Sogatella furcifera
किडा
किड्यांची पिल्ले आणि प्रौढ दोन्ही, रोपाच्या खालच्या किंवा वरच्या भागात बहुधा पाने आणि खोडाच्या पेऱ्यात आढळतात. ते रोपाचे रस शोषण करतात व पेशींना खातात ज्यामुळे रोपाला पाणी आणि पोषके मिळत नाहीत आणि पाने मरगळतात तसेच रोपाची वाढ खुंटते ही सुरवातीची लक्षणे आहेत. संख्येने दाटी झाल्याने "तुडतुड्यांमुळे करपणे" होते म्हणजे पाने हळुहळु टोकापासुन मध्य शीरेपर्यंत नारिंगी पिवळी पडतात, वाळतात आणि मरतात. रोपे खुजी होतात, कमी फुटवे येतात आणि जमिनदोस्त होऊ शकतात. किडे कणसावर देखील हल्ला करु शकतात ज्यामुळे ओंब्या तपकिरी होतात, दाणे लालसर किंवा काळे होऊन फुटलेले असतात आणि उत्पादनात घट होते.
एस. फरसिफेराची संख्या कमी राखण्यासाठी सर्वसामान्यपणे नैसर्गिकरीत्या होणारे जैविक नियंत्रण घटक वापरावेत. मिरिड बग, सिर्टोर्हितनस लिव्हिडिपेनिस आणि काही अॅनाग्रसच्या काही प्रजाती (ए. फ्लव्हेलस, ए. पर्फोरेटर, ए. ऑप्टाबिलिस आणि ए. फ्रिक्वेन्स) सारख्या फेयरीफ्लाइज भक्षक त्यांच्या अंड्यांवर हल्ला करतात. बरेच भक्षक कोळी उदा. लिकोसा स्युदोन्युलाटा देखील यांवर हल्ला करतात. शेवटी एरिनिया देलफासिस बुरशी देखील यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. तुडतुड्यांच्या व्यवस्थापनाकरता खूप जास्त कीटकनाशके वापरली असता ते प्रतिकार निर्माण करतात.ऑक्झॅमि १, काही पायरेथ्रॉइडस, ब्युप्रोफेझिन, पायमेट्रोझिन कीटनाशके आलटुन पालटुन वापरल्यास प्रभावी उपचार होतात.
सोगाटेला फरसिफेरा नावाच्या पांढर्या पाठीच्या तुडतुड्यामुळे हे नुकसान होते. प्रौढ सुमारे ३ मि.मी. लांबीचे, फिकट तपकिरी ते काळे असतात आणि पुढचे पंख अर्धपारदर्शक असुन त्यावर वैशिष्ट्यपूर्ण गडद तपकिरी चिन्ह टोकावर असते. किडे बहुधा उच्च उत्पादन देणार्या रोपांवर (पण संवेदनशील) हल्ला करतात. ह्यांची उच्च प्रजनन क्षमता आणि स्थलांतराच्या सवयींमुळे हा पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलियामधील भातशेतीतील मोठा उपद्रव आहे. एस. फरसिफेरा विषांणुंचे वहनही कायम करीत असतो उदा. भातातवरील काळे पट्टे देणारा खुजा विषाणू रोग आणि भातातवरील दक्षिणात्य काळे पट्टे देणारा खुजा विषाणू रोग. पेरणीची वेळ, जास्त नत्र असलेल्या खतांचा अतिरेकी वापर आणि सिंचनासाठी वापरलेले मुबलक पाणी यामुळे यांच्या संख्येवर मोठा परिणाम होतो. हवामान घटक जसे कि तापमान, आर्द्रता किंवा पाऊससुद्धा यांच्या जीवनचक्रातील महत्वाचे पैलु आहेत.