Eutetranychus orientalis
कोळी
पानांच्या वरच्या बाजुला मुख्यत: मध्य शीरेच्या बाजुने, आडव्या शिरांपर्यंत पसरलेले उपाद्रवाचे नुकसान दिसते. पानाच्या मध्या शिरेच्या आणि इतर शिरांच्या बाजुने फिकट पिवळे पट्टे येतात आणि अखेरील पान पिवळे पडते. काहीवेळा पानांवर बारीक धुळीचे आवरण दिसु शकते आणि काही जाळ्या देखील तयार केली जातात. कोवळ्या संक्रमित पानांच्या कडा वरच्या दिशेने गोळा होतात. जास्त संक्रमण झाले असता कोळी पानांचा वरचा भाग पूर्ण खाऊन अंडी घालतात. ह्यामुळे अकाली पानगळ, फांदीमर आणि फळ गळ होते. पुढच्या वर्षीचा फुलोराही प्रभावित होतो. जर झाडे पाण्याच्या ताणाखाली असली तर कमी संक्रमणानेही फळे वाळुन पिवळी पडतात आणि अकाली पानगळ होते.
युटेट्रान्चिस ओरिएन्टालिसचे भक्षक भरपूर आहेत आणि इतर नैसर्गिक शत्रु जे ह्यांचा प्रसार नियंत्रित करतात. फिटोसिडे आणि स्टिग्माइडे कोळींचा वापर विविध देशात लिंबुवर्गीय पिकांवरील पौर्वात्या कोळ्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी केला गेला आहे. उदा. युसियस स्टिप्युलॅटस, टाफ्लोड्रोमस फियालेटस, नियोस्युलस कॅलिफोर्निकस, फितोस्युलस परसिमिलिस. स्टेटोरस प्रजाती आणि ओरियस थ्रिपोबोरस सारखे भक्षक भुंगे पण आणि लेसविंगच्या अळ्या देखील कोळ्यांना खातात. उपद्रव नाहीसा करण्यासाठी झाडांवर गंधकाची फवारणी किंवा धुरळणी करावी.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर झाडाची २०% पाने आणि/किंवा फळे प्रभावित झालेली असली तरच संक्रमित झाडावर उपचार करा. निवडक कीटकनाशकांच्या वापरांची शिफारस करण्यात येते कारण विस्तृत श्रेणीच्या कीटनाशकांमुळे परिस्थिती चिघळु शकते. विविध प्रकारच्या कोळीनाशकांच्या वापराने प्रतिकार विकसित होत नाही. फ्ल्युबेन्झिमाइन, ओमेथोएट आणि डायकोफॉलच्या वापराने परिणाम मिळाल्याचे अहवाल आहेत.
युटेट्लिंरानिचस ओरिएन्टालिल नावाच्या लिंबुवर्गीय पिकांवरील पौर्वात्य कोळीचे प्रौढ आणि पिल्लांच्या उपाद्रवामुळे लक्षणे उद्भवतात. ह्यांचे वैशिष्ट्य आहे, अंडाकृती आकाराचे चपटे शरीर, जे फिकट तपकिरी, लालसर तपकिरी ते गडद हिरव्या रंगाचे असु शकते. शरीराइतकेच लांब फिकट रंगाचे पाय आणि गडद ठिपकेही असतात. ते बहुधा लिंबुवर्गीय झाडांनाच संक्रमित करतात आणि क्वचित इतर पिके जसे कि, बदाम, केळी, कसावा आणि कपाशीलाही संक्रमित करतात. हे बहुधा पानांच्या वरच्या पृष्ठभागावर असतात आणि वार्यासद्वारे पसरतात. भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रतिवर्षी ह्यांच्या ८-२७ पिढ्या होतात, प्रत्येक मादी संपूर्ण आयुष्यात (२-३ अठवडे) ३०-४० अंडी घालते. फार कमी किंवा जास्त आर्द्रता, जोरदार वारा, दुष्काळ किंवा चांगली विकसित न झालेली मूळ ह्यामुळे परिस्थिती आणिखी बिघडु शकते. पौर्वात्य कोळ्यांसाठी २१-२७ अंश तापमान आणि ५९-७० टक्के आर्द्रता हि आदर्श परिस्थिती असते.