Leucinodes orbonalis
किडा
अळ्यांच्या लवकर खाण्यामुळे मरगळणारी फुटव्यांची टोके ही पहिली दृष्य लक्षणे आहेत. नंतर फुले, कळ्या आणि फांद्यासुद्धा प्रभावित होतात. कोवळ्या अळ्या मोठ्या पानांच्या मध्यशिरेतील देठाजवळील भागात आणि कोवळ्या फुटव्यात पोखरुन फांदीत शिरतात आणि "मृत गाभा" लक्षणे दिसतात. मोठ्या अळ्या फळात आणि पानात छोटी छिद्रे करुन आत शिरतात जी सुकलेल्या विष्ठेने झाकली जातात. फळांच्या आतही पोकळ भाग, रंगहीनता आणि विष्ठा भरलेली दिसते. गंभीर संक्रमण झाल्यास मरगळ, रोप अशक्त होणे होऊन उत्पन्नाचे मोठे नुकसान होते. ह्या झाडांना लागलेली फळे वापरण्याजोगी रहात नाहीत. पुष्कळ पिढ्यांची मोठी लोकसंख्या जमा झाल्यास गंभीर नुकसान होऊ शकते.
एल. ऑर्बोनॅलिसच्या अळ्यांना अनेक परजीवी खातात, उदा. प्रिस्टोमेरस टेस्टासियस, क्रिमॅस्टस फ्लॅव्हुर्बिटॅलिस आणि शिराकिया शेनोबिक. स्युधोपेरिचेटा, ब्रँकोनिडस आणि फेनेरोटोमाच्या जातींनाही बढावा दिला पाहिजे किंवा शेतात सोडले जाऊ शकते. निंबोळीच्या बियांच्या टरफलांचा अर्क (एनएसकेइ) ५% किंवा स्पिनोसॅडचाही वापर संक्रमित फळांवर केला जाऊ शकतो. खळीसारखा चिकट पदार्थ लावलेल्या जाळ्याही वर १० सें.मी. कडा सोडुन लावल्यास अंडी घालण्यास प्रतिबंध होतो. जर खळ उपलब्ध नसेल तर जाळीला २ मी. उंचीच्या वर ४० सें.मी. आणखी वर घ्या नंतर उभ्या जाळीशी ८०-८५ कोनात पसरा.
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. संक्रमणाचा टप्पा आणि मोसम ह्याप्रमाणे उपचार करावेत. संक्रमण नियंत्रणात ठेवण्यासाठी सेव्हिमॉल (०.१%), एन्ड्रिन (०.०४%) किंवा मॅलेथियॉन (०.१%)चे फवारे नियमित अंतराने मारावेत. कृत्रिम पायरेथ्रॉइडचा अणि कीटनाशकांचा वापर फळे पक्व होण्याच्या काळात आणि काढणीच्या काळात टाळा.
ल्युसिनोडस ऑर्बोनॅलिस नावाच्या पतंगाच्या अळ्यांमुळे नुकसान उद्भवते. वसंत ऋतुत माद्या दुधाळ पांढरी अंडी एकेकटी किंवा पुंजक्याने पानांच्या खालच्या बाजुला, कळ्यांवर किंवा फळांच्या बुडाशी घालतात. ३-५ दिवसांनी अळ्या ऊबुन बाहेर येतात आणि सहसा थेट फळांत पोखरायला सुरवात करतात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या गुबगुबीत, गुलाबी रंगाच्या असुन डोके तपकिरी असते. खाऊन झाले कि फांद्यावर, सुकलेल्या फुटव्यांवर किंवा खाली गळलेल्या पानांत, विणलेल्या राखाडी कडक कोषात जातात. कोषावस्था ६-८ दिवसांची असते मग त्यातुन प्रौढ बाहेर पडतात. प्रौढ पतंग सुमारे २-५ दिवस जगतात, अशा तर्हेने त्यांचे पर्यावरणाच्या परिस्थितीवर अवलंबुन असणारे २१-४३ दिवसांचे जीवनचक्र पूर्ण होते. एका वर्षाच्या काळात त्यांच्या कार्यरत टप्प्यात सुमारे पाच पर्यंतच्या पिढ्या जीवनचक्राच्या विविध टप्प्यांवर एकाच वेळी असतात. हिवाळ्यात अळ्या जमिनीत विश्रांती घेतात. हे किडे इतर पुष्कळ टोमॅटो, बटाट्यासारख्या सोलॅनेसियस रोपांनाही खातात.