ऑलिव्ह

ऑलिव्हवरील लेस बग्ज (झालर किडे)

Froggattia olivinia

किडा

थोडक्यात

  • पानांच्या पृष्ठभागावर ठिपकेदार रंगहीनता.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
ऑलिव्ह

ऑलिव्ह

लक्षणे

पानांच्या पृष्ठभागावर पिवळे विखुरलेले ठिपके (ठिपकेदार रंगहीनता) कालांतराने तपकिरी होऊन गळतात. ह्या नुकसानामुळे मोठ्या प्रमाणावर पानगळ होऊन फळांचे उत्पादन कमी भरते.

शिफारशी

जैविक नियंत्रण

छोट्या प्रमाणात जैविक नियंत्रण कायमच यशस्वी असते. लेस बग्जच्या अंड्यांवर उपजिविका करणारे किडे अहवालित आहेत पण ते पुष्कळशा पारंपारिक ऑलिव्ह बागेत उपस्थित असण्याची शक्यता फारच थोडी आहे खास करुन जर बागेची जागा मोकळे मैदान असेल (अंड्यांवर उपजिविका करणारे किडे हे मधुरस पिणारे असतात). हिरवे लेसविंग हे ग्रीन यशस्वी नियंत्रणासाठी वापरले जाणारे सर्वात सामान्य भक्षक आहे.

रासायनिक नियंत्रण

रसायनिक उपचार करताना जर फवारणी व्यवस्थित केली जाऊ शकत असेल तर लेस बग्जना मारणे सोपे आहे. नैसर्गिक पायरेथ्रम (पायरेथ्रिन) आणि कृत्रिम पायरेथ्रम (पायरेथ्रॉइडस) हे ऑलिव्हवरील लेस बग्जचे नियंत्रण करण्यात प्रभावी आहेत. फॅटी अॅसिडचे पोटॅशियम सॉल्ट ज्यास सोप सॉल्ट असेही म्हणतात, त्यांनीही किडीचे नियंत्रण केले गेल्याचे अहवाल आहेत. काही ऑर्गॅनोफॉस्फेटसचा वापरही उत्पादन पातळीवर केला जाऊ शकतो. नविन ऊबलेल्या अळ्यांचे नियंत्रण करण्यासाठी दर १०-१४ दिवसांनी परत एकदा फवारणी करावी. जर कीटनाशके वापरत असाल तर संरक्षक कपडे वापरा आणि उत्पादन लेबलावरील सूचना जसे कि मात्रा, वापराची वेळ आणि काढणीपूर्वी केव्हा वापरावे तो काळ यांचे पालन करा. कीटकनाशकांच्या वापरांच्या स्थानिक नियमांचे पालन नेहमीच करा.

कशामुळे झाले

फ्रॉगाटिया ऑलिव्हिनियामुळे नुकसान उद्भवते. नुकसानीत पानांच्या खालील बाजुस किडींच्या विविध अवस्था एकवटलेल्या आढळणे सर्वसामान्य आहे. झाडावर विश्रांती घेत असलेली अंडी बहुधा वसंत ऋतुत किंवा हिवाळ्यात उशीरा ऊबतात. प्रौढ छोट्या अंतरापर्यंत उडु शकतात. पिल्ले आणि प्रौढांच्या खाण्याने पानांच्या पृष्ठभागावर पिवळे विखुरलेले ठिपके दिसतात. हवामानाप्रमाणे ऑलिव्ह लेस बग्जच्या पुष्कळ पिढ्या एका वर्षात होऊ शकतात. वाढीच्या पूर्ण काळात नविन प्रादुर्भाव होत राहू शकतो. किडीच्या सर्व हालचाल करणार्‍या अवस्थात टोचुन शोषणारे मुखभाग त्यांना असतात, म्हणुन किडीच्या सर्वच अवस्था नुकसान करु शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • किडींच्या नविन प्रादुर्भावासाठी झाडांची तपासणी वसंत ऋतुच्या सुरवातीस करावी.
  • किडींच्या कार्याची लक्षणे दिसताक्षणीच नियंत्रक उपाय करावेत.
  • नियंत्रण न केल्यास लेस बग्जची लोकसंख्या झपाट्याने वाढते.
  • नियंत्रण उपाय लागू करण्यासाठी खूप प्रभावित झाडे छाटावीत.
  • छाटणीने अधिक नुकसानीत झाडांनाही परत उभे रहाण्यास जोम मिळतो.
  • वाढीच्या पूर्ण काळात किडींचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक असते, खास करुन त्याच मोसमात जर पहिला संसर्ग झाला असेल.
  • किडींची लोकसंख्या स्थलांतरीत होत असल्याने मळ्याच्या कोपर्‍यांत जास्त लक्ष द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा