Lepidosaphes beckii
किडा
जांभळे शिंपी खवले हे फळांच्या, पानांच्या, काटकीच्या आणि खोडाच्या, अशा झाडांच्या विविध भागांना चिकटुन बसतात. ते झाडाचे रस शोषण करतात, ज्यामुळे पुष्कळशा दृष्य समस्या निर्माण होतात. तयार फळांवर ज्या ठिकाणी खवल्यांनी खाल्ले आहे तिकडचा भाग हिरवा होऊ लागतो. पाने पिवळी पडतात आणि गळतात. गंभीर बाबतीत, फांद्यांची टोक वाळु लागतात आणि हे नुकसान, फांदीच्या टोकाकडुन फांदीच्या पेरापर्यंत पसरत येते.
अंड्याची पहिली वीण बाहेर येण्यापूर्वी, हिवाळ्या उशीरा वा जर संसर्ग आपल्या लक्षात लवकर आला तर झाडावर सुप्त तेल आणि लाईम सल्फरची फवारणी करावी. छोट्या झाडांसाठी किंवा मोठ्या झाडाच्या हात पोचु शकणार्या भागांवरुन प्लास्टिकच्या भांडी घासायच्या घासणीने घासुन जमा झालेल्या खवल्यांना खरवडुन पाडावे. बहुधा, नैसर्गिक शत्रुच ह्या किडींच्या लोकसंख्येस आळा घालतात, म्हणुन ह्या किडी मोठी समस्या निर्माण करीत नाहीत.
ह्या किडींमुळे खूप कमी नुकसान होते, पण जेव्हा ह्यांची संख्या मोठी होते तेव्हा मात्र गंभीर नुकसान होऊ शकते, ज्यासाठी संभवत: रसायनिक नियंत्रणाची गरज भासु शकते. ह्या किडी दिसल्यानंतर, कीटनाशकांनी त्यांना मारणे अत्यंत अवघड होते कारण त्यांच्यावरील खवले त्यांच संरक्षण करतात. ह्यांचे नियंत्रण करण्याचा सर्वोत्कृष्ट उपाय म्हणजे मोसमात लवकर जेव्हा छोट्या अळ्या कवच विरहित असतात आणि खाण्यासाठी एकाच जागी बसण्यापूर्वी फिरत असतात. कृत्रिम पायरेथ्रॉईडसारख्या विस्तृत श्रेणी कीटनाशकांचा वापर टाणळे अतिउत्तम कारण ही कीटनाशके मित्र किडींचाही नाश करतात. म्हणुनच झाडांद्वारे शोषल्या जाणार्या कीटनाशकांचा वापर करावा.
झाडावरील फोडासारखे दिसणारे भाग ह्या जांभळ्या शिंपी किड्यांच्या प्रौढ माद्या असतात. त्या हलत नाहीत आणि जांभळट तपकिरी सुरक्षा कवचाखाली लपत असतात. ह्या माद्या त्यांच्या सुरक्षा कवचाखाली अंडी घालतात, जिथे ती पूर्ण हिवाळाभर सुरक्षित रहातात आणि मे अथवा जून महिन्यात ऊबतात. ह्या किडींचे प्रजनन वर्षातुन एकदा होते. छोट्या अळ्या हलु शकतात आणि नविन झाडांवर चालत किंवा वारा, वाहने, प्राणी, पक्षी आणि मानवांचे कपडे ह्यांद्वारे पसरतात. ज्या रोप सामग्रीतुन किडे आले त्याद्वारेही पसरतात.