अशा गाठी येतात. कोवळी रोपे बहुधा ह्या नुकसानामुळे मरतात. जुन्या रोपात मरगळीचे लक्षण पहिल्यांदा दिसते आणि हळुहळु ती वाळतात. ती जगु शकतात पण त्यात जोम नसतो आणि वाढ खुंटलेली असते. प्रभावित खोड जोरदार वार्याने किंवा बोंडांच्या वजनाने सहजपणे जमिनदोस्त होतात. आणखीन लक्षणे म्हणजे बोंडांची संख्या कमी असणे आणि धाग्याची प्रत कमी असणे.
मूलभूत खते देताना शेणखताबरोबर नीम केकलाही जमिनीत मिसळल्यास (१० टन शेणखत + २५० ग्रॅम नीम केक प्रति हेक्टर) खोड आणि कोंबावरील टोक्यांचे संक्रमण होण्याचा संभव कमी होतो. पुढे कोवळ्या रोपांना नीम तेलाच्या द्रावणाने आंघोळ घातल्यास प्रौढ टोके ह्यांच्या पानांवर अंडी घालण्यापासुन परावृत्त होतात. कामगंध सापळे वापरुन टोक्यांचे निरीक्षण आणि नियंत्रण (जैव कीटनाशकांबरोबर संयुक्तपणे वापरुन) केले जाऊ शकते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. किड्यांचा प्रसार रोखण्यासाठी (१० मि.ली क्लोरपायरीफॉस २० इसी प्रति किलो बियाणांवर) बियाणांचे प्रतिबंधक उपचारही केले जाऊ शतात. क्लोरपायरीफॉस २० इसीचे (२.५मि.ली. प्रति लिटर या दराने सौम्य करुन) फवारे उपचार खोडाच्या कॉलरवर केले असताही खोड आणि कोंबांवरील टोक्यांविरुद्ध परिणामकारक आहेत. अंकुरल्यानंतर १५-२० दिवसांनी सुरवात करुन १५ दिवसांच्या अंतराने रोपांना ह्या उपचार द्रावणाने आंघोळ घालावी. कामगंध सापळे वापरुन टोक्यांचे निरीक्षण आणि नियंत्रण (कीटनाशकांबरोबर संयुक्तपणे वापरुन) केले जाऊ शकते.
पेम्फेरुलस अॅफिनिस नावाच्या कपाशीच्या खोडावरील टोक्यांमुळे नुकसान होते. प्रौढ टोके छोटे, गडद तपकिरी असुन पंखांच्या आच्छादनावर आणि डोक्यावर पांढरी छटा असते. माद्या कोवळ्या रोपांच्या वाढणार्या फुटव्यात अंडी घालतात. ऊबल्यानंतर पांढर्या अळ्या खोडाच्या साली आणि लाकडात पोखरतात आणि वहन भागाला खायला सुरवात करतात. ह्यामुळे खोडावर जमिनीच्या थोड वर विशेष सूज येते. कपाशीची फुटवे पोखरणारे टोके (अलसिडोडस अॅफॅबर) अशाच पद्धतीने वागतात. म्हणुन तसेच उपचार आणि प्रतिबंधक उपाय वापरले जाऊ शकतात. तरीपण, कपाशीचे फुटवे पोखरणारे टोके रंगाने गडद राखाडीसर तपकिरी असुन त्यांच्या पुढच्या पंखांवर फिकट पट्टे असतात. कपाशीची खोडे पोखरणारे टोके बहुधा दक्षिण भारतातील काही भागात खास करुन तामिळनाडुनत गंभीर उपद्रव ठरतात.