Anomis flava
किडा
अळ्या गटांनी कोवळी पाने खातात, त्यांचा पृष्ठभाग ओरबाडतात आणि बारीक छिद्रे मागे सोडतात. मोठ्या अळ्या पूर्ण पानाला कडेने सुरवात करुन मधल्या शिरांपर्यंत खातात. त्या फक्त मध्य शीर आणि इतर दुय्यम शिरा मागे सोडतात, ज्याला पानांचे सांगाडे होणे असे म्हटले जाते. नंतर ते कोवळे फुटवे, कळ्या आणि बोंडांना देखील खातात. काळी विष्ठा पानांच्या पृष्ठभागावर दिसणे ही कीटकांच्या उपस्थितीचे सामान्य लक्षण आहे. या उपद्रवाचा उद्रेक मुख्यतः हवामान परिस्थितीवर अवलंबुन असतो आणि खूप पण तीव्र झाल्यास उत्पादन कमी होऊ शकते. उंटअळी जर संख्येने खूपच जास्त असले आणि कोवळ्या रोपांवर हल्ला करीत असले तरच पिकांना धोका असतो. झाडे जशी मोठी होतात तशी त्यांचा या उपद्रवास प्रतिकारही वाढत जातो.
उंटअळीचे व्यवस्थापन नियमितपणे अंडी आणि कोवळ्या अळ्यांना शोधण्यावर आधारीत असते. इच्न्युमोनायडे, ब्राकोनिडे, सेलियोनायडे, ट्रायकोग्रामाटिडे आणि ताचिनिडे सारख्या काही जातींची परजीवी वॅस्पस कुटुंबेही जैविक नियंत्रण पद्धत म्हणुन वापरली जाऊ शकतात. आपण नीम तेलाच्या फवारण्या उच्च लोकसंख्या नियंत्रणासाठी वापरु शकता. उदा. निंबोळीच्या बियांचा अर्क (एनएसकेइ ५%) किंवा नीम तेल (१५०० पीपीएम) ला ५ मि.मी. प्रति ली. ची फवारणी केली जाऊ शकते.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कीटकनाशकांचा अतिरेकी वापर केल्यास किड्यांमध्ये प्रतिकार निर्माण होतो. अळ्या वाढत असताना त्यांत कीटकनाशकांचा प्रतिकार देखील वाढत असल्याने, अंडी आणि कोवळ्या अळ्यांना लक्ष्य करणे महत्वाचे आहे. अंड्याच्या अवस्थेतच उपचारांची शिफारस केली जाते. क्लोरँट्रानिलोप्रोल, एमॅम्क्टिन बेंझोनेट, फ्ल्युबेंडियामाइड, मेथोमाइल किंवा एसफेनव्हॅलरेट असणार्या कीटकनाशकांचा वापर केला जाऊ शकतो. रसायनिक उपचार कमी मूल्याच्या पिकांसाठी कदाचित व्यवहार्य नसतील.
अॅनोमिस फ्लावाच्या अळ्यांमुळे नुकसान होते, ज्याचा पतंग जगातील बऱ्याच भागात आढळतो. प्रौढ पतंगांचे पुढचे पंख नारिंगी तपकिरीसर असतात ज्याच्या कडेजवळ दोन राखाडी नागमोडी रेषा आडव्या जातात. ठळक नारिंगी, त्रिकोणी चिन्हे पंखाच्या वरच्या बाजुला शरीराला लागुन मध्यापर्यंत असतात. पाठचे पंख फिकट तपकिरी असुन त्याची काही खास वैशिष्ट्ये नाहीत. माद्या सुमारे ५००-६०० गोल अंडी पानांवर घालतात. कोवळ्या अळ्या फिकट हिरव्या असुन पातळ पिवळसर रेषा स्पष्ट पणे पहिल्या पाच भागांना वेगळे करतात. कोष तपकिरी रंगाचे असुन मुडपलेल्या पानात आढळुन येतात. सेमिलूपर हे इंग्रजी नाव, अळ्या कमानीसारखे शरीर वाकविण्याच्या पद्धतीने पुढे सरकतात त्याशी संदर्भित आहे.