खरबूज

भूमध्य जरतारी पतंग

Spodoptera littoralis

किडा

थोडक्यात

  • सुरवंट वेलींचे सर्व भाग खातात.
  • खूप वेगवेगळ्या पिकांना खाणारे हे किडे अनेक पिकांना प्रभावित करतात.
  • ह्यामुळे वेलींच्या विकसनात बाधा येते.
  • फळे छोटी किंवा धरतच नाहीत.

मध्ये देखील मिळू शकते


खरबूज

लक्षणे

अळ्यांनी खाण्यामुळे खूप नुकसान होते, बहुधा पूर्ण वेलच रिकामी होते. अळ्यांना कोवळी पाने आवडतात पण त्या कोंब, फुटवे, फांद्या, कळ्या, फळे आणि वेलींचे सर्वच भाग खातात. अळ्या फांदीच्या आतुन खाण्यासाठी छिद्र करतात आणि इतर रोगही आत शिरतात. जर अळ्या कोवळ्या वेलींना खातील तर वेलींचे विकसन पूर्ण होणार नाही आणि अशा वेलींना छोटी फळे लागतात किंवा फळधारणाच फार उशीराने होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

उचित एकात्मिक किट व्यवस्थापन, प्रतिबंधापासुन सुरवात करणे अत्यंत महत्वाचे आहे. कामगंध सापळे वापरुन उपस्थिती जाणुन घेणे तसेच त्यांना मोठ्या संख्येने पकडणे आणि संभोगात व्यत्यय आणणे खूप महत्वाचे आहे.

रासायनिक नियंत्रण

हे किडे बहुतेक रसायनिक संयुगांना प्रतिकार करतात. नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा.

कशामुळे झाले

ज्या भागात हिवाळ्यात कमी हीम पडते तिथे ह्यांची लागण सहज होते. अंडी आणि अळ्या दोन्हींचा प्रसार शेतातील लागवड सामग्रीद्वारे किंवा रोपांमुळे होतो. ह्यांचे प्रौढ हे छोट्या द्राक्षाच्या मापाचे असतात. त्यांचे पंखही राखाडी-तपकिरी असुन त्यावर सफेद रेषा असतात. माद्या त्यांची बहुतेक अंडी (२० ते १००० संख्येने) कोवळ्या पानांच्या खालच्या बाजुस अथवा वेलींच्या वरच्या भागात घालतात: अंडी पिवळट पांढरे असतात आणि मादीच्या ओटीपोटावरील केसांच्या खवल्यांनी झाकलेली असतात. अळ्या सुमारे अंगठ्याच्या लांबीच्या, केशरहित, विविध रंगाच्या (गडद राखाडी ते गडद हिरव्या) असतात ज्या नंतरच्या टप्प्यांवर लालसर तपकिरी किंवा फिकट पिवळ्या होतात.


प्रतिबंधक उपाय

  • किड्यांची गतिविधी पहाण्यासाठी एकरी एक कामगंध सापळा जमिनीपासून १-२ मी.
  • उंचीवर लावावे.
  • ह्या किड्यांचे भक्षक मित्र किडे, हे ह्या किड्यांना खाऊन ह्यांची लोकसंख्या नियंत्रण करतात, ते नाहीसे होऊ नयेत म्हणुन अनावश्यक, कोणत्याही कीटकनाशकांची फवारणी करु नये.
  • सुरवंट किंवा अंड्यांचे पुंजके रोपांवर नाहीत ना हे चांगले तपासुन मगच लागवड करावी.

प्लँटिक्स डाऊनलोड करा