कोबी

पाठीवर चौकडी असणारा पतंग

Plutella xylostella

किडा

थोडक्यात

  • अळ्या पानांच्या भागात बोगदे करतात किंवा पानांच्या खालील भाग खरवडतात, ज्यामुळे बेढब धब्बे तयार होतात.
  • पानाची वरची त्वचा काहीवेळा शाबूत सोडली जाते, ज्यामुळे खिडक्यांसारखा परिणाम दिसतो.
  • क्वचित पानांचा सांगाडाही उरतो आणि ब्रोकोली किंवा फुलकोबीच्या गड्ड्यात बाधा येते.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके
कोबी
कॅनोला
फुलकोबी

कोबी

लक्षणे

पाठीवर चौकडी असणारे पतंग बहुधा त्यामानाने कमी महत्वाचे समजले जातात. तरीपण ह्यांची लोकसंख्या जास्त झाल्यास ब्रासिका पिकांसाठी ते उपद्रव करु शकतात. ह्यांच्या अळ्यांनी पानांत बोगदे केल्याने किंवा पानाच्या खालील पृष्ठभागाला खरवडल्याने नुकसान होते. जरी पानांचा वरचा पृष्ठभाग काही वेळेस शाबूत राहिला तरी बेढब धब्बे दृष्य असतात ज्यामुळे खिडकीसारखा परिणाम दिसतो. मोठ्या अळ्या अधाशी असतात आणि गंभीर संक्रमणात, शिरा सोडुन पूर्ण पान खाल्ले जाऊ शकते (पानांचे फक्त सांगाडे उरतात). फुलांवर अळ्यांची उपस्थिती असल्यास ब्रोकोली किंवा फुलकोबीचे गड्डे तयार होण्यात बाधा येते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

पाठीवर चौकडी असणार्‍या पतंगांच्या शत्रुत येतात डायडेग्मा इनस्युलेर, ओमिझस सोकोलोव्स्की, मायक्रोप्लिटिस, प्ल्युटेले, डायड्ोमस सबटिलिकोर्निस आणि कोटेशिया प्ल्युटेले. ह्या परजीवीं व्यतिरिक्त एनटोमोपॅथोजेनिक बुरशी किंवा न्युक्लियर पॉलिहेड्रॉसिस विषाणू असणारी द्रावणे लोकसंख्येचे नियंत्रण करण्याकरीता वापरली जाऊ शकतात. बॅसिलस थुरिंगिएनसिस असणारी कीटनाशक द्रावणेही फायदा देतात तरीपण प्रतिकार निर्माण न होण्यासाठी उत्पादांचा फेरपालट शिफारशीत आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. किटनाशकांचा प्रतिकार चांगलास प्रसारीत झालेला आहे आणि ह्या बहुतेक श्रेणीचे उत्पाद येतात (ज्यात काही जैविकही आहेत), म्हणुन सक्रिय घटकांच्या फेरपालटाची फार शिफारस करण्यात येते. पायरेथ्रॉइड असणारे उत्पाद ८०च्या दशकात फार वापरले गेल्याने आताच काम करीनासे झालेत.

कशामुळे झाले

प्ल्युटेला झालोस्टेला नावाच्या पाठीवर चौकडी असणार्‍या पतंगांच्या अळ्यांमुळे नुकसान होते. ह्यांचे मुख्य यजमान ब्रासिका कुटुंब आहे आणि ह्यात ब्रोकोली, कोबी, फुलकोबी, मुळे आणि शलगम तसेच पुष्कळसे तण येतात. प्रौढ छोटे आणि सडपातळ, सुमारे ६ मि.मी. लांब आणि मोठ्या ठळक मिशांचे असतात. त्यांचे शरीर गडद तपकिरी असुन पाठीवर विशिष्ट फिकट तपकिरी पट्टा असतो. त्यांना चांगले उडता येत नाही पण वार्‍याबरोबर लांब अंतरांपर्यंत वाहुन नेले जाऊ शकतात. प्रत्येक मादी सुमारे १५० अंडी पानांच्या खालच्या बाजुला शिरांजवळ बहुधा आठ अंड्यांच्या पुंजक्याने घालते. छोट्या अळ्या पानांत बोगदे करुन खातात तर मोठ्या अळ्या पानाच्या खालचा भाग खरवडुन खातात. ज्यामुळे बेढब धब्बे दिसतात. पावसाला छोट्या अळ्यांच्या मृत्युचा मोठा घटक मानण्यात आले आहे.


प्रतिबंधक उपाय

  • राई, शलगम, कोहलार्बीसारखे प्रतिकारक वाण लावा.
  • सामान्य मेणचट (राखाडी हिरव्यापेक्षा, हिरवे) पृष्ठभागापेक्षा चकचकीत पृष्ठभाग असलेले वाण लावा, कारण ते ह्या उपद्रवास जास्त प्रतिकारक असतात.
  • रोपणीपूर्वी रोपे किटमुक्त आहेत ह्याची खात्री करा.
  • नुकसानाची चिन्हे किंवा अळ्यांची उपस्थिती (१ अळी प्रति ३ रोपे किंवा एक छिद्र प्रति रोप ही सीमा आहे), ह्यासाठी शेताचे निरीक्षण करा.
  • कामगंध सापळे वापरुन प्रौढांना पकडा आणि लोकसंख्येचे मूल्यांकन करा.
  • शक्य असल्यास फवारा सिंचन वापरा कारण हे सिंचन पावसाची नक्कल करते.
  • यजमान नसलेल्या अनुरुप पिकांची आंतरपिके घ्या.
  • इतर कुटुंबातील पिकांबरोबर फेरपालट करा.
  • काढणीनंतर पिकाचा कचरा काढुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा