भुईमूग

भुईमुगावरील नाग अळी

Aproaerema modicella

किडा

थोडक्यात

  • पानांच्या वरच्या बाजुला पोखरले जाते आणि पानांवर छोटे तपकिरी धब्बे येतात.
  • शेताचे गंभीररीत्या प्रभावित भाग दूरवरुन भाजल्यासारखे दिसतात.
  • पाने मुडपतात.

मध्ये देखील मिळू शकते


भुईमूग

लक्षणे

पानाचे पोखरलेले भाग आणि पानांवरील छोटे तपकिरी धब्बे मेसोफिलच्या उपद्रवाने उद्भवतात. अळ्या पानांना एकत्र गुंफुन गुंडाळतात आणि गुंडाळीच्या आत राहून खातात. दूरवरुन पाहिल्यास शेताचे गंभीररीत्या प्रभावित झालेले भाग करपल्यासारखे दिसतात. प्रभावित पाने वाळतात आणि कोमेजतात.

शिफारशी

जैविक नियंत्रण

ट्रायकोग्रामा चिलियॉनिस ५०००० प्रति हेक्टर ७-१० दिवसांच्या अंतराने दोनदा वापरावे. कोळी, लाँग हॉर्नड ग्रासहॉपर्स, प्रेइंग मँटिस, मुंग्या, लेडीबर्ड बीटल, क्रिकेटस या सारख्या नैसर्गिक जैव लोकसंख्या नियंत्रकांचे संवर्धन करावे. भाताच्या पेंड्यांसह पालापाचोळा अंथरल्याने नाग अळीच्या घटना कमी होतात. भुईमूगासह पेनिसेटम ग्लौकुमचे आंतरपिक घेतल्याने परोपजीवी गोनियोजस प्रजाती नाग अळीच्या किड्यांना खातील.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर रोप उगवल्यानंतर ३० दिवसांनी, प्रत्येक रोपाची ५ पाने किंवा फुलोर्या च्या टप्प्यावर १० पाने प्रभावित झाली असतील आणि शेंगा भरायच्या सुमारास प्रत्येक झाडावर १५ अळ्या सापडत असतील तरच रसायनिक फवारणीची शिफारस केली जाते. जर उपद्रवाची लोकसंख्या अर्थिक कमाल पातळीवर असेल तरच डायमिथोएट २००-२५० मि.ली. प्रति हेक्टर याप्रमाणे (क्लोरपायरिफॉस २.५ मि.ली. किंवा अॅसेफेट १.५ ग्रॅम प्रति ली. याप्रमाणे) किंवा प्रोफेनोफॉस २० इसी २ मि.ली. प्रति ली. याप्रमाणे पेरणीनंतर ३०-४५ दिवसांत फवारावे.

कशामुळे झाले

भुईमूगाचे नुकसान नाग अळीच्या अळ्यांमुळे होते. नाग अळीच्या किड्यांची अंडी चकचकीत पांढरी असुन एकेकटी अशी पानांच्या खालच्या बाजुला घातली जातात तर अळ्या फिकट हिरव्या किंवा तपकिरी असुन डोक आणि छाती गडद रंगाची असते. नाग अळीचे प्रौढ किडे लहान पतंग असुन सुमारे ६ मि.मी. लांबीचे असतात व त्यांचे पंख तपकिरीसर राखाडी असतात. प्रौढांच्या पुढच्या पंखांवर पांढरे ठिपके देखील असतात. अळ्या पाने पोखरतात आणि पानांना आतुन खातात. ५-६ दिवसांनी त्या पानांतील बोगद्यातुन बाहेर येतात आणि बाजुच्या पानांवर खाण्यासाठी आणि पाने गुंफुन कोषात जाण्यासाठी स्थालांतरीत होतात. पानांचे पोखरलेले भाग वाळतात. नाग अळीचे किडे पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरच्या हंगामी पिकांतही सक्रिय असतात आणि २५% ते ७५% नुकसार करु शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • आयसीजीव्ही ८७१६० आणि एनसीएसी १७०९० सारख्या प्रतिकारक वाणांचा वापर करा जे उच्च नाग अळी घटनेच्या क्षेत्रात चांगले उत्पादन देऊ शकतात.
  • उशीराच्या संक्रमणापासुन वाचविण्यासाठी लवकर लागवड करा.
  • भुईमूगासोबत बाजरी किंवा चवळीचे आंतरपिक घ्या.
  • चांगले उत्पादन मिळविण्यासाठी आणि नाग अळीची घटना कमी करण्यासाठी मका, कापूस आणि ज्वारीसारख्या पिकांसह पीक फेरपालट करा.
  • प्रकाश सापळे वापरुन रात्रीच्या वेळी पतंगांना आकर्षित करा आणि उपद्रवाच्या लोकसंख्येचे निरीक्षण करा.
  • उपद्रवाची वाढ नियंत्रित करण्यासाठी सोयाबीन आणि ल्युसर्न, अॅमॅरँथस, बर्सिम आणि इंडिगोफेरा हिरसुटा या तणांसारख्या पर्यायी यजमानानांना काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा