सोयाबीन

सोयाबीनवरील खोड पोखरणारी अळी

Melanagromyza sojae

किडा

थोडक्यात

  • खोडाचे भाग मऊ, लालसर तपकिरी रंगाचे, कुजत असलेले दिसतात.
  • खाण्यासाठी आणि अंडी घालण्यासाठी केलेली अतिसूक्ष्म छिद्रे दिसतात.
  • वाढ खुंटते.
  • बारीक काळ्या माशा येतात.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

नुकसान खोडातील ऊतींचे कुजण्याद्वारे दर्शविले जाते. ते मऊ, लालसर तपकिरी रंगाचे होतात. खाण्यासाठी आणि अंडी घालण्यासाठी पानांच्या शीरांच्या कडेकडील टोकाशी केलेली अतिसूक्ष्म छिद्रे हेच बाहेरुन दिसणारी दृष्य लक्षणे आहेत. ५ ते ८ सें.मी. उंचीच्या रोपाला लागण होऊ शकते. खोडाचा व्यास कमी होतो आणि झाडाची उंची देखील (खुजेपणा) कमी होते. जर उत्पादकतेच्या टप्प्यावर संक्रमण झाले तर शेंगा कमी भरतात ज्यामुळे नुकसान होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

एम. सोजेचे भक्षक आणि इतर नैसर्गिक शत्रु भरपूर आहेत, जे वारंवार त्यांचे नियंत्रण करुन प्रसार रोखतात. परजीवी वॅस्पस जसे कि सिनिपॉइडे प्रजाती, स्फेजिगॅस्टर प्रजाती, युरिटोमा मेलानाग्रोमिझे, सिंटोमोफस कारिनेटस आणि अॅनेयुरोप्रिया कैरालि, स्फेजिगॅस्टर प्रजातीत उपद्रवाचे नियंत्रण ३% तर इ. मेलानाग्रोमिझेचे २०% नी करते. सिनिपॉइडे प्रजाती आणि इ. मेलानाग्रोमिझेचा वापर एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीत केला जाऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पेरणीच्या वेळी जमिनीवरील उपचार म्हणुन किंवा उगवल्यानंतर लँब्डा-सायहॅलोथ्रिन ४.९% सीएस, टियामेथोक्झाम १२.६% झेडसी आणि लँब्डा-सायहॅलोथ्रिन९.५% झेडसी किंवा इंडोक्झाकार्ब १५.८% इसीचा वापर फवारणी द्वारे करणे महत्वाचे आहे.

कशामुळे झाले

मेलानाग्रोमिझा सोजे नावाच्या सोयाबीनवरील खोडे पोखरणार्याल अळीमुळे बहुधा लक्षणे उद्भवतात. प्रौढांचे वैशिष्ट्य आहे कि ते बारीक काळ्या माशा असतात. खोड पोखरणार्याा माद्या जमिनीत झाडाच्या जवळ अंडी घालतात. उबल्यानंतर अळ्या खोड पोखरुन वरच्या दिशेने किंवा मुळांच्या दिशेने आतला भाग खातात. ह्यामुळे शेंडे वाळतात. नंतरच्या टप्प्यावर खोडातच मोठ्या झालेल्या अळ्या जमिनीवरील अवशेषात छिद्र करुन त्यात कोशात जातात. जर खोड कापले तर खाण्याने तयार झालेले बोगदे पहायला मिळतात. असे दिसुन आले आहे कि दर २री आणि ३री पिढी जास्त नुकसान करते. एम. सोजे क्वचितच यजमान रोपाला मारते पण आर्थिक उत्पन्नाचे खूप नुकसान करते. जितक्या उशीरा संक्रमण होईल तितके उत्पन्नाचे नुकसान कमी होईल. असा अहवाल आहे कि ओफियोमिया फासियोली, ए. सोजेपेक्षा जास्त नुकसान करते, याचाच अर्थ असा होतो कि १००% नुकसान कधीही एम सोजेशी संबंधित नसते. विविध पर्यावरण हवामान परिस्थितीत सोयाबीनवरील खोडे पोखरणारे आढळतात आणि ते विविध शेंगवर्गीय / कडधान्यांच्या जातींवर हल्ला करतात.


प्रतिबंधक उपाय

  • सहनशील वाण उदा.
  • तामिळनाडुत सीओ-१, किंवा मध्यप्रदेशात, राजस्थान आणि महाराष्ट्रात एनआरसी ७, एनआरसी ३७ लावा.
  • शेताचे नियमितपणे खासकरुन छोट्या आणि काळ्या प्रौढ एम.
  • सोजेसाठी निरीक्षण करा.
  • खाण्याचे बोगदे शोधा.
  • पीक फेरपालटची शिफारस केली जाते.
  • काढणीनंतर पुढील हंगामात पेरणीला उशीर होऊ नये म्हणुन जमिन पुरेशी तयार करुन ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा