भात

भात पोखरणारी आशियाई अळी

Chilo suppressalis

किडा

थोडक्यात

  • रोपवाटिकेतच बहुधा रोपांची मर होते.
  • पर्णकोष, पान आणि खोडांना खाल्ल्याने नुकसान होते.
  • कोवळ्या रोपात "मृत गाभा" दिसतो.
  • कणसात दाणे भरत नाहीत, "पळीज" दिसतो.
  • पतंगांच्या शरीराचा आणि पुढच्या पंखांचा रंग पिवळसर असतो तर पाठचे पंख पांढरे असतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

रोपात (बहुधा रोपवाटिकेतच) प्रादुर्भावाचे वैशिष्टे म्हणजे कोवळी पाने वाळतात आणि फुटव्यांची मर होते, या लाक्षणाला ‘गाभा जळणे’ असेही म्हंटले जाते. प्रौढ झाडाच्या कोवळ्या पानांवर अळ्यांनी केलेली बारीक छिद्रे खासकरुन पर्णकोषात दिसतात. मोठ्या अळ्या पेरांच्या बुडाशी छिद्रे पाडून आत प्रवेश करून आतील भाग खातात व काही वेळा झाडास आतुन पूर्णपणे पोकळ करतात. ह्या झाडांची वाढ खुंटते आणि पाने पिवळी पडुन पूर्ण सुकुन मुडपतात, अखेरीस गळतात. पीक पोटरीवर आल्यानंतर जर कीड पडली तर दाणे न भरलेल्या पांढऱ्या ओंब्या बाहेर पडतात, त्याला 'पळीज' म्हणतात. एक अळी बर्‍याच झाडांना नष्ट करु शकते आणि जास्त उपद्रव झाल्यास १००% पीक नष्ट होते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पॅराथेरेशिया क्लॅरिपाल्पिस आणि एरिबोरस सिनिकस नावाचे परजीवी वॅस्पस शेतात सोडल्याने उपद्रवाची संख्या वाढण्यास आणि नुकसान होण्यास चांगलीच मर्यादा पडते असे काही देशात दिसुन आले आहे. काही कोळ्यांच्या प्रजाती देखील भक्षक श्रेणीत येतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर कीटनाशकांची गरज भासलीच तर क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल असणार्‍या उत्पादांची फवारणी करावी. दाणेदार कीटनाशके लागवड करते वेळेस आणि वाढीच्या काळात वापरल्याने प्रादुर्भाव कमी होतो. या प्रादुर्भावाला सुरवातीच्या लक्षणातच ओळखले गेले पाहिजे, नाहीतर पीक वाचविण्यात काहीही अर्थ उरत नाही.

कशामुळे झाले

चिलो सप्रेसॅलिस नावाच्या खोड पोखरणार्‍या आशियाई अळीमुळे नुकसान होते. ही मुख्यत्वेकरुन दक्षिण आशियात सापडते आणि प्रतिवर्षी तिच्या दोन पिढ्या तयार होतात. सुरवंट जास्त करुन आतील भाग खातात, तर प्रौढ बाहेरुन रस पितात. भाताव्यतिरिक्त ही ज्वारी आणि काही प्रकारच्या जंगली गवतांवरही हल्ला करते. अळ्या भाताच्या अवशेषात आणि गवतात सुप्तावस्थेत रहातात आणि थोड्या गारा पडल्यासही जगु शकतात. माद्या पानांच्या खाली, बहुधा शिरांच्या बाजुने पुंजक्याने ३०० पर्यंत अंडी घालतात आणि त्याभोवती तपकिरी रंगाच्या स्त्रावाचे आवरण घालतात. उबल्यानंतर अळ्या पानाचे वरचे थर खातात आणि नंतर पर्णकोषात बोगदे तयार करतात, ज्यामुळे पाने पिवळी पडून मर होते. जेव्हा अळ्या खोडापर्यंत पोचतात तेव्हा त्या खोडाला एक पेरास एका वेळी प्रमाणे सर्व पेरे पोकळ करतात. झाडात उच्च सिलिका सामग्री असल्यास ती अळ्यांच्या खाण्यात आणि पोखरण्यात बाधा आणते असे वाटते.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक किंवा सहनशील वाण लावा.
  • उच्च सिलिका असणारे वाण वापरा ज्यामुळे खाणार्‍या आणि पोखरणार्‍या अळ्या कमजोर होतील.
  • भातशेतीच्या आजुबाजुला पर्यायी यजमान (ज्वारी) लावणे टाळा.
  • संक्रमण टाळण्यासाठी मोसमात लवकर पेरणी करा किंवा लवकर तयार होणारे वाण लावा.
  • लक्षणे लवकर समजण्यासाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • किड्यांना बुडविण्यासाठी अधुनमधुन शेतात पाणी भरा.
  • पीक घेतल्यानंतर शेत खोल नांगरुन झाडांचे अवशेष आणि गवत काढुन टाका ज्यामुळे पुढच्या मोसमात लागणीस प्रतिबंध होईल.
  • आजुबाजुच्या शेतांबरोबर पेरणी करा ज्यामुळे किड्यांचे जीवनचक्र तोडले जाईल.
  • नैसर्गिक शत्रुंना अबाधित ठेवण्यासाठी कीटनाशकांचा वापर विवेकाने करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा