भुईमूग

कालहस्ती सूत्रकृमी

Bitylenchus brevilineatus

इतर

थोडक्यात

  • शेंगा रंगहीन होतात.
  • वाढ खुंटते.
  • खोड लहान आणि रंगहीन असतात.
  • झाडाची वाढ काही भागांमध्येच होते, शेंगांचा आकार कमी होतो, शेंगाच्या पृष्ठभागाचा रंग तपकिरीसर, तपकिरी काळा होतो.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भुईमूग

लक्षणे

शेंगा नेहमीपेक्षा छोट्या असतात आणि तपकिरीसर-काळ्या रंगाच्या असुन छोटे व्रण असतात. हे व्रण एकमेकात मिसळतात आणि पृष्ठभागाचा सुमारे तीन चतुर्थांश भाग व्यापतात. शेंगांचे देठ देखील रंगहीन आणि लहान असतात. प्रभावित झाडांची वाढ खुंटते, त्यांची पाने सामान्य पानांपेक्षा हिरवीगार असतात. छोटे तपकिरी पिवळे व्रण प्रथम बुंध्यावर आणि शेंगांच्या देठांवर तसेच विकसित होणार्‍या शेंगांवर दिसतात. शेंगांचे देठ लहान होतात. नंतर शेंगांचा पृष्ठभागही पूर्णपणे रंगहीन होतो. संक्रमित झाडे गटागटाने दिसतात. ती खुजी असतात आणि झाडी सामान्यापेक्षा हिरवी गर्द असते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

या उपद्रवाविरुद्ध आजतागायत तरी कोण्याही जैविक नियंत्रण पद्धतीची माहिती नाही. जर आपल्याकडे या सूत्रकृमीच्या लक्षणांची गंभीरता कमी करण्याचे काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. टायलेंकोर्‍हिंचस ब्रेव्हिलिनिटसची लोकसंख्या कार्बोफ्युरॉन ३ जी (४ किलो/हेक्टर) वापरुन कमी करता येते.

कशामुळे झाले

ही समस्या सूत्रकृमी, टायलेंकोर्‍हिंचस ब्रेव्हिलिनिटस मुळे होते. वालुकामय जमिनीत याचा प्रादुर्भाव खूप कमी असतो. या प्रादुर्भावामुळे पिकाच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होतो.


प्रतिबंधक उपाय

  • कादिरी-३, तिरुपती २ आणि तिरुपती ३ (प्रसुन्ना) सारखी सहनशील वाणे उपलब्ध असल्यास लावा.
  • हिरवळीचे खत टाका आणि जमिनीत सेंद्रीय खत मिसळा.
  • उन्हाळ्यात किमान २० सें.मी.
  • खोल नांगरा.
  • जमीन उन्हाने तापल्याने जमिनीतील सूत्रकृमी मरतील.
  • या पद्धतीसह उन्हाळ्यात पडिक ठेवल्याने याचा प्रभाव चांगला मिळतो.
  • भात किंवा इतर ज्वारी आणि मक्यासारख्या तृणधान्य पिकांशी फेरपालट करा.
  • अॅफेलंकॉइडस अराचिडिस आणि बेलोनोलायम्युस्लोंगिकॉडेटसच्या प्रवेशासाठी क्वारंटिन नियमांचे कठोर पालन केले गेले पाहिजे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा