भुईमूग

भुईमूगावरील शेंग पोखरणारी अळी

Caryedon serratus

किडा

थोडक्यात

  • अळ्याद्वारे दाण्याच्या आतील गर खाण्यासाठी दाण्यावर केलेली बारीक छिद्र दिसतात.
  • प्रौढ बीटल शेंगांवर मोठे छिद्र करतात.
  • शेतातील आणि साठवणीतील शेंगांवर किडे हल्ला करतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भुईमूग

लक्षणे

प्रादुर्भावाचा प्राथमिक पुरावा म्हणजे छिद्रांमधून अळ्या बाहेर येतात आणि शेंगांच्या शेजारी कोष सापडतात. जर प्रभावित शेंगा फोडल्यास आतील दाण्यांवर बहुधा दृष्य नुकसान काहीच दिसत नाही.

शिफारशी

जैविक नियंत्रण

भूईमुगाच्या शेंगांवर निंबोळीच्या भुकटीचे किंवा काळ्या मिरपूडीचे उपचार करावेत. शेंगांना नीम तेल, पोंगामिया तेल किंवा निलगिरी तेलाचे उपचार देखील केले जाऊ शकतात. शेंगांना हवाबंद पॉलिथीन पिशव्यांमध्ये किंवा गॅल्व्हनाइज्ड मेटॅलिक / पीव्हीसी टिपात साठवा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. मिथिल ब्रोमाइडचे ३२ ग्राम /मी.³ चे धूमन ४ तासांसाठी करावे. ह्यानंतर क्लोरपायरिफॉसचे बीजोपचार ३ ग्राम प्रति किलो याप्रमाणे करावे. साठवणीच्या जागेच्या भिंतींवर तसेच पिशव्यांवर देखील मॅलेथियॉन ५० इसी ची फवारणी ५ मि.ली. प्रति ली. याप्रमाणे २-३ वेळा करावी. पिशव्यांवर डेल्टामेथ्रिन ची फवारणी ०.५ मि.ली. प्रति ली. याप्रमाणे करावे.

कशामुळे झाले

प्रौढ तपकिरी किडीच्या (सी. सेराटस) अळ्यांमुळे नुकसान होते. प्रौढ किडी शेंगांच्या बाहेरील बाजुवर अंडी (बारीक आणि अर्धपारदर्शक) घालते. ऊबल्यानंतर बारीक अळ्या अंड्यातुनच शेंगांच्या टरफलातुन थेट आत पोखरतात. दाणे पक्व होईपर्यंत त्या दाण्याच्या आतील गर खात रहातात. प्रौढ किडी त्या नंतर शेंगांवर मोठे छिद्र करतात. प्रौढ किडे अंडाकृती असुन रंगाने तपकिरी आणि बहुधा ७ मि.मी. लांबीचे असतात. इष्टतम परिस्थितीत त्यांचे जीवनचक्र पूर्ण होण्यास सुमारे ४०-४२ दिवस लागतात. किडींचा विकास ३०-३३ अंश तापमानात वाढतो.


प्रतिबंधक उपाय

  • सीएमव्ही१०, जीजी३ आणि यासारखी प्रतिकारक वाणे लावा जी ब्रुचिडसना अजिबात आवडत नाहीत.
  • फुटलेले किंवा प्रभावित दाणे निवडुन काढुन टाकल्याने दुय्यम उपद्रवांचे हल्ले कमी होतात.
  • शेतातच उत्पादनाचे ढीग लावणे टाळा.
  • भूईमुगाची काढणी पक्वतेच्या योग्य टप्प्यावर करा.
  • उन्हात वाळवुन सुरक्षित पातळीपर्यंत आर्द्रता (बहुधा १०% ) आणल्याने उपद्रवाचा संसर्ग शेतापासुन साठवणीपर्यंत पोचणे कमी होते.
  • साठवणीची जागा स्वच्छ करुन धूमन करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा