Aonidiella aurantii
किडा
अनेक बारीक गडद तपकिरी ते लाल खवले पान (पुष्कळदा मुख्य शिरांच्या आजुबाजुला), काटक्या, फांद्या आणि फळांवर दिसतात. ते थोडेसे उंचावटलेल्या टोकदार ठिपक्यासारखे दिसतात (ज्वालामुखीच्या आकाराचे) ज्याचे टोक थोडे बोथट असते. प्रभावित जागेच्या सभोवताली पिवळी प्रभावळ दिसते. जास्त संक्रमण झाल्यास पाने मरगळून अकाली पानगळ होते. संक्रमित फांद्या वळतात व उच्च संक्रमणात मोठे फांद्या देखील वळतात. फळांवर बरेच खवले लागल्याने विकृत आकाराची होतात, अखेरीस वाळून गळतात. कोवळ्या झाडांची वाढ खुंटते आणि जर बरेच फांद्या वाळल्या तर ते देखील वाळतात. लाल खवलेही मधाळ रस सोडतात ज्यामुळे काजळी बुरशी पान आणि फळांवर घर करते.
अॅओनिडिएला ऑरान्टिल च्या नैसर्गिक भक्षकात परजीवी वॅस्पस अॅफिटिस मेलिनस आणि कंपेरिएला बायफासियाटा आणि शिकारी कोळी हेमिसारकोप्टस मालस जे अळ्यांवर हल्ला करतात हे येतात. लाल खवल्यांच्या जैविक नियंत्रणाची किल्ली आहे मुंग्यांचे नियंत्रण कारण मुंग्या खवल्यांना नैसर्गिक शत्रुंपासुन वाचवितात. सेंद्रियरीत्या मान्यताप्राप्त पेट्रोलियम तेलाचे फवारेही पानांवरील आणि फळांवरील खवल्यांना घालविण्यासाठी केला जाऊ शकतो. काढणीनंतर जास्त दाबाने धुतल्यास कोवळ्या फळांवरुन खवले पडतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अरुंद श्रेणीची तेल फवारल्यास नैसर्गिक शत्रुंना बाधा कमी येते आणि याचा वापर मध्य उन्हाळ्यात करावा. सुधारणेसाठी रसायनिक फवारण्या जेव्हा २५% फळे संक्रमित झालेली असतात तेव्हाच करावेत. क्लोरपायरीफॉस, कार्बारिल, मॅलेथियॉन किंवा डाय मेथोएट असणार्यात कीटकनाशकांचा वापर जर बागेतील खवल्यांची संख्या या मर्यादेबाहेर गेली तरच निवडकपणे करावा. मित्र किडींना त्रास होऊ नये म्हणुन विस्तृत श्रेणीची कीटकनाशके टाळा.
लक्षणे अॅओनिडिएला ऑरान्टिल नावाच्या लाल खवल्यांच्या उपद्रवाने उद्भवतात. ही उष्णकटिबंधातील सर्वसाधारणपणे आढळणारी जगभरातील लिंबूवर्गीय कीटक आहे. काढणीनंतर ते लाकुड आणि पानांत जगतात आणि पुढच्या हंगामात नविन वाढीला संक्रमित करतात. त्यांच्या चलित असण्याच्या काळात खाण्याच्या जागा शोधताना माद्या प्रकाशाकडे फार आकर्षित होतात. ते अंडी घालत नाहीत तर फार सक्रिय रांगणार्या अळ्यांना जन्म देतात. एकदा का पानाच्या वरच्या बाजुला किंवा कोवळ्या फळातील खोलगट भागात त्या स्थिरस्थावर झाल्या कि मग त्या अचल असतात. कापसासारख्या आवरणात काही काळ राहिल्यानंतर ते अखेरीस त्यांचा गोलाकार चपट्या आकारात आणि वैशिष्ट्यात, लालसर तपकिरी रंगावर येतात. त्यांचे जीवनचक्र तापमानाशी आणि झाडाच्या निरोगीपणाशी फार निगडित आहे. म्हणुन उन्हाळ्याच्या शेवटी जेव्हा झाडे आर्द्रतेच्या ताणाला सामोर जातात तेव्हाच सर्वात जास्त नुकसान होते.