Atherigona sp.
किडा
अळ्या अंकुरलेल्या कोवळ्या रोपांचे कोंब खातात ज्यामुळे "मृत गाभा" लक्षणे गव्हात आणि मक्यात दिसतात. नविन कोंबात जिथुन किडे आत शिरले त्या जागी छोट्या वर्तुळाकार चिरा दिसतात, बहुधा पहिल्या पर्णकोषाच्या थोड वरती. नुकसानाची लक्षणे संक्रमण झाल्यानंतर ६-७ दिवसांनी जेव्हा पाने उमलतात तेव्हा ठळकपणे दिसतात. चिरलेली पाने फिकट हिरवी किंवा पिवळसर हिरवी होतात आणि लोंबकळतात, कडांपासुन आतल्या बाजुला मुडपतात. गंभीर संक्रमण झालेली कोवळी रोपे मरगळतात, कोंबांची वाढ थांबते आणि रोप खुजे रहाते. जरी माद्यांनी जास्त अंडी घातलेली असली तरी, बहुधा एकच अळी एका रोपावर दिसुन येते.
ह्या उपद्रवाचे जैव नियंत्रण करण्यासाठी कोणतेही उपचार आजपर्यंत उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. ह्या किड्यांचे संक्रमण दडपण्यसाठी आणि उच्च लोकसंख्या टाळण्यासाठी लवकर पेरणी करण्याची शिफारस करण्यात येते. पायरेथ्रॉइड कीटनाशकांच्या वापरानेही लोकसंख्येचे नियंत्रण करण्यात मदत होते.
अथेरिगोना जातीच्या पुष्कळ माशांच्या अळ्यांमुळे नुकसान उद्भवते. ह्या छोट्या राखाडी रंगाच्या माशा पॉलिफेगस आहेत आणि गहू, मका आणि ज्वारीसारख्या मुख्य पिकांवर हल्ला करतात. मिरी, बीन्स किंवा कडधान्यांसारख्या इतर रोपांवरही प्रभाव पडु शकतो. माद्या अंडी एकेकटी किंवा क्वचित जोडीने, फांदीवर किंवा कोवळ्या रोपाच्या बुडाजवळ जमिनीत (३-४ पानांचा टप्पा भावतो) घालतात. जमिनीत शेणखत दिल्याने जास्त स्त्री माशा आकर्षित होतात आणि अंडी घालण्याची क्रिया जास्त होते. नुकत्याच बाहेर आलेल्या अळ्या दंडगोलाकार आणि पांढर्या असतात. त्या रोपांवर चढतात आणि अणकुचीदार तोंडाने नविन कोंबांचे मऊ भाग चावतात, बहुधा पहिल्या पर्णकोषाच्या थोड वर. खोडाच्या बुडाशी कोषात जातात. ह्या माशा मध्य आणि दक्षिणपूर्व आशियात शेतीवरील फारच नुकसानदायक उपद्रव आहेत.