Diaphorina citri
किडा
लिंबुवर्गीय पिकांवरील अळ्या त्यांच्या वाढीच्या टप्प्याप्रमाणे आणि मोसमातील काळाप्रमाणे झाडांना विविध प्रकारे प्रभावित करतात. प्रौढ आणि पिल्ल्यांनी खाल्ल्यामुळे नुकसान होते आणि मोसमातील नविन वाढ म्हणजे कळ्या, फुले, कोवळे कोंब आणि छोटी फळे कमजोर होतात. खाताना अळ्यांनी सोडलेल्या भरपूर मधाळ रसामुळे काळी काजळीची लागण होते ज्यामुळे पानांवरील प्रकाश विश्र्लेषण क्रिया कमी होते. अखेरीस, जास्त लोकसंख्या दाटी झाल्यास नविन पाने मुडपतात आणि वळतात तसेच कोंबाची वाढ कमी होते ज्यामुळे ते चेटकीच्या झाडूसारखे दिसते. मोठ्या लोकसंख्येमुळे कोवळी झाडे खुजी होतात आणि उत्पन्नावर चांगलेच कमी होते. हे किडे लिंबुवर्गीय हिरव्या जंतुंचे वाहकही असल्याने फारच नुकसानदायक ठरु शकतात.
अळ्यांची लोकसंख्या कमी असण्याच्या काळात शिकारी आणि परजीवी किडे सतत नियंत्रण पुरवु शकतात उदा. उष्ण, कोरड्या हवेत. परजीवी वॅस्पसमध्ये येतात टामारिक्झिया रॅडिएटा किंवा सिलीफेगस युफिल्यु्रे. शिकारी किड्यात येतात पायरेटबग अँथोकोरिस नेमोरालिस, लेसविंग क्रिसोपेर्ला कार्निया आणि लेडी बीटल कोसिनेल्ला सेप्टेम्पंक्टाटा. नीम किंवा बागायती तेलांवर आधारीत साबणही लोकसंख्येचे नियंत्रण करु शकतात पण संरक्षक मेणचट आवरण तयार होण्यापूर्वी वापरले गेले पाहिजे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. डायमेथोएटवर आधारीत कीटनाशकांचे फवारे वेळेत मारल्यास अळ्यांविरुद्ध प्रभावी असतात पण त्यांचा वापर शेवटचा उपाय म्हणुनच केला जावा. हे उत्पाद कीटकांनी संरक्षक मेणचट आवरण तयार करण्यापूर्वी वापरायला हवेत. जास्त फवारे मारल्यास अळ्या आणि इतर किडे जास्त जोमाने परत येऊ शकतात हे लक्षात ठेवा. डायमेथोएटची खळ (०.०३%) खोडाच्या सालींवर लावल्यास झाडांवर चढ-उतार करणारे स्थलांतरीत किड्यांना आळा बसेल.
डायाफोरिना सिट्री या लिंबुवर्गीय पिकांवरील अळ्यांच्या खाण्यामुळे लक्षणे उद्भवतात. प्रौढ ३-४ मि.मील लांब असुन तपकिरीसर काळे डोके आणि छातीचा भाग असतो, पोट फिकट तपकिरी असते आणि विखुरलेल्या ठिपक्यांचे झुबकेदार पंख असतात. ते खोडातील किंवा पक्व पानांच्या आसर्याने रहातात. प्रौढ अळ्यांचे आयुष्यमान तापमानावर अवलंबुन असते. २०-३० अंश हे उत्कृष्ट तापमान असते. तंड हवेत आयुष्यमान जास्त असते तर गरम हवेत ते कमी होते. वसंत ऋतुत माद्या सुमारे ८०० पर्यंत नारिंगी रंगाची अंडी कोवळ्या कोंबात आणि कळ्यांवर घालतात. पिल्ले चपटी, बहुधा पिवळी असतात आणि त्यांच्या सभोवताली रक्षणासाठी पांढरट मेणचट आवरण असते. पांढरे मेणचट वाढ किंवा तंतुंमुळे त्यांना अळ्यांपासुन स्पष्टपणे वेगळे ओळखता येते. जर त्यांना विचलित केले तर प्रौढांच्या तुलनेत पिल्ले छोटे अंतरच कापू शकतात. पेशींना झालेल्या नुकसानामुळे झाडाच्या सर्व भागांना पोषके पुरविण्याच्या रोपाच्या क्षमतेत बाधा येते.