Aleurocanthus woglumi
किडा
संक्रमित पाने विकृत, मुडपलेली असतात आणि अखेरीस अकालीच गळतात. मधाळ चिकट द्रव पानांवर आणि फांद्यांवर गोळा होतो आणि त्यावर बहुधा काळी बुरशी लागते ज्यामुळे झाडी काळी दिसते. मुंग्याही ह्या मधाळ द्रवाकडे आकर्षित होतात. पानांच्या खालच्या बाजुला किड्यांचे गट छोट्या काळ्या फुगीर भागांसारखे दिसतात. खाण्याने होणारे नुकसान आणि काळ्या काजळी बुरशीच्या वाढीमुळे झाडे कमकुवत होतात आणि फळधारणा कमी होते.
एनकार्शिया परप्लेक्सा, पोलास्झेक आणि अॅमिटस हेस्पेरिडम या माशा सिल्व्हेस्ट्री लिंबुवर्गीयावरील काळी माशीवर परजीवीपणा करतात. या माशा फक्त लिंबुवर्गीयावरील काळी माशीवर परजीवीपणा करताना आढळुन आल्या आहेत आणि हे पांढरी माशीचे जवळचे नातलग आहेत पण हे झाडांना आणि लोकांना उपद्रव करीत नाहीत. लेडीबर्ड, लेसविंग, ब्रुमस प्रजाती, स्किमनस प्रजाती आणि क्लिसोपर्ला प्रजाती यासारखे किडे हे अन्य नैसर्गिक शत्रु आहेत. सरकी तेल, मासळी तेल असलेला रॉसिन साबण (एफओआरएस) हे परिणामकारक आणि पर्यावरणपूरक ज्यामुळे फक्त काळी माशीची संख्याच कमी होत नाही तर पानांवरील काळी बुरशी देखील कमी होते. निंबोळी अर्कही (४%) फवारल्यास उपद्रवाची लोकसंख्या कमी होते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ए. वोग्लुमिच्या नैसर्गिक शत्रुंची जोपासना करण्यासाठी विस्तृत श्रेणींची कीटकनाशके वापरु नका. किडीचे, लागवड करण्याच्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करून किंवा रासायनिक फवारण्याद्वारे नियंत्रित करता येते. ५०%पेक्षा जास्त अंडी ऊबल्यानंतर आणि नव्या अळ्यांच्या शरीरावर संरक्षक कवच निर्माण होण्यापूर्वीच रोगनिवारक कीटकनाशकांची फवारणी करावी. क्विनालफॉस आणि ट्रायझोफॉसच्या वापराने लिंबुवर्गीयावरील काळी माशीची संख्या कमी होते. पानांच्या खालच्या बाजुला जिथे उपद्रव फोफावतो तिथे फवारणी केली गेली पाहिजे. झाडाची संपूर्ण झाडी या द्रावणाने भिजली पाहिजे.
लिंबुवर्गीयावरील काळी माशी (अल्युरोकँथस वोग्लुमि) हा मूळ आशियाई किडा आहे आणि विविध यजमान झाडांना प्रभावित करतो. हे पांढरी माशीच्या कुटुंबातील आहे पण प्रौढ दिसायला गडद निळसर राखाडी असतात म्हणुन त्यांना काळी माशी म्हटले जाते. प्रौढ फार आळशी, छोटे किडे असतात जे छोट्या अंतरापर्यंतच उडतात पण संध्याकाळच्या वेळी सक्रिय असतात आणि दिवसा पानांच्या खालच्या पृष्ठभागावर विश्रांती घेतात. माद्या गोलाकार संरचनेत पानांच्या खालच्या बाजुला सुमारे १०० सोनेरी रंगाची अंडी घालतात. छोट्या अळ्या चपट्या, लंबगोलाकार असतात आणि खवल्यांसारख्या दिसतात. काळी माशी सोंडेने पानातुन रस शोषण करते आणि त्याचवेळी ती मोठ्या प्रमाणात मधाळ द्रव सोडते. २८-३२ अंश तापमान आणि ७०-८०% सापेक्ष आर्द्रता हे यांच्या विकासासाठी इष्टतम परिस्थिती असते. ही माशी थंड वातावरणात जिवंत राहू शकत नाही.