Elateridae
किडा
जमिनीतील अंकुरणार्या बिया, मुळे आणि कोवळ्या अंकुरलेल्या रोपांना वायरवर्म्स खातात, ज्यामुळे रोप थेट मरते किंवा जखमा होतात. ह्या जखमा संधीसाधू जंतुंची मुक्तद्वारे होतात आणि लक्षणे आणखीन खराब होतात. पेरल्यानंतर थोड्याच काळात अंकुरलेली रोपे मरणे आणि पेरलेल्या बियाणांची फक्त टरफलेच शिल्लक उरणे ही जमिनीतील ह्या उपद्रवाच्या संक्रमणाची लक्षणे आहेत. रोपाच्या वाढीच्या नंतरच्या काळात, कोवळी रोपे मरगळतात आणि रंगहीनतेची लक्षणे दर्शवितात. मधली पाने खाल्ल्याचे नुकसान दर्शवितात किंवा मरतात तर बाहेरची पाने हिरवी रहातात. खोडाच्या चिरफळ्या होतात पण तरीही मुळांना चिकटुन रहाते. शेतात पातळ खोडांचे भाग किंवा नुसतीच मोकळी रोपे दिसणे सामान्य आहे. बहुतेक नुकसान वसंताच्या सुरवातीलाच होते. वायरवर्म्स वसंतात बटाट्यांच्या डोळ्यात आणि शरदात वाढत असलेल्या कंद पिकात बोगदे करतात.
काही ग्राऊंड बीटल्स आणि रोव्ह बीटल्स वायरवर्म्सना खातात. स्टिलेटो माशा (थेरेव्हिडे) ही वायरवर्म्सची शिकार करतात. सूत्रकृमींच्या कही जातीही वायरवर्म्सना खातात. मेटार्हिझियम अॅनिसोप्ले बुरशी वायरवर्म्सना संक्रमित करते आणि मारते. वायरवर्म्सचे संभावित नियंत्रण उपाय होऊ शकतो का हे ठरविण्यासाठी ही बुरशी असणार्या दाणेदार मिश्रणाची चाचणी सुरु आहे.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. वायरवर्म्सच्या नुकसानाचा प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी उपचार केले गेले पाहिजेत. कीटनाशकांनी बियाणांवर उपचार केले असता ह्यांच्या संख्येविरुद्ध थोडे नियंत्रण मिळविता येते. ह्यातील काही उत्पांदांच्या उपयोगाबाबत आपल्या देशातील बंधनांविषयी जागरुक रहा.
(एलाटेरिडे) क्लिक बीटल्सच्या गटाच्या अपक्व अळ्यांमुळे लक्षणे उद्भवतात. वायरवर्म्स सुमारे २ सें.मी. लांब, सडपातळ दंडगोलाकार शरीर, आणि पांढते, पिवळसर किंवा तांब्याच्या रंगाचे असतात. माद्या काही शेकड्यांनी पण एकेकटी अंडी उन्हाळ्यात मातीच्या कणांत घालतात. सैल आणि वालुकामय माती त्यांच्या विकासाला अनुकूल असते. अळ्या जमिनीखालील रोपाचे भाग, अंकुरत असणार्या बिया किंवा कोवळी रोपे २-३ वर्षे खातात आणि मग वयात येतात. ह्यामुळे पुष्कळदा बारीक रोपे आणि कमी उत्पन्न मिळते. गव्हाव्यतिरिक्त त्या मका, गवते आणि काही भाज्या (बटाटे, गाजर, कांदे) ह्यांवरही हल्ला करतात. पिकाचे नुकसान रोपणीनंतर लक्षात येते, जेव्हा परिणामकारक उपाय करण्यास फार उशीर झालेला असतो. म्हणुन पेरणीपूर्वीच वायरवर्म्सना शोधणे महत्वाचे ठरते.