वाळवी

 • लक्षणे

 • सुरु करणारा

 • जैव नियंत्रण

 • रासायनिक नियंत्रण

 • प्रतिबंधक उपाय

वाळवी

Termitidae

किडा


थोडक्यात

 • कोवळी किंवा जुनी रोपे मरगळतात आणि बहुधा जमिनदोस्त होतात.
 • वाळवी आणि त्यांची भुयारे मुळात आणि आजुबाजुला दिसतात.
 • मुळे आणि खोडाच्या बुडाशी पूर्ण पोकळ केलेले दिसते.

यजमान

वांगी

लहान वाटाणे आणि चणे

गहू

मका

भुईमूग

मॅनिओक

ऊस

लक्षणे

रुजलेल्या रोपापासुन ते पक्व रोपांपर्यंत वाढीच्या सर्व टप्प्यांवर वाळवी हल्ला करु शकते. त्या मुळांना नुकसान करतात ज्यामुळे त्याचा परिणाम प्रथम रोपाच्या वरच्या भागात मरगळीच्या रुपात दिसतो. वाळवीच्या अस्तित्वाची खात्री करण्यासाठी सगळी प्रभावित रोपे उपटुन त्यांची मुळे आणि बुडाचा खालचा भाग जिवंत किड्यांसाठी किंवा भुयारांसाठी तपासावा लागतो. रोपांची मुळे आणि खोडे पूर्णपणे पोकळ केली जाऊ शकतात आणि मातीच्या कचर्‍याने भरली जाऊ शकतात. काही रोपे जोरदार वार्‍यानेही जमिनदोस्त होतात आणि त्यांवर माती पसरलेली दिसते जिच्या खाली वाळवी सापडते. रोपांचे निरीक्षण सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा करणे महत्वाचे आहे कारण दिवसा जेव्हा तापमान उच्च असते तेव्हा वाळवी जमिनीत खोल जाऊन बसते.

सुरु करणारा

वाळवींच्या मोठ्या वसाहती असतात ज्यात कामकरी, सैनिक आणि प्रजोत्पादन करणार्‍या प्रकारचे किडे असतात. त्यांची वारुळे काही वेळा चांगलीच फैलावलेली असतात. काही वाळवी मृत झाडाच्या आर्द्र खुंटांवर वारुळ तयार करतात तर काही जमिनीखाली तयार करतात. त्यांच्या जमिनीखाली सुरक्षित असलेल्या वारुळातुन त्या रोपांच्या मुळांना आणि शेतातील इतर बाबींना खातात. इतर काही खाद्य उपलब्ध नसते तेव्हाच वाळवी रोपांवर हल्ला करते, म्हणुन जमिनीत भरपूर सेंद्रिय बाबी असण्याची खात्री करा. प्रजोत्पादन करणारे वाळवीच्या किड्यांना पंख असतात. बहुधा गडद रंगाचे आणि चांगल्या मोठ्या डोळ्यांचे असंख्य पंखवाले नर आणि माद्या झुंडीने उडतात. हे झुंडीने उडणे सहसा जास्त पावसानंतरच्या संध्याकाळी पहावयास मिळते. उडुन झाल्यानंतर, त्यांचे पंख गळतात, संभोग होतो आणि जमिनीतील खोल बिळात आणि लाकडांच्या फटीत शिरुन नविन वारुळे तयार करतात.

जैव नियंत्रण

वाळवींवर हल्ला करणार्‍या सूत्रकृमींवर आधारीत औषधेही ह्या उपद्रवाविरुद्ध प्रभावी आहेत. ब्युव्हेरिया बॅसियाना बुरशी किंवा मेटार्‍हिझियमच्या काही प्रजाती असणारी द्रावणे वाळवीच्या वारुळात सोडल्यास प्रभावी असात. बुरशीचे बीजाणूही तिटकारा आणतात. नीम बियांच्या टरफलाचा अर्क (एनएसकेइ) ही झाडांवरील आणि शेतातील पिकावरील वाळवीसाठी वापरण्यात आला असुन परिणाम चांगले आले आहेत. दुसरा उपाय म्हणजे लाकडाची राख किंवा कुटलेली नीमची पाने किंवा बिया वाळवीच्या वारुळात सोडल्यासही त्यांना तिटकारा येतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. क्लोरपायरीफॉस, डेल्टामेथ्रिन किंवा इमिडाक्लोप्रिडवर आधारीत उत्पादांची द्रावणे वारुळात इंजेक्शनांद्वारे सोडण्यात येऊ शकतात.

प्रतिबंधक उपाय

 • लागवड करताना अवशेष आणि सेंद्रिय बाबी कमी असलेली शुष्क कोरडी जमिन टाळा.
 • सकाळी किंवा संध्याकाळी लवकर रोपांची नियमित तपासणी करा.
 • प्रभावित रोपे किंवा भाग काढुन टाका.
 • रोपाच्या निरोगी वाढीसाठीची वातावरण निर्मीती करा.
 • रोपांना पाण्याचा ताण आणि विनाकारण इजा होऊ देऊ नका.
 • शक्य झाल्यास लवकर काढणी करा.
 • कारण वाळवी बहुधा पक्वतेनंतर शेतात राहिलेल्या पिकांवर हल्ला करते.
 • काढणीनंतर रोपांचे अवशेष आणि इतर कचरा काढुन टाका.
 • शेत नांगरुन वाळवीची वारुळे आणि भुयारे नष्ट करा ज्यामुळे त्या मुंग्या, पक्षी, कोंबड्यांवगैरेसारख्या शिकार्‍यांसाठी उघड्यावर पडतील.
 • पीक फेरपालट करा किंवा आंतरपिके घेत असलेल्या शेतात लागवड करा.